प्रोसेस्ड फूडमुळे येऊ शकतो लवकर मृत्यू; आरोग्यावर होणारे घातक परिणाम आले समोर

प्रोसेस्ड फूडमुळे येऊ शकतो लवकर मृत्यू; आरोग्यावर होणारे घातक परिणाम आले समोर

प्रक्रिया केलेलं अन्न किती घातक ठरू शकतं हे एका अभ्यासातून समोर आलं आहे. सॉस, रेडी टू इट नूडल्स, जेली, केक वगैरे कुठलंही Processed Food खरेदी करण्यापूर्वी आधी हे वाचा.

  • Share this:

न्यूयॉर्क, 12 जानेवारी: आजच्या काळात शारीरिक (Physical) आणि मानसिकदृष्ट्या (Mental Health) निरोगी असणं अत्यंत आवश्यक आहे. स्वत:ला निरोगी ठेवण्यासाठी एक चांगली जीवनशैली (Lifestyle) आत्मसात करणं आणि आहारात पौष्टिक पदार्थांचा (Healthy Food) समावेश करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आपण जे अन्न खातो, त्यातून आपल्याला ऊर्जा मिळते. आपलं शरीर आरोग्यदायी आणि तंदुरुस्त ठेवण्यासह काम करण्याची शक्ती आपल्याला अन्नातूनच मिळते. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, आपण काय खातो आणि कसे खातो हे अत्यंत महत्त्वाचं आहे. सर्वांना हे माहीत आहे की प्रक्रिया केलेलं अन्न (Processed Food) आरोग्यासाठी चांगलं नाही. त्यामुळे प्रत्येकानं असं अन्न कमीत कमी खाण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार अनेकांना पिझ्झा, बर्गर, साखरयुक्त पदार्थ, केक असे वेगवेगळे प्रोसेस्ड म्हणजे प्रक्रिया केलेले पदार्थ खायला आवडतात. अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनमध्ये (American Journal of Clinical Nutrition) प्रकाशित झालेल्या एका अहवालानुसार, साखर आणि प्रिझर्वव्हेटीज(Preservatives) असलेले प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थांच्या सेवनामुळं हृदयविकारांचा (Heart Diseases) धोका वाढत आहे. एवढेच नव्हे तर, असे पदार्थ खाण्यानं अकाली मृत्यूचा (Premature Death) धोकाही वाढत आहे.

50 वर्षांच्या माणसानं केलं 23 वर्षांनी लहान मुलीशी लग्न, टीकेकडे देत नाहीत लक्ष

इनसाइडरच्या अहवालानुसार, इटलीतील संशोधकांच्या एका गटानं 35 वर्षे आणि त्यापेक्षा अधिक वयाच्या 24 हजार 325 पुरुष आणि स्त्रिया यांच्या जीवनशैलीचा तब्बल दहा वर्षे अभ्यास केला, आणि महत्त्वपूर्ण माहिती जमा केली. यामध्ये सहभागी स्त्री आणि पुरुष यांच्या खाण्याच्या सवयी आणि आरोग्याबाबतची निरीक्षणे नोंदवण्यात आली. या अहवालातील निष्कर्षानुसार, जे लोक प्रक्रिया केलेल्या पदार्थांचे सतत सेवन करतात, त्यांना हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी आजार, हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका अधिक असल्याचं स्पष्ट झालं आहे.

चिकन खाल्ल्याने बर्ड फ्ल्यू रोग होतो का? आता थेट आरोग्यमंत्र्यांनीच दिलं उत्तर

प्रक्रिया केलेलं अन्न न खाणाऱ्यांना हा धोका अतिशय कमी असल्याचं स्पष्ट झालं आहे. ज्या लोकांनी पौष्टिक पदार्थ खाल्ले त्यांना दैनंदिन कॅलरीजपैकी फक्त 15 टक्के कॅलरीज प्रक्रिया केलेल्या पदार्थांमधून प्राप्त केली. प्रक्रिया केलेल्या अन्नातून दिवसाला 300 ते 1250 कॅलरीज मिळतात. हॉट डॉग, कँडी बार, सोडा आणि यासारख्या पदार्थांच्या दोन ते आठ सर्व्हिंगमधून इतक्या कॅलरीज मिळतात.

मुलाच्या ऑनलाइन क्लासच्या ग्रुपवर पालकानंच पाठवलं पॉर्न?

प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ अत्यंत कमी प्रमाणात खाणाऱ्या लोकांना असलेल्या हृदयरोगाच्या धोक्यापेक्षा प्रक्रियायुक्त अन्न खाणाऱ्या लोकांना असलेला धोका 58 टक्के अधिक असल्याचं स्पष्ट झालं आहे, तर स्ट्रोक किंवा सेरेब्रॉव्हस्क्युलर रोगानं त्यांना मृत्यूचा धोका 52 टक्के जास्त होता. यापूर्वी याबाबतीत झालेल्या अभ्यासात असंही आढळून आलं आहे की, प्रक्रिया केलेले पदार्थ जास्त चविष्ट असतात, त्यामुळं जास्त भूक लागते आणि प्रमाणाबाहेर अन्न खाल्ल्यानं वजन वाढतं.

First published: January 12, 2021, 8:51 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading