मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Health Tips : हिवाळ्यात सुक्या मेव्याचं जास्त प्रमाण असं ठरू शकतं घातक, वाचा सविस्तर

Health Tips : हिवाळ्यात सुक्या मेव्याचं जास्त प्रमाण असं ठरू शकतं घातक, वाचा सविस्तर

ड्रायफ्रूट्स- 

ड्रायफ्रूट्समध्ये झिंक, लोह, व्हिटॅमिन-ई, ओमेगा 3 फॅटी अॅसिड्स इत्यादी भरपूर प्रमाणात असतात. कोणत्याही प्रकारचे संक्रमण वाढण्यापासून रोखण्यासाठी त्याचा फायदा होतो. अशा स्थितीत मुलांना सकाळी लवकर सुका मेवा खायला द्यावा.

ड्रायफ्रूट्स- ड्रायफ्रूट्समध्ये झिंक, लोह, व्हिटॅमिन-ई, ओमेगा 3 फॅटी अॅसिड्स इत्यादी भरपूर प्रमाणात असतात. कोणत्याही प्रकारचे संक्रमण वाढण्यापासून रोखण्यासाठी त्याचा फायदा होतो. अशा स्थितीत मुलांना सकाळी लवकर सुका मेवा खायला द्यावा.

हिवाळ्यात ड्रायफ्रुट्सचे सेवन करा, परंतु ते जास्त प्रमाणात केल्यास फायद्याऐवजी नुकसान होऊ शकतं. सुक्या मेव्याचं जास्त सेवन केल्यानं काय तोटे होतात, त्याविषयी जाणून घेऊया.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 18 डिसेंबर : हिवाळा (Winter) सुरू आहे आणि या ऋतूमध्ये आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाणारे ड्रायफ्रूट्स खाण्याचा सल्ला दिला जातो. पण तुम्हाला माहीत आहे का की, हिवाळ्यात जास्त प्रमाणात सुक्या मेव्याचं (Dry Fruits) सेवन केल्यास शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतात. वेगवेगळ्या प्रकारच्या ड्रायफ्रुट्समध्ये वेगवेगळे गुणधर्म असतात. परंतु, ते कसं सेवन करावं, हेदेखील महत्त्वाचं आहे. हिवाळ्यात ड्रायफ्रुट्सचं (Dry Fruits in Winter) जास्त सेवन टाळलं पाहिजे. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक चांगला नसतो, हे सुक्या मेव्याच्या सेवनाबाबतही खरं आहे.

ड्रायफ्रुट्सचे सेवन करा, परंतु ते जास्त प्रमाणात केल्यास फायद्याऐवजी नुकसान होऊ शकतं. सुक्या मेव्याचं जास्त सेवन केल्यानं काय तोटे होतात, याविषयी 'टीव्ही 9' नं माहिती दिली आहे.

लठ्ठपणाची समस्या होऊ शकते

ड्रायफ्रुट्स वजन कमी करण्यातही उपयुक्त ठरतात, असं म्हटलं जातं. परंतु वजन कमी करण्यासाठी ते कसं खावं हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. ड्रायफ्रूट्स जास्त खाल्ले तर वजन वाढतं, असंही काहीजण सांगतात. कारण, काही ड्रायफ्रुटसमध्ये स्निग्धांश (तेलकटपणा) असतो. उदा., बदाम, काजू आदी. अशा प्रकारचा सुका मेवा जास्त खाल्ल्यानं तितक्या प्रमाणात तेल शरीरात जातं.

हे वाचा - Mutual Fund : SIP सुरु करण्याची योग्य तारीख कोणती? पेमेंट वेळेत न झाल्यास काय होतं?

अतिसार

जास्त ड्रायफ्रुट्स खाल्ल्यानं पोटाच्या समस्या निर्माण होतात. पोट बिघडल्यामुळं तुम्हाला डायरियासारख्या गंभीर आजारांनाही सामोरं जावं लागू शकतं. याशिवाय, अपचन, पोटदुखी, बद्धकोष्ठता यासारख्या समस्याही उद्भवू शकतात. यासाठी ड्रायफ्रुट्सचं अतिरिक्त सेवन टाळलं पाहिजे.

हे वाचा - Omicron ची तिसरी लाट आली तर दररोज 14 लाख रुग्ण सापडतील – तज्ज्ञांचा गंभीर इशारा

शरीरातील पाणी कमी होणं

ड्रायफ्रुट्सच्या अतिसेवनामुळं शरीरात असलेलं पाणी ते पचण्यासाठी वापरलं जातं. यामुळे तुमच्या शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊ शकते. त्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्येची शक्यता वाढते. त्यामुळं त्यांचं जास्त प्रमाणात सेवन करणं टाळा.

(सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Health, Health Tips