Home /News /lifestyle /

झोपण्याच्या पद्धतीमुळेही होतो Sex लाइफवर परिणाम; पाहा कसं झोपावं?

झोपण्याच्या पद्धतीमुळेही होतो Sex लाइफवर परिणाम; पाहा कसं झोपावं?

वजन नियंत्रणात राहण्यासाठी पूर्ण झोप अत्यंत आवश्यक आहे.

वजन नियंत्रणात राहण्यासाठी पूर्ण झोप अत्यंत आवश्यक आहे.

योग्य पद्धतीने झोपलं (Sleeping Position) नाहीतर पाठदुखी, मानदुखी, ब्लडप्रेशर आणि घोरण्याचाही त्रास होतो.

    नवी दिल्ली, 27 जुलै : उत्तम आरोग्यासाठी (Health) चांगल्या आहाराबरोबरच चांगली झोपही (Sleep) आवश्यक असते. झोप पूर्ण झाली नाही तर, अनेक त्रास उद्भवतात. आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम (Side Effect) होतो. ज्यांची झोप पूर्ण होत नाही त्यांना ब्लडप्रेशर (Blood Pressure) सारखे हृदयाशी संबंधित त्रास व्हायला  लागतात. याशिवाय लैंगिक आरोग्यावरही परिणाम (Effect On Sex Life)  होतो. त्यामुळेच आरोग्य तज्ज्ञांच्यामते (Health Expert) व्यक्तीने 6 ते 8 तास झोप घेणं आवश्यक आहे. त्यांच्यामते पूर्ण झोपेबरोबरच आपण ज्या स्थितीमध्ये झोपतो (Sleeping Position) त्या स्थितीचा परिणाम देखील आपल्या आरोग्यावरही होत असतो. पूर्ण झोपेची आवश्यकता चांगल्या आरोग्यासाठी चांगली झोप अत्यंत आवश्यक आहे. झोप चांगली झाली तरच आपली इम्युनिटी चांगली राहते. जर्नल ऑफ एक्सपेरिमेन्टल मेडिसिनमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या एका संशोधनानुसार रात्री चांगली झोप घेणार्‍या लोकांची रोग प्रतिकारशक्ती चांगली असते. (अस्वस्थता घालवून मूड छान करण्यासाठी वापरा हे परफ्यूम; राहाल स्ट्रेस फ्री) पाठीवर झोपा पाठीवर झोपण्याचे अनेक फायदे आहेत. यामुळे मणका,स्नायू आणि सांधे यांचा आरोग्य चांगलं राहतं. मात्र, ज्यांना पाठदुखी, स्लीप अ‍ॅपनिया किंवा घोरण्याची सवय आहे अशा लोकांना पाठीवर झोपणं कठीण जातं. तज्ज्ञांच्यामते सरळ झोपण्याची सवय असलेल्या लोकांची गुडघेदुखी, कंबरदुखी पासून सुटका करण्यास मदत होते. (मूड चांगला राहण्यासाठी शाकाहारच बरा; पहा आयुर्वेद काय सांगतं) पोटावर झोपा बऱ्याच लोकांना पोटावर म्हणजेच उपडं झोपायला आवडतं. तज्ज्ञांच्यामते पोटावर झोपल्यामुळे घोरण्याची समस्या कमी होऊ शकते. याशिवाय स्लिप अ‍ॅपनिया असलेल्या लोकांना या प्रकारे झोपल्याने फायदा मिळतो. पोटावर झोपतांना मान अखडणार नाही याकडेही लक्ष द्यावं लागतं. बऱ्याच वेळा पोटावर झोपणाऱ्या लोकांना मानदुखीचा त्रास होतो. (ब्लड शुगर कंट्रोलसाठी रोज खा काळे चणे; या पद्धतीने खाल्यास जास्त फायदा) कुशीवर झोपणबऱ्याच वेळा लहान मुलं आणि म्हाताऱ्या माणसांना कुशीवर झोपायला आवडतं. मात्र, यामुळे पाठदुखीचा त्रास होऊ शकतो. गर्भवती महिलांना कुशी झोपण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे मेंदूला ऑक्सिजन पुरवठा चांगला होतो. शिवाय घोरणाऱ्या लोकांनी देखील कुशीवर झोपावं. मात्र, ज्यांना कुशीवर झोपल्यामुळे स्नायूंमध्ये वेदना होतात त्यांनी सरळ झोपणचं चांगलं.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health Tips, Lifestyle, Sleep benefits

    पुढील बातम्या