मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /ज्यांना आहेत ‘या’ 5 सवयी तेच होतील दीर्घायुषी; हॉवर्ड युनिव्हर्सिटीचा दावा

ज्यांना आहेत ‘या’ 5 सवयी तेच होतील दीर्घायुषी; हॉवर्ड युनिव्हर्सिटीचा दावा

ब्राम्हीमध्ये एमिलॉईड असतं. जे अल्झायमरच्या त्रासात उपयोगी आहेत.

ब्राम्हीमध्ये एमिलॉईड असतं. जे अल्झायमरच्या त्रासात उपयोगी आहेत.

रिटायरमेंट नंतर निरोगी आयुष्य (Healthy Life after Retirement)जगायचं असेल तर, वयाच्या पन्नाशीत काही वाईट सवयी सोडून द्या.

दिल्ली, 24 जून : तरुण वयामध्ये कुटुंबाच्या जबाबदाऱ्या, करिअर बनवण्याच्या नादात आपण स्वतःची काळजी घेणं विसरून जातो. मात्रं जसजसं रिटायरमेंटचं वय जवळ येतं. तसतसे अनेक आजार आणि डोकं वर काढायला लागतात. थकवा येणं, हाडांचे आजार, रोग प्रतिकारशक्ती कमी होणं, ऐकायला कमी येणं  अशा बऱ्याच त्रासंचा सामना आपल्याला करावा लागतो.

हॉवर्ड मेडिकल स्कुल आणि हॉवर्ड टीएच चेन स्कुल ऑफ पब्लिक हेल्थने केलेल्या एका संशोधनानुसार वयाच्या पन्नाशीमध्ये काही चांगल्या सवयी अंगीकारल्या तर, आपण निरोगी आयुष्य जगू शकतो. पाहुयात कोणत्या 5 सवयी महत्वाच्या आहेत.

व्यायाम

व्यायामामुळे केवळ वजन कमी होतं असं नाही तर, अनेक आजार देखील व्यायामामुळे दूर राहतात. त्यामुळे पन्नाशीनंतर दररोज नियमितपणे व्यायाम करा. यामुळे हाडं आणि स्नायू मजबूत राहतील. योगायनंही करू शकता. योगामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं राहतं.

(स्वयंपाकाच्या गॅसची बचत करण्यासाठी वापरा या टिप्स, जास्त दिवस टिकेल LPG सिलेंडर)

वजनावर नियंत्रण

वजन वाढलं असेल तर योग्य वेळेस नियंत्रणामध्ये आणा. उतारवयात वाढलेल्या वजनामुळे हृदयरोग, हाय ब्लड प्रेशर, टाईप 2 डायबिटीज, पित्ताचे खडे होणं, श्वासनाचे विकार, कॅन्सर यासारखे आजार होण्याचा धोका जास्त संभवतो. त्यामुळे पन्नाशी मधल्या महिला किंवा पुरुष यांनी सर्वातआधी वजन नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करावा.

चांगला आहार

आपण जो आहार घेतो त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. शरीरामध्ये पोषक घटक असतील तर आपली रोग प्रतिकारशक्ती चांगली राहते. युएसमध्ये 4 पैकी 1 मृत्यू हृदयरोगामुळे होतो. याशिवाय लठ्ठपणा, हाय कोलेस्ट्रॉल, हाय ब्लडप्रेशर हे सगळेच आजार अन हेल्दी फूडमुळे होऊ शकतात. त्यामुळे पन्नाशी जवळ येताना चांगला आहार घ्यायला सुरुवात करा.

(नाश्त्याला खा हे 5 पदार्थ; दिवसभर नाही जाणवणार थकवा)

धूम्रपान बंद करा

धुम्रपानामुळे हृदयरोग,स्ट्रोक,फुफ्फुसाचे आजार, डायबिटीज क्रॉनिक ऑब्स्ट्रेटिक्व पल्मोनरी डिसीज होतो. धुम्रपानामुळे नजर कमजोर होते, अर्थराइटिस सारखा त्रास होऊ शकतो. त्यामुळे वाढत्या वयानुसार धूम्रपानाची सवय असेल तर बंद करा.

(अ‍ॅसिडिटीचा त्रास आहे? तुमच्यासाठी आहे खास डाएट प्लॅन; पोटात नाही होणार गॅस)

मद्यपान

बऱ्याच जणांना मद्यपानाची सवय असते. दिवसभरामध्ये एखाद ग्लास मद्यपान केल्याने कोणताही त्रास संभवत नाही. मात्र मद्यपान अतिप्रमाणात करण्याची सवय असेल तर, त्याचा शरीरावर वाईट परिणाम होतो. वयाच्या पन्नाशीनंतर याचे आणखीन भयंकर परिणाम भोगावे लागतात असं तज्ञांचे मत आहे.

त्यामुळे रिटायरमेंट नंतर देखील निरोगी आयुष्य जगायचं असेल तर, आधी वाईट सवयी सोडून चांगल्या सवयी लावा आणि भरपूर निरोगी आयुष्य जगा.

First published:

Tags: Health Tips, Lifestyle