मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Stress Relief साठी रोज प्या हा स्पेशल चहा; अनिद्रेचा त्रासही होतो कमी

Stress Relief साठी रोज प्या हा स्पेशल चहा; अनिद्रेचा त्रासही होतो कमी

कॅमोमाईल चहामध्ये कमी कॅलरीज आणि ऍन्टीऑक्सिडन्ट भरपूर प्रमाणात असतात. कॅमोमाईल चहा टाइप 2 डायबेटीजमध्ये ग्लायसेमिक नियंत्रित करण्यास उपयुक्त आहे. नियमित घेतल्यास रक्तातील साखरेची पातळी,किडनी आणि डोळे निरोगी राहतात.

कॅमोमाईल चहामध्ये कमी कॅलरीज आणि ऍन्टीऑक्सिडन्ट भरपूर प्रमाणात असतात. कॅमोमाईल चहा टाइप 2 डायबेटीजमध्ये ग्लायसेमिक नियंत्रित करण्यास उपयुक्त आहे. नियमित घेतल्यास रक्तातील साखरेची पातळी,किडनी आणि डोळे निरोगी राहतात.

ग्रीन टी प्रमाणेच कॅमोमाइट चहासुद्धा (Chamomile Tea)आता सॅशेमध्ये मिळतो. याच्या औषधी गुणधर्मांनी आरोग्य सुधारतं.

नवी दिल्ली, 24 ऑगस्ट : बर्‍याच वेळा ग्रीन टीच्या फायद्यांबद्दल (Benefits of Green tea) बोलतो. पण, ग्रीन टी इतकेच कॅमोमाइल चहाचे (Chamomile Tea) फायदे आहेत. कॅमोमाइल चहा म्हणजे काय आणि त्याचे फायदे काय आहेत हे माहिती आहे का? कॅमोमाइल चहा कॅमोमाइल फुलांपासून बनवलेला हर्बल चहा (Herbal Tea)आहे, ज्याचे शरीरासाठी अनेक फायदे (Health Benefits) आहेत. इजिप्तचे लोकामुळे लोकांना या फुलांची माहिती झाली.

त्यांच्यामुळेच कॅमोमाइल फुलं आणि त्यांच्या औषधी गुणधर्मांची (Medicinal Properties) माहितीही मिळाली. ग्रीन टी प्रमाणे, कॅमोमाइल चहा बाजारात सॅशेमध्ये मिळतो आणि याचे औषधी गुणधर्म आपलं आरोग्य चांगलं ठेवू शकतात. कॅमोमाइल चहा आरोग्यासाठी तसेच केस आणि त्वचेसाठी (Hair & Skin) खूप फायदेशीर आहे. पाहूयात यापासून होणारे फायदे.

पोटदुखीसाठी फायदेशीर

कॅमोमाइल चहा पोटाच्या समस्येमध्ये खूप आराम देतो. लूज मोशन्स, पचनाच्या समस्या, अतिसार, उलट्या यासारखा त्रास असेल तर, कॅमोमाइल चहाचे पिणं उपयुक्त ठरू शकतं. कॅमोमाइल चहा प्यायल्याने गॅसमुळे होणारी पोटदुखी कमी होते.

(नारळ वापरल्यावर करवंटी फेकून देत असाल तर हे वाचाच; नारळाबरोबर शेंडीचेही फायदे)

स्ट्रेस कमी होतो

आजच्या बिझी लाइफमध्ये, प्रत्येकजण स्ट्रेस आणि टेन्शनमध्ये असतो. कोरोनाच्या काळात तर हा त्रास आणखी वाढला आहे. लोक घरात बंद असल्याने खूप नैराश्य येतंय. त्यावेळी कॅमोमाइल चहा पिणं चांगलं आहे. कॅमोमाइल चहा स्ट्रेसची पातळी कमी करतो.

पाळीच्या काळात

कॅमोमाइल चहा मासिक पाळी दरम्यान वेदना कमी करतो. गर्भाशयाला आराम देतो आणि हार्मोन्सचं उत्पादन कमी करतो. ज्यामुळे मासिक पाळी दरम्यान ओटीपोटात वेदना होतात नाहीत.

(दाखवा हुशारी! खरेदी करताना ‘या’ ट्रिकने ओळखा बनावट शूज; होणार नाही फसवणूक)

सर्दी आणि खोकल्यापासून आराम

सर्दी आणि खोकला असेल तर, कॅमोमाइल चहा घेणं आवश्यक आहे. याचा परिणाम काही वेळातच दिसतो. कॅमोमाइल घेतल्याने आराम मिळतो. सर्दी-खोकला असेल तर, कॅमोमाइल चहाची स्टीमही घेऊ शकता.

रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते

कॅमोमाइल चहा शरीराला रोगांपासून दूर ठेवतोच आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतो. सध्याच्या दिवसात प्रतिकारशक्ती मजबूत असणं खूप महत्वाचं आहे. त्यामुळे व्हायरल इन्फेक्शनपासून दूर राहता येतं.

(जेफ बेझोसचं Ice-cream प्रेम! 24 तास कधीही खाता यावं म्हणून घरातच लावलं मशीन)

झोप न येण्याची समस्या दूर होते

कॅमोमाइल चहा मज्जातंतूंना आराम देतो आणि त्यामुळे नसा रिलॅक्स होतात. यामुळे चांगली झोप येते. कॅफिनचे व्यसन संपवण्यासाठी हा चहा पर्याय आहे. झोप येत नसेल तर कॅमोमाइल चहा पिणं फायदेशीर आहे.

सनबर्नवर उपचार

कॅमोमाइल चहा अ‍ॅन्टीऑक्सिडंट्स आणि अ‍ॅन्टीएम्फ्लामेट्री गुणांनी समृद्ध आहे. त्यामुळे सनबर्न बरा होते. यासाठी कॅमोमाइल चहा चांगला उकळावा आणि थंड करून सनबर्न झालेल्या ठिकाणी लावा. काही वेळातच परिणाम दिसू लागेल.

(वजन कमी करण्यासाठी सरळ नाही उलटं चाला; पाहा कसा फायदा होतो)

डोक्यातील कोंड्यासाठी

कॅमोमाइल चहाने डोक्यातील कोंडा जाऊन परत येत नाही. केस धुल्यानंतर, केसांवर कॅमोमाइल चहा लावावा. यामुळे डोक्यातील कोंडाची समस्या दूर होते.

First published:
top videos

    Tags: Health Tips, Lifestyle, Tea