थंडीपासून त्वचा ठेवतील सुरक्षित, अशी घ्या काळजी

थंडीपासून त्वचा ठेवतील सुरक्षित, अशी घ्या काळजी

हे 10 सोपे उपाय तुमच्या त्वचेला थंडीपासून ठेवतील दूर

  • Share this:

मुंबई, 14 डिसेंबर: हिवाळ्यात आपली त्वचा रुक्ष होते किंवा फुटते. अशावेळी आपल्याला मेकअप करताना त्रास होतो. हिवाळ्यात त्वचेची अंतर्बाह्य स्वच्छता महत्त्वाची असते. ती काळजी नीट घेतली नाही तर वेगवेगळ्या रोगांना तुम्ही निमत्रण देतात. त्यामुळे त्वचेच्या गरजेनुसार त्याची व्यवस्थित काळजी घेणं आवश्यक असतं. हिवाळ्यात त्वचेची काळजी घेण्य़ाच्या काही खास सोप्या टीप्स ज्यामुळे तुमची त्वचा मुलायम आणि तजेलदार राहू शकते.

1. हिवाळ्यात आपली त्वचा रुक्ष होते त्यामुळे मॉईश्चराइझ करण्यासाठी त्वचेला क्रीम, खोबरेल तेल किंवा तूप लावू शकता. अगदी सोप म्हणजे अंघोळीच्या पाण्यात दोन थेंब खोबरेल तेल टाकल्यानं फायदा होतो.

2. पिकलेल्या पपईचा गर, काकडी त्वचेला लावल्यामुळे त्वचा तजेलदार होते.

3.त्वचेच्या गरजेप्रमाणे आणि शक्यतो डॉक्टरांच्या सल्ल्यानं मॉइश्चराइज वापरावं. त्यामुळे त्वचेला कोणतीही हानी होत नाही.

4. रात्री झोपण्याआधी दुधाची साय ओठांना आणि चेहऱ्याला लावून झोपा. दुधाची साय आवडत नसेल तर खोबरेल तेल चांगलं. काही तज्ज्ञ पेट्रोलियम जेली वापरण्याची सल्ला देतात. मात्र कोणतेही कॉस्मेटिक वापरण्याधी डॉक्टरचा सल्ला घेतला तर रिअॅक्शन उठणार नाही.

वाचा-सावधान! रंग गोरा होण्यासाठी क्रीम वापरणं घातक, आजारांना देताय निमंत्रण

5. हिवाळ्या तहान कमी लागत असली तरी पाणी पिणं आवश्यक आहे. त्यामुळे शरीराला आवश्यक आहे तेवढं पाणी पोटात जाणं गरजेचं असल्यानं पाणी टप्प्याने पण भरपूर प्या. तसेच उष्ण पदार्थांचं सेवन करा.

6. बाहेर जाताना अथवा प्रवासातून जाताना चेहऱ्यावर स्कार्फ बांधू शकता. बाहेरची धूळ आणि झोंबणारा वारा या दोन्हीपासून तुमचं संरक्षण होऊ शकतं. हिवाळ्यात कोमट पाण्याने चेहरा धुवा. अति गरम किंवा थंड पाण्याने त्वचेला हानी पोहचू शकते.

7. मेकअप करण्याआधी योग्य पद्धतीने मॉइश्चरायझर लावा आणि मेकअप काढून झाल्यानंतरही स्वच्छ कोमट पाण्यानं चेहरा धुवून पुन्हा क्रीम लावावी. त्यामुळे चेहरा आणि त्वचा फुटणार नाही.

8. आहारात स्निग्ध पदार्थाचा समावेश थंडीच्या दिवसात अधिक करावा. योग्य आहार घेण्यावर भर द्यावा. भरपूर पालेभाज्या, फळं, भाज्या, प्रथिनं खाण्यावर भर द्यावा. झोप आणि जेवणं वेळच्या वेळी करावं.

9. साबणाने त्वचा अधिक ड्राय होण्याची शक्यता असते. त्यामुळे साबणापेक्षा लिक्विड सोप्स वापरण्यावर भर दिला तर चांगलं. साबण लावताना त्यामध्ये कुठले कंटेट आहेत याची खातरजमा करून घ्यावी.

10. हिवाळ्यात तेलकट त्वचेची अधिक काळजी घ्यावी लागते. तेलकट त्वचा असणाऱ्यांनी आपल्या त्वचेची विशेष काळजी घ्यावी.

वाचा-सावधान! चिकन पॉक्स रोगाचा वाढतोय धोका, अशी घ्या काळजी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 14, 2019 11:18 AM IST

ताज्या बातम्या