Home /News /lifestyle /

Health Tips : खरंच? उभं राहून पाणी प्यायल्याने पायांना होतो त्रास? काय आहे यामागचे सत्य?

Health Tips : खरंच? उभं राहून पाणी प्यायल्याने पायांना होतो त्रास? काय आहे यामागचे सत्य?

जेवताना आपण कशा पद्धतीने (Eating Habits) काय खातो. याचा आपल्या आरोग्यावर खूप परिणाम होतो. काही लोकांचे असे म्हणणे असते की, उभे राहून पाणी पिल्याने आपले गुडघे खराब होऊ शकतात.

  मुंबई, 24 जून : हल्ली धावपळीच्या काळात आपल्याला सगळ्याच गोष्टी वेगाने करण्याची सवय असते. भराभर यावरून कामासाठी निघणे, फटाफट जेवण करणे, घटाघटा पाणी पिणे. आपण सर्वच गोष्टी धावत पळत आणि वेगाने करतो. मात्र हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय हानीकारक असते. जेवताना आपण कशा पद्धतीने (Eating Habits) काय खातो. याचा आपल्या आरोग्यावर खूप परिणाम होतो. मात्र पाणी पिताना आपण ते कशा पद्धतीने पितो (Water Drinking Habits) यावरही आपले आरोग्य अवलंबून असते का ? खरंच उभे राहून पाणी पिल्याने (Drinking Water In Standing Position) आपले गुडघे खराब होणे, सांधेदुखी, किडनी आणि लिव्हर डॅमेज अशा समस्या होऊ शकतात का ? आज आम्ही तुम्हाला याच सर्व प्रश्नांची उत्तरे देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया उभे राहून पाणी पिल्याने आपल्या शरीरावर काय परिणाम होता. काही लोकांचे असे म्हणणे असते की, उभे राहून पाणी पिल्याने आपले गुडघे खराब (Knee Damage) होऊ शकतात. असे केल्यास पाणी आपल्या शरीरात वेगाने संचार करते आणि ते थेट गुडघ्यामध्ये जाऊन जमा होते. मात्र असे अजिबात नाहीये. टीव्ही नाईनमध्ये दिलेल्या माहितीनुसार, उभे राहून पाणी पिल्याने असा काही त्रास होतो हे सांगणारी कोणतीही रिसर्च आतापर्यंत समोर आलेली नाही. आपण जे काही खातो किंवा पितो ते सर्व आपल्या अन्ननलिकेद्वारे आपल्या पोटात जाते. त्यानंतर मग आपल्या आतड्यांपर्यंत पोहोचते आणि तिथे ते शोषले जाते.

  घरासाठी प्लॉट खरेदी करताना या 8 गोष्टींची काळजी घ्या; नंतर पश्चाताप नाही होणार

  पाणी रक्तासोबत वाहते आणि शरीरातील सर्व भागांपर्यंत पोहोचते. त्यामुळे या गोष्टींमध्ये काहीही सत्य नाही की उभे राहून पाणी पिल्याने आपल्या पायांना त्रास होतो किंवा आपले गुडघे खराब होतात. उभे राहून पाणी पिण्याचे काही तोटे नसले. तरीदेखील पाणी पिताना ते शांतपणे आणि बसून प्यावे. कारण वेगाने पाणी पिल्यामुळे ते पचनक्रियेवर परिणाम करू शकते. त्यामुळे पाणी पिताना शांतपणे, हळूहळू आणि बसूच प्यावे. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
  Published by:Pooja Jagtap
  First published:

  Tags: Drink water, Health Tips, Lifestyle

  पुढील बातम्या