Home /News /lifestyle /

‘या’ गोष्टींसाठी रोज घ्या लिंबू पाणी; रिकाम्या पोटी होतो जास्त फायदा

‘या’ गोष्टींसाठी रोज घ्या लिंबू पाणी; रिकाम्या पोटी होतो जास्त फायदा

वजन कमी करण्यासाठी कोमट पाण्यात मधाबरोबर घेतल्यास उपयोग होतो.

वजन कमी करण्यासाठी कोमट पाण्यात मधाबरोबर घेतल्यास उपयोग होतो.

Benefit of Lemon Juice: लिंबू पाणी थकवा दूर करण्याचं काम करतो शिवाय आरोग्यासाठी याचे भरपूर फायदे आहेत.

    नवी दिल्ली, 26 जुलै : आपल्या स्वयंपाकघरात लिंबू (Lemon)असतोच. बऱ्याच पदार्थांमध्ये लिंबू वापरला जातो. लिंबाने जेवणाची चव वाढतेच आणि लिंबू आरोग्यासाठीही महत्वाचा आहे. लिंबामध्ये व्हिटॅमिन सी, ई, बी -6, थायमिन,नियासिन,राइबोफ्लेविन आणि फॉलेट सारखे अनेक पोषक घटक (Nutrients) असतात, जे आरोग्यासाठी बरेच फायदेशीर(Benefits for Health) असतात.दररोज सकाळी लिंबू पाणी रिकाम्या पोटी (Empty Stomach) घेतलं तर, आरोग्यासाठी जास्त फायदेशीर ठरू शकतं. रिकाम्या पोटी लिंबू पाणी (Lemon Water) पिण्याचे आरोग्यासाठी कोणते फायदे आहेत जाणून घेऊयात. पचनशक्ती वाढते लिंबू पाणी पाचनाची समस्या कमी करण्यात खूप मदत करतं. हायड्रोक्लोरिक अ‍ॅसिड आणि पित्ताची निर्मिती वाढवतं. ज्यामुळे गॅस,बद्धकोष्ठता,अपचन यासारख्या समस्यांत दिलासा मिळतो. (प्रेग्नेन्सीत चक्कर येण्याच्या त्रासाने हैराण; पहा कारणं आणि उपाय) रोग प्रतिकारशक्ती मजबूत करतं रोग प्रतिकारशक्ती मजबूत करण्यात याचा खूप फायदा होतो. त्यातील व्हिटॅमिन सी आणि पोटॅशियम रोगप्रतिकार शक्ती मजबूत करतं. रिकाम्या पोटी लिंबू पाणी पिण्यामुळे शरीरात पोषकद्रव्यं अधिक चांगल्या प्रकारे शोषली जातात. त्यामुळे आजारी पडण्याचा धोका कमी असतो. (Super food आवळा खातानाही साईड इफेक्टचा विचार करा; योग्य प्रमाणात घेतला तरच फायदे) रक्तदाब नियंत्रित करतं रिकाम्या पोटी लिंबू पाणी घेतल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो. त्यामध्ये भरपूर लिंबूवर्गीय अ‍ॅसिड आणि व्हिटॅमिन-सी असतं त्यामुळे रक्तदाब नियंत्रित होतो. वजन कमी करण्यात मदत रिकाम्या पोटी लिंबू पाणी घेण्याने वजन कमी करण्यासाठी खूप फायदा होतो. याने मेटाबॉलिजम वाढवतं आणि चरबी घटते. याशिवाय,शरीरातील विषारी घटक काढून टाकण्यास देखील मदत करतं,त्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. (‘ही’ हिरवी पानं संपवतील केसातल्या कोंड्याची समस्या; करूनच पाहा उपाय) शरीर हायड्रेटेड ठेवतं लिंबू पाणी पिण्याने शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते आणि शरीरात पाण्याची कमतरता दूर होते. त्यात भरपूर व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात. त्यामुळे उष्णेतेपासून बचाव होऊन शरीरातील पाण्याची पातळी चांगली राहते. त्वचा निरोगी होते लिंबू पाण्याने त्वचा निरोगी राहण्यासही मदत होते. कोलेजन तयार करण्यासाठी त्यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी खूप चांगलं मानलं जातं. ज्यामुळे त्वचा निरोगी आणि चमकदार बनते. (शनिच्या अवकृपाने संकटं लागतील मागे; 5 राशीच्या लोकांनी रहावं सावध)यकृताचं आरोग्य चांगलं राहतं यकृताचं आरोग्य चांगलं राखण्यासही मदत होते. यामुळे यकृत शुद्ध राहतं तसंच यकृतची उर्जा रिस्टोर होते आणि त्यामुले रात्रभर एक्टिव्ह राहतं.
    Published by:News18 Desk
    First published:

    पुढील बातम्या