छोट्या गोष्टींवरून तुम्हाला पटकन राग येतो का? असं मिळवा नियंत्रण

छोट्या गोष्टींवरून तुम्हाला पटकन राग येतो का? असं मिळवा नियंत्रण

बऱ्याचवेळा आपल्या रागावर नियंत्रण न राहिल्यानं अनेक अडचणी निर्माण होतात. त्यामुळे रागावर ताबा मिळण्यासाठी या सोप्या टिप्स जरूर करून पाहा.

  • Share this:

मुंबई 5 जानेवारी: आपल्या मनासारखी एखादी गोष्ट झाली नाही किंवा आपल्याला एखादी गोष्ट पटली नाही की अगदी सहज राग येतो. अनेकदा कारण नसतानाही आपण रागवून किंवा रागाच्या भरात उटलसुलट बोलून मोकळे होतो. माणसापासून प्राण्यांपर्यंत राग प्रत्येकाला येतो. मात्र राग येण्याचे प्रकार आणि राग व्यक्त करण्याची पद्धत वेगळी असू शकते. बऱ्याचवेळा रागाच्या भरात चुकीचे निर्णय घेतले जातात किंवा आपण अडचणीत येऊ असं काहीतरी आपल्या हातून घडून जातं. रागावर कंट्रोल असेल आणि वेळेचं भान आपण राखलं तर आपल्याला फायदा अधिक होतो. मग तुम्ही म्हणाल राग येतो तर काय करायचं? आपल्या रागावर नियंत्रण मिळण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगणार आहोत.

1.रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वात महत्त्वाचं असतं ते मेडिटेशन. अगदी सोपी पद्धतंही तुम्ही अवलंबू शकता. आपल्या श्वासावर लक्ष नियंत्रित करून 10 मिनिटं शांत बसणं. यामुळे आपल्या रागावर नियंत्रण मिळवणं सोपं होतं.

2.राग आला की 100 पासून उलटे अंक किंवा 10 पासून उलटे पाढे म्हणायला सुरू करा. आता तुम्हाला असं वाटेल हे काय नवीन. तर आपल्याला लहानपणी राग आला की वडिलधारे सांगायचे राग आला तर उलटे अंक म्हण मग राग जाईल. तर त्याचा खरंच उपयोग होतो.

3.राग आल्यानंतर गाणी तुमच्या आवडीची गाणी ऐकला. तुम्हाला एखादा छंद असेल तर तो जोपासा ज्यामुळे तुमचं रागावरचं लक्ष विचलित होईल. सकारात्मक वातावरणात राहण्यावर अधिक भर द्या.

हेही वाचा-या सोप्या उपायांनी तुम्ही जास्त काळ टिकवू शकाल कडधान्य आणि भाज्या

4.बऱ्याचवेळा रागाच्या भरात आपण बोलताना विचार करत नाही. याचा परिणाम आपल्या कामांवर आणि नात्यांवरही होत असतो. त्यामुळे प्रत्येक शब्द मोलाचा आहे. हे कायम आपल्या डोक्यात असूद्या. राग आल्यानंतर मनाचं ऐकण्याऐवजी बुद्धीला पटेल असं वागलं तर फायदा अधिक होतो. भावनेच्या आहारी जाऊन घेतलेले निर्णय चुकण्याची शक्यता नाकारता येत नाही.

5.सतत चिडचिड आणि राग तुमच्या मनावर, शरीरावर आणि परिणामी दिनचर्या आणि कामावर परिणाम करणारा असतो. अति झोप झाली किंवा न झाल्यानं, भूक लागली किंवा भूक असून खाणं न झाल्यानंही किंवा आजारपणातही चिडचिड अधिक होते. अशावेळी सतत रागवत राहिल्यानं मन प्रसन्न राहात नाही. यासोबतच आपल्या शरीरावरही दुष्परिणाम होतात.

6. रोज व्यायाम, योगासनं आणि योग्य आहार झोप घेणं आवश्यक आहे. त्यामुळे शरीर आणि मन प्रसन्न राहातं.

हेही वाचा-सावधान! गाडीत पेट्रोल-डिझेल भरताना 'ही' काळजी घ्या!

हेही वाचा-घसा खवखवतोय? डॉक्टरांकडे जाण्याआधी त्वरित करा हे उपाय

Published by: Kranti Kanetkar
First published: January 6, 2020, 1:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading