Home /News /lifestyle /

त्वचेच्या आजारावर सर्वोत्तम घरगुती उपाय! बहुगुणी कडुनिंबाचे 10 फायदे

त्वचेच्या आजारावर सर्वोत्तम घरगुती उपाय! बहुगुणी कडुनिंबाचे 10 फायदे

आयुर्वेदानुसार दातांच्या आणि तोंडातल्या इतर आजारांसाठी क़डुलिंब सर्वोत्तम आहे. एवढंच नव्हे तर कडुलिंब अनेक गंभीर रोगांच्या उपचारासाठीसुद्धा फायदेशीर ठरतो

    मुंबई, 05 जानेवारी: हिवाळ्यात अनेक रोगांपासून दूर राहण्यासाठी सर्वात उत्तम आणि घरगुती उपाय म्हणजे कडुनिंब. कडुनिंबाची पान चवीला कडु असली तरी त्याचे फायदे अनेक आहेत. शरीरातील अंतर्गत व्याधींपासून त्वचेच्या आजारापर्यंत कडुनिंबाचे अनेक फायदे आहेत. निसर्गानं कडुलिंब बनवलं ते माणसाला निरोगी ठेवण्यासाठीच जणू काही. रोज कडुनिंबाची दोन कोवळी पान खाल्ली तर आपलं आरोग्य उत्तम राहिलं. याशिवाय कोणताही आजार होणार नाही. काय आहेत कडुनिंबाचे फायदे 1. पोचात जंत किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन होत असतं. सतत बाहेरचं आणि अवेळी खाण्यानं अशा समस्या उद्भवतात अशा वेळी कडुलिंबाची पाने खूप उपायकारी असतात. कडुलिंबाच्या पानाच्या रसामध्ये थोडे मध आणि काळी मिरी पावडर घालून घेतल्यास पोटाचे सर्व आजार बरे होतात. 2. कडुलिंबामध्ये अँटीसेप्टिक गुण असल्यामुळे जर कडुलिंबाची सालं,पाने आणि फळं या सर्वांची पेस्ट करून जर चेहऱ्यावर लावली तर चेहऱ्यावर येणारे फोड, पुरळ यापासून मुक्तता मिळते. 3. कानामध्ये कडुलिंबाचे तेल टाकले असता कान दुखणे किंवा कानातून पाणी येणे हे सर्व आजार बरे होतात. 4. कडुलिंब दातांसाठी सुद्धा खूप उपयोगी आहे. रोज कडुलिंबाच्या काडीने दात घासले असता दात स्वच्छ आणि निरोगी राहतात. हेही वाचा-हिवाळ्यात अंडी खा, पण जपून! अंड्याविषयीच्या या 7 गोष्टी तुमचे डोळे उघडतील 5. पित्ताशयाच्या आजारावर सुद्धा कडुलिंबाचा रस उपायकारी आहे . एवढ्या सर्व आजारावर एकट्या कडुलिबांच्या रसापासून मुक्तता मिळते. 6. त्वचेचे आजार, संसर्गजन्य रोगांसाठी गरम पाण्यात कडुनिंबाची पान उकळावीत आणि त्या पाण्यानं अंघोळ करावी. कंडुनिंबात किटाणू मारण्याची क्षमता असते. 7. या व्यतिरिक्त घरामध्ये ठेवलं जाणारं धन्य अथवा कडधान्यांचं किडे, उंदीर घुशीपासून संरक्षण करण्यासाठी कडुलिंबाचा पाला ठेवावा. त्यामुळे किडे, मुग्या आणि उंदराचा त्रास होणार नाही. धान्यही सुरक्षित राहिल. 8. कडुनिंबाचे पानांचा उपयोग शरीरातील शर्करा नियंत्रणात ठेवण्यासाठी होतो. त्यामुळे मधुमेहाचा त्रास असणाऱ्या रुग्णांना कडुनिंबाच्या पानांचा रस अत्यंत फायदेशीर ठरतो. 9. कफ, खोकला आणि श्वास नियंत्रित करण्यासाठी कडुनिंबाचा वापर होतो. श्वसन विकारांवर कडुनिंब दीर्घकाळापर्यंत आराम देतं. 10. डोकेदुखी, दातदुखी, हातापायांना होणाऱ्या वेदना दूर करण्यासाठी कडुनिंबाच्या तेलाचा वापर केला जातो. टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा. हेही वाचा-'या' घरगुती उपायांनी मिळवा डार्क सर्कल्सपासून सुटका! हेही वाचा- Health Tips: अर्धशिशीचा त्रास वाढण्याची ही आहेत कारणं; वेळीच द्या लक्ष
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    पुढील बातम्या