मुंबई, 17 नोव्हेंबर: दिवाळी झाली.. भाऊबीजही संपली पण घरातले गोडधोड पदार्थ आणि फराळ अजूनही शिल्लक असेलच ना?. फराळ आणि गोडाचे पदार्थ खाल्यामुळे तुमच्यापैकी अनेकांचं डाएट कोलमडलं असेल. काही व्यायामाला दांडी मारली असेल. याचा परिणाम म्हणून आपलं वजन वाढत जातं. मग हे वाढलेलं वजन कसं नियंत्रणात आणायचं याचा स्ट्रेस येतो. आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे तुमचं वजन नियंत्रणामध्ये येईल.
सकाळी प्या लिंबू पाणी
तुमच्या दिवसाची सुरूवात लिंबू पाणी पिऊन करा. एक ग्लास गरम पाणी आणि अर्धा चमचा लिंबाचा रस रोज सकाळी घ्या. त्यामुळे तुमचं शरीर डिटॉक्स होतं.
आहारातलं प्रोटिन्सचं प्रमाण वाढवा
वजन कमी करायचं असेल तर शरीरातलं प्रोटिन वाढवण्याची गरज असते. तुमच्या जेवणामध्ये अंडी, चिकन, डाळी, फळांचा समावेश करा. हे पदार्थ खाल्ल्यामुळे भूक नियंत्रणामध्ये येते आणि कॅलरीज् कमी होण्यासही मदत होते. या पदार्थांचा आहारात समावेश केल्यामुळे वजम कमी होण्यास मदत होते.
फायबरयुक्त पदार्थांचं सेवन
फायबरला नॅचरल अँन्टिऑक्सिंडंट मानलं जातं. त्यामुळे फायबरयुक्त पदार्थांचा समावेश तुमच्या आहारात नक्की करा. पालेभाज्या, फळं, काकडी, यामध्ये भरपूर फायबर असतं.
थोड्याथोड्या वेळाने खात राहा
सतत थोड्याथोड्या वेळात खात राहिल्याने आपल्या शरीरातील उर्जेची गरज भरुन निघते. पण हाताच्या ओंजळीत येईल एवढाच आहार दर 2 तासांनी घ्यायला हवा.
भरपूर पाणी प्या
दिवाळीमध्ये खालेल्या फराळानंतर आपल्या शरीराला डिटॉक्स होण्याची गरज आहे. त्यामुळे दररोज 8 ते 9 ग्लास पाणी प्या. पाण्यामुळे तुमच्या शरीरात साठलेले टॉक्सिन बाहेर काढले जातील. योग्य प्रणामात पाणी प्यायल्यामुळे पचन संस्थाही सुधारते.
या पदार्थांचा आहारात समावेश करा
तुमच्या रोजच्या आहारामध्ये पालेभाज्या, गहू, डाळींचा समावेश करा. रोज एकतरी फळ खात जा. ज्या ऋतुमध्ये जी फळं बाजारात मिळतात ती फळं खा. आहारात ड्रायफ्रूट्सचाही समावेश करा.
पचायला हलकं अन्न खा
गेल्या काही दिवसांत भरपूर पदार्थ, मिठाई खाल्यामुळे तुमच्या पचनसंस्थेवर ताण आला असेल. त्यामुळे पुढचे काही दिवस हलका आहार घ्या. पचायला जड असलेलं अन्न शक्यतो वर्ज करा.
भरपूर पाणी प्या
दिवाळीच्या गडबडीमध्ये झोपेचं खोबरं झालं असेल तर आता तुमच्या झोपेचं बिघडलेलं चक्र पुन्हा ताळ्यावर आणि किमात 7 ते 8 तास झोप घेणं गरजेचं आहे. झोपायच्या आधी एक कपळ हळदीचं दूध प्या.