• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • अरे बापरे! घरातच या ठिकाणी असतात हजारो जंतू; तुम्ही दुर्लक्ष तर करत नाही ना?

अरे बापरे! घरातच या ठिकाणी असतात हजारो जंतू; तुम्ही दुर्लक्ष तर करत नाही ना?

घरात असलेल्या काही निरुपयोगी गोष्टी घरात नकारात्मकता पसरवत असतात. 
त्यामुळे त्या व्यक्तीला अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरं जावं लागतं.

घरात असलेल्या काही निरुपयोगी गोष्टी घरात नकारात्मकता पसरवत असतात. त्यामुळे त्या व्यक्तीला अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरं जावं लागतं.

प्रदूषणामुळे (Air Pollution) बाहेर जाणं टाळतो. पण नकळत निष्काळजीपणामुळे घरात होणाऱ्या प्रदूषणाचे बळी ठरतो. काही छोट्या टिप्स (Tips) वापरल्या तर, घरातील हवासुद्धा स्वच्छ ठेवता येते.

 • Share this:
  दिल्ली, 25 ऑगस्ट: कोरोनाच्या काळात (Corona Period) लॉकडाऊनमुळे रस्त्यावर वाहतुक कमी असली तरीही,हवेतलं प्रदुषण(Air Pollution) कमी झालंय असं आपण म्हणू शकत नाही. कोरोनाच्या भीतीने लोक त्यांच्या घरातच राहत आहे तर,काहीजण ‘वर्क फ्रॉम होम’ करत आहेत. घरात राहण्याने आपल्याला वायू प्रदूषणाचा त्रास होणार नाही बर्‍याच लोकांना अशी खात्री वाटते. पण, आपल्या घरातील गॅझेट्स आणि इलेक्ट्रॉनिक (Gadgets and electronic) वस्तूंमधून निघणारा वायू घरातील हवेची गुणवत्ता (Air Quality) खराब करू शकतो हे माहिती आहे का? एवढेच नाही तर आपल्या काही सवयींमुळे घरातली हवाही प्रदूषित होऊ शकते. याशिवाय अनेक घटक ‘इंनडोअर एयर’वर परिणाम करता. घरातील हवा हेल्‍दी आणि पॉल्‍यूशन फ्री(Pollution Free Air) ठेवयची असेल तर, या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. 1. आपल्या कुटूंबाची काळजी असेल तर, घरात कधीही धूम्रपान करू नका. 2.स्वयंपाकघरात व्हेंटीलेशनची खास काळजी घ्या. गॅस सिलिंडर्समधून निघणारे वायू काही प्रमाणात बाहेरील हवेमध्ये विरघळतात. ज्यामुळे आरोग्याला मोठ्या प्रमाणात धोका पोहोचू शकते. (Gymनंतर पाळावेत काही नियम; फायद्याऐवजी होईल नुकसान) 3. घरात कार्पेट वापरत असाल तर शक्य असेल तेव्हा काढून ठेवा. दररोज वापरायचं असेल तर, दररोज स्वच्छ करा आणि काही महिन्यांनंतर ड्राय क्लीन करा. 4. शक्य असल्यास घरी डेह्युमिडीफायर वापरा. ज्यामुळे घरातला ओलावा निघून जातो. 5. घरात डस्टबिन नेहमी झाकून ठेवा,कारण त्यातील बॅक्टेरिया किंवा जंतू घरातल्या वातापरणावर आणि स्वच्छतेवर परिणाम करतात. (ऋजुता दिवेकर यांनी सांगितलं आरोग्याचं महत्त्व; 'या' पद्धतीने मोजा तुमचा Fitness) 6. घराबाहेर चप्पल शूज काढून ठेवण्याची सवय लावा. बाहेरून आलात लगेच घरात चप्पल आणू नका. 7. एअर फ्रेशनर्स हवेला प्रदूषित करतात त्यामुळे वापरणं टाळा. 8. घरी कार्बन मोनोऑक्साइड मॉनिटर ठेवू शकता. 9. घरात कोणत्याही भागात पाणी लिकेज होत असेल तर, त्वरित दुरुस्त करा. त्यामुळे हवेत जीवाणू वाढू शकतात. 10. घर स्वच्छ करण्याची,झाडण्याची सवय लावा आणि धूळ दिसली तर साफ करा. (सकाळच्या नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत; पावसाळ्यात हेल्दी ठेवेल असा आहार) 11. इनडोअर झाडे घरात लावण्यापेक्षा बाल्कनीमध्येच ठेवा. 12. आठवड्यातून एकदा सोफा कव्हर,पडदे,बेडशीट,उशांचे कव्हर स्वच्छ करा. 13. किचन आणि बाथरूममध्ये नेहमीच एक्झॉस्ट फॅन वापरा.
  Published by:News18 Desk
  First published: