मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

नका गुंतू पश्चातापात! थांबेल प्रगती; असा सोडवा मनाचा गुंता

नका गुंतू पश्चातापात! थांबेल प्रगती; असा सोडवा मनाचा गुंता

ज्या कारणांमुळे भावना अनावर होतात त्याला ट्रिगर्स म्हटलं जातं. आपल्याला कोणत्या गोष्टीची आठवण आल्यामुळे किंवा एखाद्या व्यक्ती मुळे, परिस्थितीमध्ये त्रास होतोय हे ओळखून वागायला हवं. म्हणजेच हा ट्रिगर ओळखला तर उपायही करता येऊ शकतात.

ज्या कारणांमुळे भावना अनावर होतात त्याला ट्रिगर्स म्हटलं जातं. आपल्याला कोणत्या गोष्टीची आठवण आल्यामुळे किंवा एखाद्या व्यक्ती मुळे, परिस्थितीमध्ये त्रास होतोय हे ओळखून वागायला हवं. म्हणजेच हा ट्रिगर ओळखला तर उपायही करता येऊ शकतात.

पश्चातापाच्या (Regret) आगीत आयुष्य जळतं राहतं. त्यातून हातात काहीच उरत नाही उलट प्रगती थांबते (Stop Progress).

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 13 जुलै : भूतकाळात घडलेल्या चुकांच ओझं (Burden of Past Mistakes)आपण सतत मनावर बाळगत राहतो. एखादी घटना का घडली, ती घडायला नको होती. जर, मी तसं केलं नसतं तर, असं मनाला वाटत राहतं. पण,पाठीमागे जाऊन आपण त्या चुका (Mistake) बदलू शकत नाही. जीवनातल्या काही चुका कधीच आपला पिच्छा सोडत नाहीत. आपण आयुष्यभर त्या दु:खामध्ये(Guilty)जगत राहतो वास्तविक,अशी खंत मनात असणं प्रत्येकाच्या जीवनाचा एक भाग (Part Of life) आहे.

काही लोक मनातल्या या पश्चातापावर(Regret)विजय मिळवतात आणि काही लोक मात्र त्या विचारांच्या कोंडीत अडकतात. या दु:खामुळे,लोक पुढे जाण्याऐवजी एकतर मागे पडतात किंवा योग्य निर्णय घेण्याचा आत्मविश्वास गमावतात(Confidence Loss). म्हणूनच पश्चात्ताप योग्य वेळी सोडला नाही तर आयुष्य आपला वेग पकडू शकत नाही असं म्हटलं जातं.

भूतकाळात घडलेल्या घटना विसरा हे बोलणं जितकं सोपं आहे तितकंच ते करणं कठीण असतं. मनातील हिच पश्चातापाची भावना विसरण्यासाठी काही टिप्स उपयोगी पडतात जाणून घेऊयात.

घटना लिहून काढा आणि विचार करा

आयुष्यातल्या ज्या गोष्टीबद्दल आपल्याला पश्चात्ताप वाटतो त्या सर्व गोष्टी एका कागदावर लिहून काढा. जेव्हा आपण तो निर्णय घेतला तेव्हाची परिस्थिती लक्षात येईल. त्यामुळे तो निर्णय खरोखर काळाची गरज होती हे समजलं की मनातला पश्चाताप निघून जाईल.

काय शिकलो?

ज्या गोष्टीचा आपल्याला पश्चात्ताप होत आहे. त्या गोष्टी किंवा घटनेमधून, निर्णयातून आपण खरोखर काय शिकलो हेही लिहून काढा. त्या घडनेला जीवनाचा धडा म्हणून सकारात्मक विचाराने पाहिलं तर, विश्वासाने पुढे जाण्याचं बळ येईल आणि इतिहासात घेतलेला हा चुकीचा निर्णय भविष्यात आपली शक्ती बनू शकेल.

स्वतःला माफ करा

पश्चात्तापामधून बाहेर पडण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे स्वतःला क्षमा करणे. असा विचार करा की त्यावेळी आपण निर्दोष होतो आणि चुका कोणाकडूनही होऊ शकतात.

माफी मागा

एखाद्याबरोबर काही चुकीचं केलं असेल किंवा आपल्या निर्णयामुळे एखाद्याचं मोठं नुकसान झालं असेल आणि आपल्याला पश्चाताप झाला असेल तर, त्या वेदनेमधून मुक्त होण्यासाठी क्षमा मागणं हा एकमेव पर्याय आहे. क्षमा मागितल्याशिवाय ती भावना तुमचा पिच्छा सोडणार नाही आणि आयुष्यभर तुम्हाला त्रास होत राहिल.

स्वकारा

आपण स्वतःची चूक स्वीकारली तरच आपला मोठा विजय होईल. आपला अहंकार सोडा आणि मित्रांकडे किंवा कुटुंबीयांसमोर ती चूक मान्य करा म्हणजे तुम्हाला नक्कीच मन:शांती मिळेल.

First published:

Tags: Health Tips, Lifestyle, Mental health