उपाशी पोटी 'या' 5 गोष्टी खाल्ल्यामुळे होऊ शकतात पोट आणि हृदयाचे विकार

उपाशी पोटी 'या' 5 गोष्टी खाल्ल्यामुळे होऊ शकतात पोट आणि हृदयाचे विकार

हेल्दी डाएट करण्याच्या नादात तुम्ही उपाशी पोटी या गोष्टी तर खात नाही ना?

  • Share this:

मुंबई, 18 जानेवारी: धावपळीच्य़ा वेळापत्रकात आपल्या व्यायामाकडे फार लक्ष देणं होत नाही.त्यामुळे सकार आणि हेल्दी आहार घेण्यावर भर घेतला जातो. आहारात सकाळच्या वेळी उपाशीपोटी हेल्दी पदार्थांमध्येही काय खावं हे पाहाणं महत्त्वाचं आहे. उपाशिपोटी तुम्ही या पाच पदार्थांचं सेवन केलं तर तुम्हाला पोटाच्या समस्या आणि हृदयाचे विकार होण्याचा धोका असतो. हे टाळण्यासाठी काही गोष्टींची वेळीच काळजी घेणं महत्त्वाचं असतं. उपाशीपोटी कोणते पदार्थ खाऊ नयेत याबद्दल थोडं जाणून घ्या.

1.दही आणि योगर्ट

उपाशी पोटी सकाळी तुम्ही जर योगर्ट किंवा दही खात असाल आणि तुमचा असा समज असेल की हे हेल्दी आहे तर चूक आहे. उपाशीपोटी सकाळी दोन्ही पदार्थ खाऊ नयेत. हे पदार्थ सकाळी खाल्ल्यानं पोटात हाइड्रोक्लोरिक अॅसिडचं प्रमाण वाढण्याचा धोका आहे.

2.पेर

रोज नाश्तात एक फळ खाणं आरोग्यासाठी उत्तम असलं तरीही पेर खाणं टाळावं. पेरमध्ये क्रूड फायबरचं प्रमाण अधिक असतं. जे आपल्या पोटासाठी आणि पचनासाठी घातक आहे. त्यामुळे अपचनाचा त्रास वाढू शकतो.

3.टोमॅटो

काही जण सकाळी नाश्त्यामध्ये कच्च्य़ा टोमॅटोचा समावेश करतात. किंवा सॅडविच खातो त्यामध्ये जास्त टोमॅटो असतो. टोमॅटोमध्ये व्हिटामिन सीचं प्रमाण अधिक असतं. त्यासोबत आम्ल असल्यानं टोमॅटो शरीरातील अॅसिडिटीचं प्रमाणं वाढवतो. त्यामुळे ज्यांना पित्त आहे अशांनी त्याचं सेवन तर टाळावंच पण सकाळीही टोमॅटो खाऊ नये.

हेही वाचा-'या' 7 गोष्टींनी दिवसाची सुरवात करणं ठरेल फायदेशीर!

4.काकडी

काकाडीचा गुणधर्म थंड असतो. डाएट करणारे सर्वजण सकाळी काकडीचं सेवन करतात. मात्र त्यामुळे हृदयाच्या समस्या होऊ शकतात. त्यासोबतच सर्दी, खोकला होण्याचा धोका असतो.

5.आंबड फळ

संत्र, मोसंब यांसरख्या आंबट पदार्थांचं सेवन उपाशीपोटी टाळावं. त्यामुळे अॅसिडिटी होण्याचा धोका असतो. त्यामुळे आंबट फळ खाणं टाळावं.

हेही वाचा-सतत कुरकुर करणाऱ्या, तक्रारी करणाऱ्या व्यक्ती तुमच्या आसपास आहेत का?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 18, 2020 07:22 AM IST

ताज्या बातम्या