मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /वेळीच द्या लक्ष! पायावर येणारी सूज ‘या’ 5 आजारांचं लक्षण असू शकते

वेळीच द्या लक्ष! पायावर येणारी सूज ‘या’ 5 आजारांचं लक्षण असू शकते

किडनी संदर्भात काही त्रास असतील तर, पायावर सूज येण्याची शक्यता असते.

किडनी संदर्भात काही त्रास असतील तर, पायावर सूज येण्याची शक्यता असते.

Reason of Swelling on Feet: कधीकधी अंगावर नाही तर, पायावर सूज येत राहते पण, बरेच जण त्याकडे दुर्लक्ष करतात. खरंतर पायावर सूज येणं हे काही आजारांचं लक्षण असू शकतं.

नवी दिल्ली, 1 ऑगस्ट :  काही लोकांना ठराविक दिवसांनंतर अंगावरती सूज येतं राहते. शक्यतो पायावर ही सूज (Swelling on Feet) जास्त प्रमाणात दिसते. मात्र, याकडे लोक दुर्लक्ष (Ignore) करतात. कधीकधी जखमेमुळे, मुरगळल्यामुळे सूज येऊ शकते किंवा ज्या लोकांना दिवसभर खुर्चीवर बसून काम (Seating Work) करावं लागतं. त्यांना पाय लटकत राहील्यामुळे सूज येण्याचा त्रास होऊ शकतो. पण, सूज येण्याच्या त्रासाकडे दुर्लक्ष केलं जातं मात्र, पायावर किंवा अंगावर सूज येणं हे काही आजारांचं लक्षण (Symptoms of Diseases) असतं. पायावर सूज येण्याबरोबरच छातीमध्ये दुखणं आणि श्वासोच्छव घेण्यास त्रास होणं अशी लक्षणे दिसत असतील तर, तात्काळ डॉक्टरांचा सल्ला (Doctors Advice) घेणं आवश्यक आहे. पायावर सूज येणं हे 5 गंभीर आजारांचं लक्षण मानलं जातं.

किडनीचा त्रास

किडनी संदर्भात काही त्रास असतील तर, पायावर सूज येण्याची शक्यता असते. किडनी व्यवस्थित काम करत नसेल तर, शरीरामध्ये फ्लूड जमायला लागतं. यामुळे श्वासोच्छवासाचा त्रास, पायांवर सूज येणं, लघवी करताना त्रास, थकवा अशी लक्षणं दिसायला लागतात. पायावर सूज दिसताच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कारण हे किडनी संदर्भातल्या आजाराचं पहिलं लक्षण आहे.

(औषधांमुळे गेली तोंडाची चव? तुम्हाला आश्चर्य वाटेल पण, एरंडेल तेल ठरेल फायद्याचं)

हृदय रोग

बऱ्याचदा हृदय व्यवस्थित काम करत नसेल तर, रक्ताभिसरण होत नाही. अशा परिस्थितीमध्ये पाणी आणि मीठ रिटेन्शन होऊ लागतं. या परिस्थितीमध्ये पायावर सूज येते. याशिवाय हृदय वेगाने धडधडणं, श्वास घ्यायला त्रास, थकवा येणे, अशक्तपणा जाणवणे, भूक कमी लागणे ही लक्षणं दिसायला लागतात.

लिव्हरचा त्रास

एल्बुमिन नावाचं प्रोटीन आपल्या ब्लड वेसल्स मधून रक्त बाहेर निघण्यास मज्जाव करतं पण, काही वेळा लिव्हर एल्बुमिन तयार करणं बंद करतो. अशा परिस्थितीमध्ये शरीरात या प्रोटीनची कमतरता निर्माण होते. त्यामुळे पेशी मधून रक्त लिक व्हायला लागतं. त्यामुळे पायाजवळ सूज यायला लागते. याशिवाय कावीळ, लघवीच्या रंगात बदल, अशक्तपणा अशी लक्षणं देखील लिव्हर खराब झाल्यास दिसायला लागतात.

(रक्षाबंधनआधी मिळवा इन्स्टंट ग्लो; घरच्या घरी लव्हेंडर, मधाचा फेस पॅक वापरून पाहा)

लिम्फेडेम

आपल्या शरीरातील लिम्फॅटिक सिस्टीम शरीरामधील विषारी घटक आणि बॅक्टेरिया बाहेर टाकत असतं. ही सिस्टीम व्यवस्थित काम करत नसेल तर, शरीरात टॉक्सिन्स वाढायला लागतात. या परिस्थितीमध्ये इन्फेक्शन होऊन हातापायांवर सूज येते. कधीकधी संपूर्ण शरीरावर सूज येऊ शकते.

हायपोथायरॉईडीझम

हायपोथायरॉईडीझम असणाऱ्या व्यक्तींना देखील शरीरावर येण्याचा त्रास असतो. यामध्ये थायरॉईडच्या ग्रंथी पुरेसे हार्मोन तयार करत नाहीत. त्यामुळे मेटाबोलिजम नियंत्रणात राहत नाही. परिणामी रोगप्रतिकारक क्षमता कमी होणं, श्वसनाचे विकार यासारखे त्रास देखील दिसायला लागतात.

(थंडीनंतर घरात पडून राहिली आहे का पेट्रोलियम जेली? ‘या’ पद्धतीने करा वापर)

याशिवाय पायवर सुज येण्याची इतरही कारणं असू शकतात.

अति वजन

म्हातारपण

प्रेग्नेन्सी

पायांना इन्फेक्शन

डायबिटीस

पाय घोटा किंवा पावलावर चखम

शस्त्रक्रिया

ही सुद्धा पायावर सुज येण्याची कारणं असू शकतात.

First published:

Tags: Health, Lifestyle