मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

नाश्ता करताना या 10 गोष्टी लक्षात ठेवल्यात तर आरोग्य राहिल उत्तम

नाश्ता करताना या 10 गोष्टी लक्षात ठेवल्यात तर आरोग्य राहिल उत्तम

आपलं आरोग्य जपण्यासाठी काही सोप्या आणि खास टिप्स करून पाहून शकता. त्यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवणार नाहीत.

आपलं आरोग्य जपण्यासाठी काही सोप्या आणि खास टिप्स करून पाहून शकता. त्यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवणार नाहीत.

आपलं आरोग्य जपण्यासाठी काही सोप्या आणि खास टिप्स करून पाहून शकता. त्यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवणार नाहीत.

  • Published by:  Kranti Kanetkar

मुंबई, 15 जानेवारी: धावपळीच्या वेळापत्रकात स्वत:कडे लक्ष देण्यासाठी वेळ नसतो अशावेळी आपण पटकन बाहेरचं अथवा अरबट-चरबट काहीतरी खातो ज्यामुळे आपलं आरोग्य बिघडतं. आपलं आरोग्य जपण्यासाठी काही सोप्या आणि खास टिप्स करून पाहून शकता. त्यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवणार नाहीत. पोट कमी करण्यासाठी आपण नेहमी काहीना काही प्रयत्न करत असतो. व्यायाम करतो, जेवण कमी करतो. आता हीच चरबी कमी करण्याकरता एक सोपा उपाय आहे. दररोज सकाळचा नाश्ता काळजीपूर्वक करा आणि फिट राहा.

सकाळच्या नाश्त्याचे अनेक फायदे आहे. यामुळे आपलं वजन वाढत नाही. चरबी कमी करण्यासाठी उत्तम नाश्ता करणं गरजेचं असतं.

नाश्त्यासाठी काय महत्त्वाचं?

केळी-केळ्यापासून भरपूर ऊर्जा मिळते. त्यामुळे रोज सकाळी दोन केली खायला हवीत. केळ्यापासून आपल्याला पोटॅशियम, अ,ब,क,ड,ई जीवनसत्त्वे, कॅल्शिअम व फॉस्फरस मिळतं. पिकलेली केळी खाल्ल्यानं शरीरातील हिमोग्लोबिन आणि कमी असलेल्या पांढऱ्या पेशी वाढतात.

पोहे-सकाळच्या वेळी पोहे चांगले असतात. यामध्ये कॅलरीज कमी असतात. शिवाय़ पोटही भरतं. तेलकट पदार्थ खाण्यापेक्षा वेगवेगळ्या प्रकारचे पोहे तुम्ही खाऊ शकता.

अंड- नाश्तामध्ये अंड्याचा समावेश करावा. तुम्ही उकडलेलं अंड किंवा आमलेट खाऊ शकता. एका अंड्यामधून 6 ग्रॅम प्रोटिन्स मिळतात. व्हिटॅमिन ‘ए’, ‘बी’ आणि ‘डी’, कॅल्शियम, फॉस्फरस, ल्युटेन आणि कोलाइन यांसारखे पोषक घटक असतात. अंडं खाल्ल्याने शरीराला पोषक घटकांचा पुरवठा होतो. दररोज केवळ एक अंडं खाल्याने तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहू शकता.

हेही वाचा-Vegan चा फंडा : बटर, चीजच नव्हे तर दूध, दहीसुद्धा खात नाहीत हे सेलेब्रिटी

सोया-न्याहारीमध्ये सोयाची जोड द्या. त्यात कॅलरीज कमी आणि प्रोटिन्स जास्त असतात. शरीरावर चरबी जमा होत नाही. सोया दूध घेता आलं तरीही उत्तम.

फळं-रोज नाश्त्यामध्ये फळं असायला पाहिजेत. शक्यतो सिझनप्रमाणे फळं खावीत. त्यामुळे शरीरालाही सगळ्या फळांची सवय होते.

दूध-दूध सगळ्यांनाच पचत नाही. पण ज्यांना पचतं त्यांनी ते प्यावं. त्यामुळे दिवसभराची ऊर्जा शाबूत राहते. दुधातून कॅल्शियम मिळतं. त्यामुळे हाडं मजबूत होण्यास मदत होते.

ग्रीन टी-ग्रीन टी घेतल्यानं पचनक्रिया चांगली राहते.

सँडविच-काकडी,टोमॅटो,कांदा,बिट याचं सँडविच बनवून खा

ओट्स-आहारात ओट असणं कधीही चांगलं. त्यात फायबर्स असतात.

हे खाऊ नका- पेस्ट्रीज,डोनट्स आणि केक : त्यानं तुमच्या कॅलरीज वाढतात. चहा आणि कॉफीचं सेवन सकाळी करणं शक्यतो टाळावं. उपाशीपोटी हे घेतल्यामुळे पचनक्रीयेवर विपरीत परिणाम होतो.

हेही वाचा-Makar Sankranti 2020: राशीनुसार जाणून घ्या, कशी असेल यंदाची मकर संक्रांत

First published:

Tags: Health lifestyle, Health tips, Lifestyle news