मुंबई, 31 मार्च : आपले संपूर्ण शरीर हाडांवर अवलंबून असते. शरीराच्या वजनात हाडांचे वजन सर्वाधिक असते. जर आपली हाडे मजबूत नसतील तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल. विज्ञान सांगते की वयाच्या 20 व्या वर्षी हाडे पूर्णपणे विकसित होतात. यानंतर हाडांमध्ये जवळजवळ कोणतीही वाढ होत नाही. 30 वर्षांनंतर ते पूर्णपणे थांबते. पण म्हातारपणी हाडांची ताकद अबाधित राहण्यासाठी शरीरातील कॅल्शिअमची झीज होऊ देता नये. पण काही पदार्थ असे आहेत की, ज्यामुळे कॅल्शियमची कमतरता वाढते.
यामुळेच काहींना वृद्धापकाळात ऑस्टिओपोरोसिसचा आजार होतो. हा एक अतिशय वेदनादायक आजार आहे. त्यात उठणेही अवघड होऊन बसते. अशा वेळी कोणते अन्न जास्त खाल्ल्याने म्हातारपणात हाडे दगा देतील, हे जाणून घेतले पाहिजे. हाडांची मजबूती टिकवण्यासाठी कॅल्शियम व्यतिरिक्त व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन सी, प्रथिने आणि इतर अनेक खनिजे आवश्यक असतात. हे सर्व शरीरात योग्य प्रकारे शोषून घेताना, काही अन्नपदार्थांच्या अतिसेवनामुळे नुकसान होते.
पुरुषांपेक्षा स्त्रिया जगतात जास्त आणि कमी प्रमाणात पडतात आजारी, असे का? हार्वर्डने शोधलं उत्तर
हे पदार्थ टाळा
1. खारट गोष्टी टाळा : मेडिकल न्यूज टुडेच्या मते, बोन हेल्थ अँड ऑस्टियोपोरोसिस फाऊंडेशनने आपल्या अभ्यासात असे आढळून आले आहे की, जास्त खारट अन्न हाडांच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. यामुळे हाडांमधून कॅल्शियम कमी होते. अभ्यासानुसार, ब्रेड रोल, पिझ्झा, सँडविच, सूप, चिप्स, पॉपकॉर्न, स्नॅक मिक्स, क्रॅकर्स, चिकन, चीज, अंडी आणि ऑम्लेटमध्ये मीठ जास्त असते. या गोष्टींचे अधिक सेवन केल्याने हाडांमधून कॅल्शियम नाहीसे होऊ शकते.
2. अल्कोहोल : अल्कोहोलचे सेवन शरीरासाठी कोणत्याही अर्थाने चांगले मानले जात नाही, परंतु नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आर्थराइटिस आणि मस्कुलोस्केलेटलने आपल्या अभ्यासात सांगितले आहे की, अल्कोहोल शरीरात व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम शोषून घेण्यासाठी खलनायकाचे काम करते.
3. अधिक मिठाई : पबमेड सेंट्रलच्या अभ्यासात असे आढळून आले की, जास्त साखरेचे पदार्थ खाल्ल्याने कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम मूत्रमार्गे बाहेर पडतात. त्याच वेळी ते कॅल्शियमच्या शोषणात समस्या दर्शवते. कँडीज, पेस्ट्री, केक, प्रक्रिया केलेले अन्न, सॉस, डेझर्ट मिठाई इत्यादींमध्ये साखर जास्त असते.
तुम्ही इतके तास झोप घेत नसाल तर व्हा सावध, संपूर्ण शरीराच्या धमन्या होऊ शकतात ब्लॉक
4. उच्च ऑक्सलेट : काही पदार्थांमध्ये जास्त ऑक्सलेट आणि फायटेट्स संयुगे असतात. हे पदार्थ कॅल्शियमचे शोषण कमी करतात. म्हणून अशा अन्नाच्या सेवनाने शरीरात कॅल्शियमची कमतरता निर्माण होते. ज्यामुळे ऑस्टियोपोरोसिस होऊ शकतो. हे पदार्थ पालक आणि इतर हिरव्या पालेभाज्या, बीन्स आणि चहा आहेत. या गोष्टींचे सेवन कमी प्रमाणात करावे. खूप नुकसान होऊ शकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Lifestyle, Mental health