अ‍ॅसिडिटीवर उपाय म्हणून सोडा किंवा गोळ्या घेण्यापेक्षा करून बघा हे 5 सोपे उपाय

अ‍ॅसिडिटीवर उपाय म्हणून सोडा किंवा गोळ्या घेण्यापेक्षा करून बघा हे 5 सोपे उपाय

अ‍ॅसिडिटी (Acidity) , पित्त किंवा गॅसचा त्रास होतो तो मुख्यतः अपचनामुळे किंवा बराच काळ पोटात काही न गेल्याने. पोटाची काळजी घ्याल तर झटपट मिळेल आराम.

  • Share this:

अॅसिडिटीचा त्रास होतो किंवा पित्त खवळतं तेव्हा ते पचकनक्रिया बिघडल्याचं लक्षण असतं.

अ‍ॅसिडिटीचा त्रास होतो किंवा पित्त खवळतं तेव्हा ते पचकनक्रिया बिघडल्याचं लक्षण असतं.

भूक नसताना खाणं, अतिखाणं, अवेळी खाणं किंवा अजिबात उपाशी राहणं, दोन जेवणांमध्ये प्रचंड गॅप असणं ही आहेत याची कारणं. 5 सोपे लाईफस्टाईल चेंजेस केलेत तर अॅसिडिटी कायमची पळून जाईल.

भूक नसताना खाणं, अतिखाणं, अवेळी खाणं किंवा अजिबात उपाशी राहणं, दोन जेवणांमध्ये प्रचंड अंतर असणं ही आहेत याची कारणं. लाइफस्टाइलमध्ये 5 सोपे बदल केलेत तर अ‍ॅसिडिटी कायमची पळून जाईल.

तरुण वयात किंवा लहान वयात तेलकट- तूपकट किंवा जळजळीत खाल्लेलं पचतं. पण तीच सवय पुढे त्रासदायक ठरते. त्यामुळे अतितेलकट, चमचमीत दररोज खायची सवय पहिल्यांदा बदला.

तरुण वयात किंवा लहान वयात तेलकट- तूपकट किंवा जळजळीत खाल्लेलं पचतं. पण तीच सवय पुढे त्रासदायक ठरते. त्यामुळे अतितेलकट, चमचमीत दररोज खायची सवय पहिल्यांदा बदला.

आपल्या शरीराची गरज, प्रकृतीचे संकेत ओळखून त्याप्रमाणे वागायला शिका. म्हणजे भूक नसतानाही खाणं, पोट भरल्यानंतरही खाणं, भूक लागली तरी न जेवणं, जेवण लांबवणं हे टाळायला हवं.

आपल्या शरीराची गरज, प्रकृतीचे संकेत ओळखून त्याप्रमाणे वागायला शिका. म्हणजे भूक नसतानाही खाणं, पोट भरल्यानंतरही खाणं, भूक लागली तरी न जेवणं, जेवण लांबवणं हे टाळायला हवं.

शरीराला व्यायामाची गरज आहे. तरच अन्नपचन सुलभ होईल. त्यामुळे नियमत चालणं आणि व्यायाम नसेल तर गोळ्या घेऊनही अॅसिडिटी संपायची नाही.

शरीराला व्यायामाची गरज आहे. तरच अन्नपचन सुलभ होईल. त्यामुळे नियमत चालणं आणि व्यायाम नसेल तर गोळ्या घेऊनही अ‍ॅसिडिटी संपायची नाही.

भरपूर पाणी प्यायला हवं. अन्नपचनाच्या प्रक्रियेत अनेक आम्ल तयार होत असतात. त्याचं संतुलन राखण्याचं काम पाणी करतं. त्यामुळे पुरेसं पाणी प्यायलाच हवं. थंड पाण्याऐवजी कोमट पाणी प्यायलंत तर जास्त फायदा मिळेल.

तणाव हे प्रकृती अस्वास्थ्याचं मूळ कारण आहे. स्ट्रेस किंवा ताणामुळे अन्नपचन नीट होत नाही. आम्लपित्त वाढतं. त्यामुळे मन शांत ठेवा. टेन्शन घेऊ नका. कुठल्याही कामात किंवा छंदात एकाग्र व्हायचा प्रयत्न करा.

तणाव हे प्रकृती अस्वास्थ्याचं मूळ कारण आहे. ताणतणावामुळे अन्नपचन योग्यरित्या होत नाही. आम्लपित्त वाढतं. त्यामुळे मन शांत ठेवा. टेन्शन घेऊ नका. कुठल्याही कामात किंवा छंदात एकाग्र व्हायचा प्रयत्न करा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 25, 2019 07:40 AM IST

ताज्या बातम्या