मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /डायबिटीजपासून ब्लडप्रेशपर्यंतच्या त्रासांवर फायदेशीर, रोज खा हे दोन पदार्थ

डायबिटीजपासून ब्लडप्रेशपर्यंतच्या त्रासांवर फायदेशीर, रोज खा हे दोन पदार्थ

संशोधनात असे आढळले आहे की, जर तुम्ही दह्यामध्ये जिरे चांगले मिसळून खाल्ले तर ते चांगले कोलेस्ट्रॉल वाढवते आणि वाईट कोलेस्ट्रॉल कमी करते. इतकेच नाही तर डायबिटीज आणि बद्धकोष्ठता यासारख्या समस्यांपासूनही याच्या नियमित सेवनाने आराम मिळतो.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 29 जानेवारी : पौष्टिकतेने समृद्ध दही चवीला जेवढे चविष्ट आहे, तेवढेच ते आपल्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. यामुळेच सर्व वयोगटातील लोकांना ते खाण्याचा सल्ला दिला जातो आणि लोक ते उत्साहाने खातात. जरी तुम्ही साधे दही खाऊ शकता, पण त्यात भाजलेल्या जिऱ्याची पूड घातल्यास ते आणखी फायदेशीर ठरते. अनेक संशोधनांमध्ये हे सिद्ध झाले आहे की, दह्यासोबत जिऱ्याचा वापर धोकादायक आजारांपासून दूर ठेवण्यास मदत करतो. चला तर मग जाणून घेऊया दही आणि भाजलेल्या जिऱ्याच्या नियमित सेवनाचे काय फायदे आहेत.

शिजवण्यापूर्वी चिकन धुणं धोकादायक; संशोधनात समोर आले भयंकर दुष्परिणाम

दही आणि भाजलेले जिरे खाल्याने होतो फायदा

कोलेस्ट्रॉल योग्य ठेवा

वेबएमडीनुसार, अनेक संशोधनांमध्ये असे आढळून आले की जिरे पावडर दह्यामध्ये चांगले मिसळून रोज खाल्ल्यास ते खराब कोलेस्ट्रॉल म्हणजेच एलडीएल कमी करण्यास आणि चांगले कोलेस्ट्रॉल म्हणजेच एचडीएल वाढवण्यास मदत करते.

भूक वाढवते

भाजलेले जिरे दह्यात मिसळून खाल्ल्यास भूक न लागण्याची समस्याही दूर होते. यासाठी रोज एक वाटी दह्यात किमान अर्धा चमचा भाजलेले जिरे खावे. मुलांची ही समस्या तुम्ही दही जिऱ्याच्या मदतीनेही दूर करू शकता.

बद्धकोष्ठता आराम

दह्यामध्ये भाजलेले जिरे घालून रोज खाल्ल्यास बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. हे पचन प्रक्रिया ठीक करते आणि आतडे सहज साफ करण्यास मदत करते.

रक्तदाबामध्ये फायदे

दही आणि जिऱ्यामध्ये मॅग्नेशियमचे प्रमाण संतुलित असते, जे रक्तदाब योग्य ठेवण्यास मदत करते. इतकेच नाही तर याच्या सेवनाने वजन नियंत्रित राहिल्याने रक्तदाबाची समस्या दूर ठेवणेही सोपे होते.

Hair Fall : पुरुषांनो सावधान! ‘या’ गोष्टींचं सेवन कराल तर होईल टक्कल, वेळीच व्हा सावध

मधुमेहामध्ये फायदेशीर

दही आणि जिऱ्यामध्ये मधुमेहविरोधी गुणधर्म असतात, जे मधुमेहाचा धोका कमी करण्यासाठी काम करतात. जर कुटुंबात मधुमेह अनुवांशिक असेल तर तुम्ही दही आणि जिरे यांचे सेवन केलेच पाहिजे. याच्या मदतीने ते स्वतःला मधुमेहापासून बऱ्याच अंशी वाचवू शकतात.

(सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)

First published:

Tags: Food, Health, Health Tips, Lifestyle