जास्त बाइक चालवण्याने होऊ शकतो हा गंभीर आजार, जाणून घ्या याची लक्षणं आणि उपाय

हा एक असा आजार आहे ज्यात रुग्णाला असह्य वेदना होतात आणि या वेदना इतक्या असह्य होतात रुग्णाला साधं बसण्या- उठण्यासाठीही दुसऱ्यांची मदत घ्यावी लागते.

  • Share this:

तुम्हाला माहिती आहे का की बाइक चालविण्याने सायटिका नावाचा गंभीर आजार होऊ शकतो. सायटिका हा एक असा रोग आहे ज्यामध्ये रुग्णाला पाठीपासून पायापर्यंत भयंकर वेदना होतात. याचं मुख्य कारण म्हणजे शरिरात एक सायटिक मज्जातंतूअसतो, जो माकड हाडाच्या खालच्या भागातून गुडघ्यांपर्यंत जात पायांपर्यंत जाते. जेव्हा शरीर खूप वेळ एकाच अवस्थेत राहतं तेव्हा सायटिकाचं दुखणं फार वाढतं. हे दुखणं असहनीय असतं. पण नेमकी सायटिका असतं तरी काय हे आपण जाणून घेऊ...

असहनीय वेदना होतात-

वास्तविक, सायटिका हा एक असा आजार आहे ज्यात रुग्णाला असह्य वेदना होतात आणि या वेदना इतक्या असह्य होतात रुग्णाला साधं बसण्या- उठण्यासाठीही दुसऱ्यांची मदत घ्यावी लागते. एकाच ठिका बर्‍याचदा ही समस्या अशा लोकांमध्ये उद्भवते जे बराच वेळ एका जागी बसतात, बराचवेळ चालतात किंवा भरपूर बाइक चालवतात. जास्त मोटरसायकल किंवा स्कूटर चालवण्याने सायटिक मज्जातंतूवर दबाव येतो. हाडांवर अचानक जोर आल्यामुळेही अशा प्रकारचा त्रास होतो. या प्रकारचा आजार सहसा 35 ते 45 वयोगटातील व्यक्तिंना होता. तसंच हा आजार पाऊस किंवा थंडीत मोठ्या प्रमाणात होतो.

सायटिकाची लक्षणं- 

- हाडांमध्ये अचानक असह्य वेदना होतात

- पार्श्वभागातून वेदनेला सुरुवात होऊन गुडघ्यांपर्यंत जातो.

- वेदनेवेळी ज्या भागात वेदना होत आहे तो भाग सुन्न पडतो.

- झोपताना किंवा शरीराची हालचाल करताना असह्य वेदना होतात.

- हा आजार सर्वसामान्यपणे 35 ते 40 वयोगटातील व्यक्तींना होतो. सायटिकाची वेदनी वाढत गेल्यास रुग्ण दररोजची कामंही करू शकत नाहीत.

कसा कराल स्वतःचा बचाव-

- या आजारात सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे डाएट. असं जेवण जेवायला प्राधान्य द्या जे तुमच्या शरीरासाठी फार उपयोगी असेल.

- जेव्हा वेदना होतात तेव्हा गरम पाण्याने आंघोळ करा.

- सन बाथही घेऊ शकता.

- स्वतःला थंडीपासून वाचवा आणि वातावरणानुसार अनुकूल कपडे घाला.

- सकाळ- संध्याकाळी न विसरता व्यायाम करा. फिरायला जा.

- एकाच जागी फारवेळ बसू किंवा उभं राहू नका. जर तुम्ही ऑफिसमध्ये आहात तर हात- पाय सतत हलवा. मध्ये- मध्ये  उभं राहून फिरायला जा.

- जास्तवेळ बाइक किंवा स्कूटर चालवू नका.

वयाने मोठ्या मुलीशी लग्न करण्यापूर्वी हे एकदा वाचाच!

ऑफिसमध्ये वरिष्ठांच्या जाचाला वैतागलाय... सुटकेचे हे आहेत स्मार्ट पर्याय

तांब्यांच्या भांड्यांमध्ये चुकूनही ठेवू नका या गोष्टी, नाहीतर...

या टीप्सने तुम्ही झटपट फेडू शकता कर्ज, एकदा वाचून पाहा

 

First published: November 27, 2019, 2:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading