Home /News /lifestyle /

फेकू नका शिळा भात; केसांना असा फायदा होईल की, पार्लरच्या हेअर स्पाला विसराल

फेकू नका शिळा भात; केसांना असा फायदा होईल की, पार्लरच्या हेअर स्पाला विसराल

शिळा भात वापरून केरेटिन ट्रीटमेंट करता येते.

शिळा भात वापरून केरेटिन ट्रीटमेंट करता येते.

पार्लरमध्ये महागड्या केरेटिन ट्रीटमेंट उपलब्ध असतात. शिजलेल्या भाताचा वापर करून तुम्ही घरच्या घरी केसांवर केरेटिन ट्रीटमेंट करू शकता.

    दिल्ली,17 जून :  आपण ज्याप्रकारे आपल्या आरोग्याची काळजी (Health Care) घेतो त्याच प्रकारे आपले केस आणि त्वचेची (Hair & Skin) देखील काळजी घेतो. केस निरोगी असावेत, लांबसडक वाढावेत असं प्रत्येक महिलेला वाटतं असतं. मात्र, आत्ताच्या बदलत्या वातावरणामध्ये ते शक्य होत नाही नाही. त्यातच बदलेल्या लाईफस्टाईलमुळे केसांची योग्य प्रकारे काळजी (Hair Care) घेता येत नाही. आता केसांसाठी अनेक ट्रीटमेंट, विविध प्रोडक्ट बाजारात उपलब्ध आहेत. मात्र, या प्रॉडक्टमध्ये केमिकल वापरलेले असल्यामुळे केसांवर त्याचे दुष्परिणाम देखील होतात. म्हणूनच अनेक महिला केसांसाठी होम रेमेडीज वापरण्याचा प्रयत्न करतात. अशीच एक घरगुती पदार्थ वापरून करायची हेअर ट्रीटमेंट सांगणार आहोत. घरात उरलेला भात जर तुम्ही फेकून देत असाल तर आजपासून ही सवय बंद करा. कारण त्याने केसांचं आरोग्य सुधारू शकतं. याच भाताचा वापर करून केसांना केरेटीन ट्रीटमेंट करता येते. तांदळामध्ये मोठ्या प्रमाणात पोषक घटक असतात. यात व्हिटॅमीन सी आणि व्हिटॅमीन ई, प्रोटीन असतं त्यामुळेच शिळा भात वापरून केरेटिन ट्रीटमेंट (Keratin Treatment) करता येते. त्याने केस मुलायम आणि मजबूत होतात. जाणून घेऊयात कसा वापर करायचा. (जोडीदाराची नोकरी गेली;सोडू नका साथ;आयुष्याच्या याच वळणावर सिद्ध करा प्रेम) केरेटिन ट्रीटमेंटमध्ये वापरण्यात येणारं कॅरेटिन हे एक प्रकारचे केमिकल प्रोटीन असतं. या ट्रीटमेंटमुळे डॅमेज केसांचं आरोग्य सुधारते आता पार्लरमध्ये अशा प्रकारच्या केरेटिन ट्रीटमेंट उपलब्ध असतात. मात्र त्या अतिशय महागड्या असतात. त्यामुळे शिजलेल्या भाताचा वापर करून तुम्ही घरच्याघरी केरेटिन ट्रीटमेंट करू शकता. यासाठी 3 ते 4 मोठे चमचे शिजलेला भात 2 ते 3 चमचे दूध, बदामाचं किंवा घरात उपलब्ध असलेलं कुठलंही तेल, एका अंड्याचा सफेद भाग आणि 1 ते 2 चमचे दही घ्यावं. (साधं दूध पिण्यापेक्षा असं प्या दररोज; डायबेटीज रुग्णांसाठी जास्त फायदा) सर्वातआधी एका मोठ्या भांड्यामध्ये उरलेला भात घ्या. त्यामध्ये दूध मिसळून भात मऊ करून घ्या. त्यानंतर यामध्ये अंड्याचा सफेद भाग आणि दही मिक्स करा. आता या मिश्रणाची पेस्ट बनवा. यामध्ये बदामाचं तेल घाला. केसांचे छोटे छोटे भाग बनवून केसांवर ही पेस्ट लावा. ही पेस्ट लावून केस मोकळे सोडा. लक्षात ठेवा हा मास्क धुतलेलल्या केसांवरच लावायचा आहे. 40 ते 45 मिनिटांनी पाण्याने धुवून टाका. लगेच शॅम्पू करू नका. (दुबई पडलं जळगावच्या प्रेमात; वर्षभरात खाल्ली 600 कोटी रुपयांची केळी) शक्य असेल तर दुसर्‍या दिवशी किंवा एक तासानंतर केसांना शाम्पू लावा त्यानंतर केसांना तेल लावू नका. या मास्कमुळे केस मऊ, चमकदार आणि सरळ होतात. आठवड्यातून एकदा हा मास्क लावला तर तुम्हाला हेअर ट्रीटमेंटसाठी ब्युटी पार्लरमध्ये जाण्याची गरज भासणार नाही.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Beauty tips, Woman hair

    पुढील बातम्या