नवी दिल्ली, 07 डिसेंबर : भारतीय खाद्यपदार्थांमध्ये मसाल्यांना फार महत्व आहे. भारतीय मसाल्याचे पदार्थ जेवढी जेवणाची चव वाढवतात. तेवढेच ते औषधी गुणधर्मांनी समृद्ध असतात. प्रत्येक मसाल्याच्या पदार्थांची स्वत:ची खासियत असते. तशीच जेवणात वापरल्या जाणाऱ्या तमालपत्राचेही खास औषधी गुण आहेत.
तमालपत्राचा वापर जेवणात केला जातो. हा असा एक मसाल्याचा पदार्थ आहे. जो जवळपास प्रत्येक भाजीत वापरता येऊ शकतो. यामुळे जेवणाची चव तर, वाढतेच शिवाय औषधी गुणधर्म असल्याने याचा वापर अनेक प्रकारे केला जातो. तमालपत्रामध्ये कॉपर, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नीशियम, सेलेनियम आणि आयर्न यांचा भरपूर साठा असतो. तर, ऍटीऑक्सीडेंट्स असल्याने कॅन्सर, ब्लड क्लॉटिंग सारख्या हृदयाशी संबंधीत आजारांनाही दूर करतं. तमालपत्रांचा वापर करुन त्याचा काढा बनवल्यास बरेच पोषक घटक मिळतात.
तमालपत्र काढा कसा तयार करावा?
तमालपत्राचा काढा बनवण्यासाठी 4 तमालपत्र, अर्धा चमचा ओवा आणि अर्धा चमचा बडीशेप यांची पावडर करून घ्या. हे मिश्रण 1 लिटर पाण्यात चांगलं उकळून घ्या. पाणी अर्धे झाल्यावर गॅस बंद करा. पाच मिनिटं तसच झाकून ठेवा. थोड्या वेळाने आपल्या आवडीनुसार काळं मीठ किंवा मध घालून प्या.
अनेक वेदनांमध्ये इलाज
शरीरात कणकण जाणवत असेल, थंडीने वेदना होत असतील तर, तमालपत्राचा काढा घेतला पाहिजे. यामुळे दुखण्यात आराम मिळतो.डोक्यात तीव्र वेदना होत असतील तर, तमालपत्रांचा काढा बनवून प्या. डोकेदुखीमध्ये आपल्याला त्वरित आराम मिळेल.
दुखापत झाली असेल किंवा हात किंवा पाय मुरगळला असेल तर, तमालपत्राचा काढा प्यायला हवा. यामुळे सूज आणि वेदना कमी होईल. त्वरीत आरामासाठी तमालपत्र बारीक करून मुरगळलेल्या जागेवर लावा, आराम मिळेल.
हे वाचा - लॉन्ग ड्राइव्हची तयारी करताय, कारमध्ये या 10 वस्तू आवर्जून ठेवा!
बर्याच वेळा, झोपेत शिरा ताणल्या जातात किंवा क्रॅम्प येतो. त्यामुळे शिरांवर सूज येत. अशा परिस्थितीत तमालपत्राचा काढा बनवून त्याचं सेवन करावं. त्वरित बरं वाटेल. पाठीच्या त्रासात तर, याचा फायदा होतोच. पाठीच्या दुखण्यात तमालपत्राचा काढा बनवावा आणि दिवसातून कमीतकमी 2 वेळा सेवन करावा. त्वरित आरामासाठी, तमालपत्र मोहरीच्या तेलात उकळवा आणि हे तेल लावा दुखणाऱ्या जागेवर लावा.
(सूचना: येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Health Tips