दिल्ली ,25 मे: सध्या संपूर्ण जगात कोरोनाने
(Corona) हाहाकार माजवलेला असताना दुसऱ्या लाटेत
(Second Wave) त्याचा संसर्ग
(Infection) लहान मुलांना जास्त होत असल्याचं आढळल्याने भितीचं वातावरण आहे. त्यातच पहिल्यांदाच अशा प्रकारची संक्रमण परिस्थिती निर्माण झाल्याने अद्यापही कोणताच ठोस दावा करता येत नाही. त्यामुळेच कोरोनाचा गर्भवती आई
(Pregnant Women) किंवा तिच्या गर्भावर नेमका कोणता परिणाम होतो? हे सांगता येत नाही.
कोरोनामुळे गर्भपात, वेळेआधी बाळाचा जन्म किंवा जन्मजात दोष निर्माण होतात का? हे निश्चित झालेलं नाही.
कोरोना काळात IVF ट्रीटमेंट
गर्भवती महिला किंवा IVF ट्रीटमेंटच्या माध्यमातून पालक होण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांच्या मनात कोरोनामुळे बरीच भिती निर्माण झालेली आहे. अशात IVF ट्रीटमेंट घेणाऱ्या जोडप्यांनी आपली ट्रीटमेंट थांबवली आहे किंवा पुढे ढकलली आहे. कोरोना काळात हॉस्पिटलमध्ये जाण्यास आणि गर्भधारणा झाल्यास काळजी कशी घ्याची? असे अनेक प्रश्न या जोडप्यांच्या मनात आहे.
डॉक्टरांच्या मते, कोरोना काळात गर्भधारणा किंवा IVF ट्रिटमेंटला घाबरू नये. मात्र ट्रीटमेंट टाळणं हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय असू शकतो. अमेरिकन अभ्यासानुसार, गर्भवती महिलांसाठी किंवा बाळासाठी प्रयत्न करणाऱ्या महिलांसाठी कोविड लसीकरण सुरक्षित मानलं गेलं आहे. कोरोनामुळे गर्भपात, वेळेआधी बाळाचा जन्म किंवा जन्मजात दोष निर्माण होतात का? हे निश्चीत झालेलं नाही. यासंदर्भात फायनान्शियल एक्सप्रेसने
माहिती दिली आहे. त्यामुळे IVF ट्रिटमेंटच्या (
IVF treatment) माध्यमातून गर्भधारणेसाठी प्रयत्न करणाऱ्या पालकांसाठी या महत्वाचा टिप्स
IVF ट्रिटमेंट घेणाऱ्या जोडप्यांनी मनातली भीती काढून टाकावी आणि सकारात्मक,निरोगी,शांत आणि भावनिकदृष्ट्या संतुलित विचार करावेत.
आता Skin infection वाढण्याचा धोका; अशी घ्या काळजी
कोरोना काळात हॉस्पिटलमध्ये जाताना काय खबरदारी घ्यावी?
हॉस्पिटलमध्ये जाताना नाक, हनुवटी आणि गाल झाकले जातील असा मास्क घालाव.
कोणत्याही ठिकाणी हात लावणं टाळावं, बाहेर असताना चेहऱ्यालाही हात लावू नये. कुठेही हात लागला असेल तर, लगेच हात स्वच्छ करावेत किंवा सॅनिटाझर लावावं.
हॉस्पिटलमध्ये किंवा बाहेर गेल्यावर सोशल डिस्टंन्सिंग पाळा.
आवश्यकता नसल्यास घरा बाहेर पडणं टाळावं.
IVF ट्रीटमेंट सुरु असताना डॉक्टरांच्या संपर्कात राहा, त्यांच्या सल्ल्यानेच निर्णय घ्या.
हॉस्पिटलमध्ये ठरलेल्या विझीट कोरोनाच्या भितीने टाळू नका.
हॉस्पिटलमध्ये विझिटला जाताना जास्त जणांना सोबत नेणं टाळा.
जंक फूड टाळा,चांगला पोषक आहार घ्या.
योगा, मेडिटेशन आणि श्वसनाच्या व्यायामाकडे लक्ष द्या.
याशिवाय ज्यांना बीपी, डायबेटीज, लिव्हर किंवा किडनी संबंधी त्रास
असेल किंवा रोग प्रतिकार शक्ती कमी असल्याने कोणत्याही प्रकारची औषधं सुरु असतील तर,डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय प्रेग्नेन्सी प्लॅनिंग करू नका.
स्पेशल सेंटर
IVF ट्रिटमेटसाठी नावजलेल्या चांगल्या सेंटरचीच निवड करा. जेणेकरुन पुढील त्रास संभवणार नाही. शिवाय अशा ठिकाणी रुग्णांना अपॉयमेंट घेऊनच बोलावलं जातं त्यामुळे गर्दी होण्याचा धोकाही नसतो.
हॉस्पिटलनेही या काळात स्वच्छतेकडे लक्ष द्यायला हवं. दररोज सॅनिटायझेशन करण्यात यावं. कर्मचाऱ्यांनाही याचं महत्व पटवून सांगावं. स्टाफला सॅनिटायझेशनच योग्य प्रशिक्षण द्यावं.
ऑनलाईन विझीटचा पर्यायही तुम्ही निवडू शकता. त्यामुळे लोकांच्या संपर्कात येणं टाळता येईल. हॉस्पिटलमध्ये जाव लागल्यास सोशल डिस्टन्सींगचे नियम पाळा.
जर आपण कोविड पॉझिटिव्ह रूग्णाच्या संपर्कात आला असाल किंवा उपचार घेत असताना किंवा गरोदरपणात कोविडची कोणतीही लक्षणं दिसली असतील तर, रुग्णालयात जाणं टाळा आणि पुढील ट्रिटमेंटसाठी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. गर्भधारणेसाठी कोणतीही ट्रिटमेंट सुरु करण्याआधी RT PCR टेस्ट नक्की करा. RT PCR टेस्ट पॉझिटीव्ह आली असेल तर, थोडा वेळ घ्या. पूर्ण बरं वाटल्याशिवाय कोणताही निर्णय घेण्याची घाई करु नका.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.