• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • तुम्हालाही आहेत 'लेझर हेअर रिमूव्हल’ बद्दल 'हे'गैरसमज; जाणून घ्या तथ्य

तुम्हालाही आहेत 'लेझर हेअर रिमूव्हल’ बद्दल 'हे'गैरसमज; जाणून घ्या तथ्य

लेझर हेअर रिमूव्हिंग ट्रीटमेंटमुळे बरेच महिने केस येत नाहीत.

लेझर हेअर रिमूव्हिंग ट्रीटमेंटमुळे बरेच महिने केस येत नाहीत.

लेझर हेअर रिमूव्हिंग ट्रीटमेंटच्या (Laser hair Removal Treatment)बाबतीत अनेक गैरसमज देखील आहेत. गैससमजामुळे काहीजण इच्छा असून ट्रीटमेंटचा वापर करत नाहीत

 • Share this:
  मुंबई,29 जून: प्रत्येक व्यक्तीच्या शरीरावरावरील त्वचेवर केस असतातच. अगदी लहान बाळाच्याही अंगावर केस असतात. पण, काहींच्या त्वचेवर अनावश्यक ठिकाणी मोठे,दाट केस असतात. याला कंटाळून बरेचजण ब्युटीपार्लरमध्ये(Beauty Parlor)जाऊन वॅक्सिंग(Waxing)करून घेतात. मात्र, त्यामुळे तात्पुरते केस जातात आणि महिन्याभराने पुन्हा त्या ठिकाणी केस येतात. या दर महिन्याच्या चक्राला कंटाळून महिला किंवा पुरूष आता लेझर ट्रीटमेंटचा (Laser Treatment) पर्याय अवलंबू लागले आहेत. लेझर हेअर रिमूव्हिंग ट्रीटमेंट थोडीशी खर्चीक आणि वेळखाऊ असली तरी, यामुळे बरेच महिने किंवा वर्षभर केस येत नाहीत. पण, लेझर हेअर रिमूव्हिंग ट्रीटमेंटच्या (Laser hair Removal Treatment)बाबतीत अनेक गैरसमज देखील आहेत. गैससमजामुळे काहीजण इच्छा असून ट्रीटमेंटचा वापर करत नाहीत. तर, जाणून घेऊयात लेझर हेअर रिमुव्हिंग ट्रीटमेंट संदर्भातले काही गैरसमज आणि तथ्य. (Euro Cup: भारतीय तरुणीचा जलवा; या टीमला सपोर्ट करण्यासाठी भाषानं शेअर केले PHOTO) लेझर हेअर रिमव्हिंग ट्रीटमेंटमुळे कॅन्सर होतो. लेझर हेअर रिमुव्हिंग ट्रीटमेंटने त्वचेवरील केस तयार करणाऱ्या हेअर फॉलिकल्सला टार्गेट केलं जातं. मात्र त्यामुळे कॅन्सर होतो ही धारणा चुकीची आहे. लेझर हेअर रिमूव्हल ट्रीटमेंट दरम्यान रेडिएशन्स उत्पन्न होतात मात्र ते हानिकारक नसून कॅन्सरला तर मुळीच कारणीभूत ठरत नाहीत. (शरीरात हिमोग्लोबिन कमी झालंय; घाबरू नका हे सात पदार्थ खायला सुरुवात करा) इन्फर्टिलिटीला कारणीभूत लेझर हेअर रिमुव्हिंग इन्फर्टिलिटी किंवा वंध्यत्वाला कारणीभूत ठरत नाही कारण, ही ट्रीटमेंट केवळ त्वचेवर वापरली जाते. आपल्या शरीरातल्या अंतर्गत अवयवांवर याचा परिणाम होत नाही. त्यामुळे इनफर्टिलिटी किंवा नपुंसकता येत नाही. एवढेच नाही तर, आपल्या खाजगी भागांवरील हेअर रिमूव्हिंगसाठी लेझर ट्रीटमेंट वापरली तरीही त्याचे दुष्परिणाम होत नाहीत. (रोज खजूर खाण्याचे जबरदस्त फायदे, कोलेस्ट्रॉल आणि वजनही होईल कमी) होम लेझर रिमूव्हल किट होम लेझर रिमूव्हल किट देखील वापरण्यास सुरुवात झालेली आहे मात्र,याचा परिणाम किती प्रमाणात होतो यासंदर्भात ठोसपणे सांगता येऊ शकत नाही. बऱ्याच जणांना एक्सपर्टकडे जाऊन पैसे आणि वेळ खर्च करण्यापेक्षा घरच्या घरीच परमनंट केस काढण्याची इच्छा असते. पण याचा परिणाम किती काळ राहील हे सांगता येऊ शकत नाही. (अभ्यासाच्या धड्यांसोबत गिरवले प्रेमाचे धडे; विद्यार्थिनी-शिक्षक गाव सोडून पळाले) लेझर हेअर रिमूव्हलनंतर जास्त दाट केस येतात लेझर हेअर रिमूव्हलनंतर आलेले केस जास्त प्रमाणात दाट आणि मोठे येतात असा एक गैरसमज आहे. उलट तज्ज्ञांच्यामते प्रत्येक सिटिंगनंतर 10 ते 25 टक्के केस कमी यायला लागतात.
  Published by:News18 Desk
  First published: