मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /चॉकलेटप्रेमींसाठी चांगलं संशोधन! डार्क चॉकलेटने कमी होईल ही गंभीर समस्या

चॉकलेटप्रेमींसाठी चांगलं संशोधन! डार्क चॉकलेटने कमी होईल ही गंभीर समस्या

एक असं चॉकलेट (Chocolate) लॉन्च करण्यात आलं आहे जे केवळ तणाव (Stress)कमी करण्यासाठीच नाही तर रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आणि निद्रानाश सारख्या समस्यांशी लढण्यासाठी प्रभावी असल्याचं म्हटलं जात आहे.

एक असं चॉकलेट (Chocolate) लॉन्च करण्यात आलं आहे जे केवळ तणाव (Stress)कमी करण्यासाठीच नाही तर रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आणि निद्रानाश सारख्या समस्यांशी लढण्यासाठी प्रभावी असल्याचं म्हटलं जात आहे.

शरीरामध्ये युरिक ऍसिडचं(Uric Acid) प्रमाण वाढणं. ही अलीकडच्या काळात गंभीर समस्या (Serious problem) बनली आहे. डार्क चॉकलेट खाल्ल्याने ही समस्या कमी होऊ शकते.

  दिल्ली, 4 जून : वाढत्या वयानुसार (Aging) होणऱ्या त्रासांपैकी एक त्रास म्हणजे अंगदुखी (Body Pain), हाडं दुखणं किंवा सांधे दुखणं पण, हल्लीच्या काळामध्ये हे त्रास (Problem) तरूणपणातचं व्हायला लागले आहेत. सांधेदुखीचा (Joint pain) त्रास लवकर सुरु झाला असेल तर, त्याकडे वेळीच लक्ष द्यायला हवं. बदललेली लाईफस्टाईल (Lifestyle), जंक फूड खाणं (Junk food)यामुळे शरीरामध्ये काही चुकीचे घटक जातात. त्याचे दुष्परिणाम (Bad Effect) आपल्या शरीरावर होतात. या सवयींमुळे होणाऱ्या त्रासांपैकी एक त्रास म्हणजे शरीरामध्ये युरिक ऍसिडचं(Uric Acid) प्रमाण वाढणं. अलीकडच्या काळात यूरिक ऍसिड वाढणं एक गंभीर समस्या (Serious problem) बनली आहे. आपलं शरीर किडनी (Kidney)मार्फत यूरिक ॲसिड फिल्टर करतं.

  शरीरामध्ये युरिक ऍसिड वाढलं असेल तर हे ऍसिड फिल्टर करण्यात अडचणी येतात आणि त्यामुळेच रक्तात यूरिक ॲसिड वाढण्यास सुरुवात होते आणि सांधेदुखीची समस्या उद्भवते.

  यूरिक ऍसिड वाढण्याची कारणं

  चुकीचा आहार, मांसाहार, प्रोटीनयुक्त पदार्थ जास्त खाणं किंवा जास्त वेळ उपाशी राहणं, वाढलेलं वजन आणि डायबेटीस या समस्यांमुळे देखील यूरिक ऍसिड शरीरात वाढू शकतं. कोल्ड्रिंक्स, सोडा, फ्रेश फ्रूट ज्यूस, ग्लुकोज, रिफाइंड आणि पॅक्ड फूड यामुळे रक्तातील साखरेची पातळी आणि युरिक ऍसिड वाढण्याची शक्यता असते. साधारण वयाच्या तिशीनंतर हा आजार होतो. यूरिक ऍसिडमुळे ब्लड सर्क्युलेशन कमी होऊन शरीरात गाठी तयार व्हायला लागतात.

  यूरिक ऍसिडमुळे त्रास

  यूरिक ऍसिड वाढलं तर सांध्यांमध्ये वेदना व्हायला लागतात. चालणं, उठणं-बसणं देखील कठीण होऊन जातं. यूरिक ऍसिड शरीरात वाढायला लागलं की ते आपल्या संध्यांजवळ जमा व्हायला लागतं. हे कमी करण्यासाठी अनेक घरगुती उपाय आहेत. पण, आत्ताच समोर आलेल्या एका संशोधनानुसार डार्क चॉकलेट यूरिक ऍसिडवर औषध ठरू शकतं. जनसत्ताच्या हवाल्याने जाणून घेऊयात डार्क चॉकलेटचे यूरिक ॲसिडवर होणारे परिणाम.

  (Shocking! सेक्स डॉलशी लग्न करणाऱ्या बॉडीबिल्डरने डेटिंगसाठी घातली विचित्र अट)

  किडनीला फायदा

  यूरिक ऍसिड वाढल्यानंतर किडनीवर सर्वात जास्त परिणाम होतो. किडनी डॅमेज होण्याचीही भीती असते. किडनी फंक्शनिंग चुकीच्या पद्धतीने व्हायला लागतं. मात्र डार्क चॉकलेटमध्ये वापरल्या जाणाऱ्या कोकोमध्ये ऍन्टिऑक्सिडंट असतात. जे किडनी आणि आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.

  सांध्यांमधील वेदना आणि सूज कमी करतं

  डार्क चॉकलेट (Dark Chocolate) सांध्यांवर आलेली सूज कमी करण्यास फायदेशीर आहे. यामध्ये फ्लेवेलॉईड नावाचं एक महत्त्वाचं ऍन्टीऑक्सीडंट आहे जे वेदना आणि सूज कमी करण्यास उपयोगी ठरतं. डार्क चॉकलेट मधील ल्युकोटीएन सांध्यावरील सूज कमी करतं.

  (भरपूर पाणी प्यावं, पण म्हणजे किती? तुम्ही अती पाणी तर पीत नाही ना?)

  युरेट क्रिस्टल कमी होतं

  सांध्यावर युरेट क्रिस्टल जमा व्हायला लागलं की रुग्णांना जास्त त्रास व्हायला लागतो. अशावेळी डार्क चॉकलेट खावं. डार्क चॉकलेटमध्ये थियाब्रोमाईन नावाचा घटक आहे जो हळूहळू हे क्रिस्टल्स कमी करतो. थियाब्रोमाइन वाढल्याने युरो क्रिस्टल शरीरात जमा होणं थांबतं.

  (Mucormycosis हा Black Fungus मुळे नव्हे; तज्ज्ञांनी सांगितलं आजाराचं नेमकं कारण)

  चॉकलेटचे इतर फायदे

  चॉकलेट खाण्याने शरीरात रक्ताभिसरण वाढतं त्यामुळे रक्ताच्या गाठी होण्याची भीती कमी होते. चॉकलेट मधील ऍन्टिऑक्सिडंट मेंदू सक्रिय होण्यास मदत करतात. त्यामुळे तणाव आणि मूड स्विंग होणं याचा त्रास कमी होतो. ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल आणि वजनावर देखील डार्क चॉकलेट खाण्याने नियंत्रण येऊ शकतं.

  First published:
  top videos