मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

या 4 गोष्टींबद्दल गैरसमज नकोत! अ‌ॅसिडिटी आणि गॅसेसच्या समस्या असतील तर आवर्जून खा

या 4 गोष्टींबद्दल गैरसमज नकोत! अ‌ॅसिडिटी आणि गॅसेसच्या समस्या असतील तर आवर्जून खा

Diet Plan For Acidity Patient: अनेक वेळा योग्य आहाराअभावी लोकांना अ‌ॅसिडिटीच्या (Acidity) समस्येला सामोरे जावं लागतं. ही समस्या सामान्य असू शकते, परंतु काहीवेळा ते गंभीर स्वरूप धारण करते.

Diet Plan For Acidity Patient: अनेक वेळा योग्य आहाराअभावी लोकांना अ‌ॅसिडिटीच्या (Acidity) समस्येला सामोरे जावं लागतं. ही समस्या सामान्य असू शकते, परंतु काहीवेळा ते गंभीर स्वरूप धारण करते.

Diet Plan For Acidity Patient: अनेक वेळा योग्य आहाराअभावी लोकांना अ‌ॅसिडिटीच्या (Acidity) समस्येला सामोरे जावं लागतं. ही समस्या सामान्य असू शकते, परंतु काहीवेळा ते गंभीर स्वरूप धारण करते.

  • Published by:  News18 Desk
नवी दिल्ली, 19 ऑक्टोबर : अनेक वेळा योग्य आहाराअभावी लोकांना अ‌ॅसिडिटीच्या (Acidity) समस्येला सामोरे जावं लागते. ही समस्या सामान्य असू शकते, परंतु काहीवेळा ते गंभीर स्वरूप धारण करते आणि लोकांच्या समस्या वाढू लागतात. अॅसिडिटी आणि गॅस्ट्रिकच्या (Gastric) समस्यांमुळे बरेच लोक त्रस्त आहेत. यामागील कारण गरम पदार्थ किंवा तळलेले अन्न जास्त प्रमाणात खाणे असू शकते. अशा गोष्टी खाल्ल्याने अपचन आणि पोटात गॅसची समस्या निर्माण होते. जर या गोष्टी टाळायच्या असतील तर आहारात थोडा बदल आवश्यक (Diet Plan For Acidity Patient) आहे. आम्लपित्ताने त्रस्त असलेल्या लोकांनी कोणत्या गोष्टींचे सेवन करावे आणि त्यांचे खाणे-पिणे कले असावे याबद्दल माहिती घेऊ. केळी नक्की खा केळी शरीरासाठी अतिशय आरोग्यदायी असते. त्यात कॅल्शियम आणि लोह भरपूर आहे. केळी खाल्ल्याने पोटात गॅस होत नाही. हे अँटी-ऑक्सिडंट्स आणि पोटॅशियम सारख्या पोषक तत्वांनी समृद्ध आहे. त्यामुळं अ‌ॅसिड रिफ्लेक्स कमी होते. याशिवाय, केळी पोटाच्या आवरणावर श्लेष्मा तयार करते, ज्यामुळं पीएच पातळी कमी राहते. केळ्यात भरपूर फायबर असते जे आंबटपणा नियंत्रित करते. टरबूज खाल्ल्याने अ‌ॅसिडिटी होत नाही टरबूज शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण करते. त्याच्या सेवनामुळे पोट भरल्यासारखं वाटतं आणि गॅस तयार होण्यास जागाच उरत नाही. टरबूजात केळीसारखे भरपूर फायबर असतात, जे अन्न पचवण्यासाठी खूप उपयुक्त असल्याचे सिद्ध झाले आहे. जर अन्न व्यवस्थित पचले तर पोटात गॅस तयार होत नाही. जर तुम्ही अ‌ॅसिडिटीच्या समस्येने त्रस्त असाल तर टरबूजचे सेवन नक्की करा. हे वाचा - याला म्हणतात दरारा! ऐटीत एण्ट्री करत उंदरानं केली मांजराची हवा टाईट; पाहा VIDEO काकडी आहे फायदेशीर काकडी खाल्ल्याने दिवसभर पोट थंड राहते. काकडीमध्ये भरपूर पाणी असते जे शरीराला हायड्रेटेड ठेवते. काकडी खाल्ल्याने उन्हाळ्यात डिहायड्रेशनची समस्या जाणवत नाही. ते खाल्ल्याने अ‌ॅसिड रिफ्लेक्स कमी होते आणि अ‌ॅसिडीची आणि गॅसची समस्या दूर करते. नारळाचे पाणी प्यावे ज्या लोकांना सकाळी चहा किंवा कॉफी प्यायल्याने पोट फुगल्यासारखं वाटतं किंवा गॅस आणि अ‌ॅसिडिटीची समस्या होऊ लागते, अशा लोकांनी नारळाच्या पाण्याचे सेवन करावे. सकाळी लवकर नारळाचे पाणी प्यायल्याने शरीर डिटॉक्स होते. नारळाच्या पाण्यात भरपूर फायबर आणि अँटी-ऑक्सिडंट्स असतात जे शरीराचे पचन योग्य ठेवतात. दुसरीकडे, नारळाचे पाणी प्यायल्यानेही अ‌ॅसिडिटी होत नाही. हे वाचा - ‘त्या वेदना आवडतात…’; अविवाहित महिलेला लागली मुलं जन्माला घालायची चटक; आतापर्यंत 8 मुलांना दिलाय जन्म एक ग्लास थंड दूध प्या दूध प्यायल्याने हाडे मजबूत होतातच पण पोटाचे आजारही बरे होतात. सकाळी एक ग्लास थंड दूध प्यायल्याने पोटात जळजळ होत नाही. हे भूक नियंत्रित करते तसेच दिवसभर पोट थंड ठेवते. यामुळे आंबटपणा आणि जठरासंबंधी समस्या देखील नाहीशा होतात. (सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
First published:

Tags: Health, Health Tips

पुढील बातम्या