मुंबई, 31 मार्च : कोट्यवधी लोक मधुमेहाच्या समस्येशी झुंजत आहेत. हा आजार साथीच्या रोगासारखा पसरला आहे. सर्व वयोगटातील लोक या समस्येचा सामना करत आहेत. मधुमेहामुळे रक्तातील साखर वाढते आणि त्यामुळे शरीराच्या इतर अवयवांवर परिणाम होऊ लागतो. या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांनी रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी खाण्या-पिण्यापासून आपली जीवनशैली चांगली ठेवण्याची गरज आहे.
काही घरगुती उपाय देखील मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास मदत करू शकतात. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की तुमच्या स्वयंपाकघरात ठेवलेली एक भाजी मधुमेहावर उत्तमरित्या मात करू शकते. फक्त तुम्हाला या भाजीचे योग्य प्रकारे सेवन करावे लागेल. संशोधनात ही बाब समोर आली आहे.
पुरुषांपेक्षा स्त्रिया जगतात जास्त आणि कमी प्रमाणात पडतात आजारी, असे का? हार्वर्डने शोधलं उत्तर
ब्रिटिश वेबसाइट एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार,अमेरिकेतील सॅन डिएगो एंडोक्राइन सोसायटीची वार्षिक बैठक येथे झाली. यामध्ये काही संशोधकांनी एक संशोधन मांडले. या संशोधनात असे आढळून आले आहे की, कांदा मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर ठरतो. कांद्याच्या मदतीने रक्तातील साखरेची पातळी बऱ्याच अंशी कमी करता येते.
हे संशोधन करणाऱ्या संशोधकांचे म्हणणे आहे की, रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी कांदा हा सर्वात स्वस्त आणि प्रभावी उपाय मानला जाऊ शकतो. फक्त काही रुपयांचा कांदा चमत्कारिक पद्धतीने तुमची रक्तातील साखर कमी करू शकतो. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे कांद्याचे सेवन केल्याने दुष्परिणाम होण्याचा धोकाही खूप कमी असतो. अशा परिस्थितीत त्याचे सेवन करण्याची योग्य पद्धत जाणून घेतली पाहिजे.
कांदा अशा प्रकारे नियंत्रित ठवतो मधुमेह
संशोधकांचे म्हणण्यानुसार, मधुमेहाच्या रुग्णांनी कांद्याचा अर्क सेवन करावा. कांद्याचा अर्क रोज सेवन केल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण ५० टक्क्यांनी कमी होऊ शकते. संशोधकांनी कांद्याचे वर्णन रक्तातील साखर नियंत्रित करण्याचा सर्वात स्वस्त आणि सहज उपलब्ध मार्ग म्हणून केला आहे. हे संशोधन उंदरांवर करण्यात आले.
या अभ्यासादरम्यान, मधुमेही उंदरांना दररोज 200, 400 आणि 600 मिलीग्राम कांद्याचा अर्क देण्यात आला. त्याचे परिणाम आश्चर्यकारक होते. या उंदरांच्या रक्तातील साखरेमध्ये 35 ते 50 टक्के घट नोंदवली गेली. विशेष म्हणजे उंदरांचे वजन वाढले नाही. त्यामुळे कांद्याचा रस रक्तातील साखरेसोबतच वजनही नियंत्रित करू शकतो असा विश्वास ठेवता येतो.
तुम्ही इतके तास झोप घेत नसाल तर व्हा सावध, संपूर्ण शरीराच्या धमन्या होऊ शकतात ब्लॉक
आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे कांदा
कांदा आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर मानला जातो. उन्हाळ्यात कांद्याचे सेवन केल्याने उष्माघातापासून बचाव होतो. कांद्याच्या अर्काचे सेवन केल्याने शरीरात जमा झालेले कोलेस्ट्रॉल कमी होण्यासही मदत होते. कांदा हृदयाचे आरोग्य आणि हाडांची घनता वाढवतो. कांदा खाल्ल्याने पचनशक्तीही सुधारते. कांद्यामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात आणि त्यात अनेक फायदेशीर पोषक घटक असतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Health Tips, Lifestyle