उपवास करण्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होतं? काय आहे सत्य

उपवास करण्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होतं? काय आहे सत्य

उपवास केल्यामुळे वजन कमी होतं आणि त्यासोबतच अनेक आजारांपासून राहाल दूर.

  • Share this:

मुंबई, 12 डिसेंबर: काही लोक वजन कमी करण्यासाठी फिटनेस राखण्यासाठी उपवास करतात तर काही लोक श्रद्धा म्हणून व्रत वैकल्य करत असतात. ह्या व्रतामधील सर्वात महत्त्वाचा भाग हा आहार असतो याचा आपण कधी विचार केला आहे का? उपवासादरम्यान योग्य आहार घेणं आवश्यक असतं. हा आहार जर उत्तम आणि योग्य पद्धतीनं घेतला तर याचे शरीराला दीर्घकालीन फायदे होतात. अन्यथा तुम्हाला वेगवेगळे आजारही होण्याचा धोका असतो. उदा. साबुदाणा खिचडी, बटाटा अधिक खाल्ल्यामुळे तुम्हाला गॅसचा त्रास, पोटदुखीची संभावना निर्माण होऊ शकते. त्यामुळे निरोगी आणि फिटनेस राखण्यासाठी उपवास करतानाही आहारात नेमकं काय खावं आणि कशापद्धतीनं यावर एक रिसर्च करण्यात आला आहे. या अहवालातून मिळालेल्या माहितीनुसार आज आम्ही तुम्हाला काही उपवासादरम्यान आहाराच्या खास टीप्स सांगणार आहोत.

वाचा-मुळा खाण्याचे 5 फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

अहवालातून समोर आलेल्या माहितीनुसार दिवसातील 14 तास तुम्ही उपवास केल्यामुळे वजन कमी होऊ शकतं आणि तुमच्या रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात राहू शकतं. अशा लोकांना डायबेटीस, हृदयविकाराचा झटका, स्ट्रोकसारख्या आजाराचा धोका कमी असतो. अभ्यासानुसार 10 तास खाणं आणि 14 तास उपवास करण्याचे शरीराला दीर्घकालीन फायदे होतात.

कोलेस्ट्रॉल घटण्यास मदत- सॅन डिआगोच्या कॅलिफोर्निया यूनिवर्सिटीने केलेल्या संशोधनानुसार 10 तासांत जेवण करण्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. शरीरातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी होतं. टप्प्या टप्प्यानं उपवास करण्याचेही शरीराला फायदे आहेत मात्र अशावेळी तुमचा आहार हेल्दी असणं आवश्यक आहे.

उपवासादरम्यान काय काळजी घ्यावी

पाणी भरपूर प्यावं. अशावेळी पोटात पाण्याचं प्रमाण कमी होतं आणि थकवा जाणवू शकतो. त्यामुळे पाणी प्या.

चहा ऐवजी दुध घेण्यावर भर दिला तर त्याचा फायदा होऊ शकतो. चहामुळे शरीरात पित्ताचं प्रमाण वाढतं.

बटाटा, साबुदाणासारखे पचायला जड असणारे पदार्थ शकतो खाणं टाळावे. ते पदार्थ  पचायला जड असल्यानं पोटाचे विकार होण्याचा धोका असतो. याशिवाय अति तेल शरीराला चांगलं नसतं. यासोबत तुम्ही फळ खाऊ शकता. फळांमुळे तुम्हाला विटॅमिन मिळतात आणि फळांच्या जूसपासून तुमचं पोटही भरू शकतं.

वाचा-यंदाच्या हिवाळ्यात हे आहेत जॅकेटचे ट्रेंडी आणि हटके पर्याय!

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 12, 2019 02:47 PM IST

ताज्या बातम्या