नवी दिल्ली, 18 जुलै : सकाळी उठल्यानंतर भरपेट नाष्टा, दुपारी साधं जेवण आणि रात्री अगदी हलका आहार घेणं आरोग्या उत्तम (Health) राहण्यासाठी महत्त्वाचं असतं. मात्र बरेचजण काही गैरसमजांमुळे (Misunderstanding) रात्रीच्या वेळी काहीही न उपाशीच (Empty Stomach ) झोपतात. रात्री उपाशीपोटी झोपण्याचे काय दुष्परिणाम (Side Effects) होतात जाणून घेऊयात.
अनिद्रेचा त्रास
रात्री उपाशीपोटी झोपल्यामुळे अनिद्रेचा त्रास होऊ शकतो. पोटात काहीच नसल्यामुळे आपला मेंदू सतत भुक लागण्याचे संकेत आपल्याला देत राहतो. त्यामुळे शांत झोप लागत नाही. सतत झोपमोड होत राहते मात्र, हळूहळू आपल्या मेंदूला अशाप्रकारे झोप मोड होण्याची सवय लागते आणि त्याचा त्रास व्हायला लागतो.
(तेलचा करा असा वापर; लैंगिक समस्या संपतील; महिलांनाही फायदेशीर)
स्नायु कमजोर होतात
रात्री उपाशी पोटी झोपल्यामुळे आपले मसल्स कमजोर व्हायला लागतात. पोट रिकामं असल्यामुळे प्रोटीन आणि अमिनो एसिडच्या कार्यक्षमतेवरही परिणाम होतो. त्यामुळे मसल्स चांगले ठेवायचे असतील तर योग्य वेळी आणि चांगला आहार घेणं महत्त्वाचं असतं.
(फक्त बदला काही सवयी; डोकेदुखीचा त्रास कायमचा संपेल)
एनर्जी लेव्हल कमी होते
रात्री उपाशी पोटी झोपल्यामुळे आपली एनर्जी लेव्हल कमी होत जाते. त्यामुळे आपल्याला दिवसभर थकवा जाणवत राहतो. यामुळे भविष्यात आपल्याला आरोग्यविषयक त्रासांचा सामना करावा लागतो.
(नाईट शिफ्ट करताय? तर अशी घ्या तब्येतीची काळजी, अन्यथा...)
चिडचिडा स्वभाव
रात्री रिकाम्यापोटी झोपल्यामुळे मूड स्विंगचा त्रास होते. यामुळे राग काढायला लागतो आणि स्वभाव चिडचिडा होतो जातो. निगेटिव्हिटी वाढायला लागते आणि हळुहळु हाच आपला स्वभाव व्हायला लागतो.
त्यामुळेच रात्री उपाशी पोटी झोपण्यापेक्षा हलका आहार घ्यावा. त्यामुळे आपलं आरोग्य चांगलं राहतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health Tips, Lifestyle