• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • Fuller Effect ने ओठांना बनवायचंय आकर्षक? करा हे घरगुती उपाय

Fuller Effect ने ओठांना बनवायचंय आकर्षक? करा हे घरगुती उपाय

फुलर इफेक्टने ओठ सुंदर शेपमध्ये आणण्याचा ट्रेन्ड सुरू झाला आहे.

फुलर इफेक्टने ओठ सुंदर शेपमध्ये आणण्याचा ट्रेन्ड सुरू झाला आहे.

पातळ ओठांना फुलर इफेक्ट (Fuller Effect) देण्यासाठी सर्जरीची गरज नाही. घरच्याघरीच सोपी पद्धत वापरून पहा.

 • Share this:
  मुंबई,29 जून : युट्युब किंवा सोशल मीडियावर आपण फुलर इफेक्ट (Fuller Effect) अनेक व्हीडिओ (Video) पाहिले असतील. कशाप्रकारे ओठांची ट्रीटमेंट (Lip Treatment) करून ते थोडेसे जाड आणि चांगल्या आकारात आणता येतात हे दाखवणारे हे व्हीडीओ असतात. पातळ ओठांमुळे चेहरा सुंदर दिसत नाही असा समज आहे. बऱ्याच महिलांना आपले ओठ सुंदर असावेत असं वाटतं. कारण त्यामुळे चेहरा आकर्षक दिसतो. सध्या फुलर इफेक्टने ओठ सुंदर शेपमध्ये आणण्याचा ट्रेन्ड (Trend) सुरू आहे. पण ट्रीटमेंट ऐवजी काही टिप्स फॉलो केल्या तर ओठ फुलर इफेक्टसारखे सुंदर करता येतील. जाणून घेऊयात टिप्स. एक्सफोलिट करा चेहर्‍याप्रमाणेच ओठांना देखील एक्सफोलिएशन आवश्यक असतं. यामुळे ओठांवरील देखील डेड स्कीन निघून जाते आणि ओठ सुंदर होतात. एक्सफोलिट करण्यासाठी लिप एक्सफोलिटर किंवा टुथब्रश वापरू शकता. यामुळे मृत त्वचा निघून जाईल आणि ओठांमध्ये ब्लड सर्क्युलेशन वाढेल. त्यामुळे ओठ जास्त गुलाबी दिसतात आणि नॅचरल फुलर इफेक्ट येतो. (रोज खजूर खाण्याचे जबरदस्त फायदे, कोलेस्ट्रॉल आणि वजनही होईल कमी) बॉडी हायड्रेशन डिहायड्रेशनमुळे आपले ओठ देखील छोटे वाटायला लागतात. त्यामुळे आपली त्वचा हायड्रेट राहण्यासाठी जास्तीत जास्त पाणी प्या. त्यामुळे आपले ओठ नॅचरली फ्लपी दिसतील. लिप्स एक्सरसाईज ओठांसाठी बऱ्याच एक्सरसाईज करता येऊ शकतात. लिप्स एक्सरसाईजमुळे कोलेजन प्रोडक्शन वाढतं आणि त्यामुळे ओठ फुलर आणि सुंदर दिसायला लागतात. शिट्टी वाजवणं ही देखील एक लिप एक्सरसाईज ठरू शकते. शिट्टी वाजवल्यामुळे आपल्या ओठांचा आजुबाजूचे स्नायू ऍक्टिव्ह होतात. (अभ्यासाच्या धड्यांसोबत गिरवले प्रेमाचे धडे; विद्यार्थिनी-शिक्षक गाव सोडून पळाले) बक्कल मसाज टेक्निक बक्कल मसाज टेक्निकमुळे आपले ओठ वर आल्यासारखे दिसायला लागतात. शिवाय सुरकुत्या देखील कमी होतात. यासाठी थोडसं फेस ऑईल घ्या आणि बोटांच्या सहाय्याने ओठांना चारही बाजूने विरूद्ध दिशेला मसाज करा. यामुळे सुरकुत्या कमी होतील ही अतिशय सोपी आणि उपयोगी येणारी पद्धत आहे. (ऐकीव माहितीवरून त्वचेवर प्रयोग करून नका;काही DIY करतील चेहऱ्याचं नुकसान) दालचिनी तेल फुलर इफेक्ट देण्यासाठी दालचिनीच्या तेलाचाही वापर करता येतो. दालचिनीच्या तेलामुळे ओठांवरच्या त्वचेत इरिटेशन आणि इम्फेलम होतं. ज्यामुळे ओठांमध्ये रक्तप्रवाह वाढायला लागतो आणि त्यामुळे ओठांवर फुलर इफेक्ट दिसतो. ओठांवर दालचिनीचं तेल लावल्याने थोडीशी जळजळ होते. यामुळेच दालचिनीचं तेल लिपबाममध्ये मिक्स करा. ऑलिव्ह ऑईल 1 चमचा ऑलिव्ह ऑईल पेपरमिंट बरोबर मिक्स करा. त्यानंतर आपल्या ओठांना लावा. थोड्यावेळाने पुसून टाका आणि मॉश्चरायझर लावा. त्वचेला अलर्जी तर, वापरू नका. (तुमच्या ‘या’ चुकांमुळे होते बद्धकोष्ठता; आधी बदला सवयी) पेपरमिंट ऑईल फुलर इफेक्टसाठी पेपरमिंट ऑईलचा वापर देखील करता येऊ शकतो. यामुळे आपले ओठ सुजल्यासारखे दिसतात. त्यामुळे फुलर लुक येतो. पेपरमिंट ऑईलमुळे ओठांमध्ये मायक्रो सर्कुलेशन वाढतं. ज्यामुळे ओठ सुन्न पडतात. हे नॅचरली लिफ्ट बंपर प्रमाणे काम करतं आणि ब्लड सर्कुलेशन वाढतं.
  Published by:News18 Desk
  First published: