मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

An Apple A Day....! दिवसाला एक सफरचंद खावं; पण खाण्याची योग्य पद्धत आणि वेळ माहिती आहे का?

An Apple A Day....! दिवसाला एक सफरचंद खावं; पण खाण्याची योग्य पद्धत आणि वेळ माहिती आहे का?

तुम्हाला हे माहित असेलच की रोज एक सफरचंद खाल्ल्याने तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहता. परंतु हे माहित आहे का की सफरचंद खाण्याचीही एक योग्य वेळ आणि पद्धत आहे. सफरचंद कधीही खाणे टाळावे अन्यथा फायदा फारसा होणार नाही.

  • Published by:  Pooja Jagtap

मुंबई, 01 जुलै :  'An apple A day keeps the doctor away', असं म्हटलं जातं. सफरचंदात (Healthy Apple) अनेक पौष्टिक घटक असतात. जे शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासोबतच अनेक फायदे देतात. सफरचंद खाण्याचे अनेक फायदे आहेत. पण ते खाण्याची एक योग्य वेळ आणि विशिष्य पद्धतही आहे. आयुर्वेदानुसार अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यांचे सेवन ठराविक वेळी आणि ठराविक पद्धतीने करायला गवं. नाहीतर त्याचे पूर्ण फायदे मिळत नाहीत आणि काही दुष्परिणामही दिसून येतात. हेच संफरचंदाच्या बाबतीत लागू आहे.

संपूर्ण पोषण मिळविण्यासाठी तुम्हाला सफरचंद खाण्याची योग्य पद्धत माहित असणे आवश्यक आहे. सफरचंद खाण्याची योग्य वेळ (Right Time To Eat Apple) कोणती आहे आणि ते योग्य प्रकारे कसे खावे याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत.

सफरचंद खाण्याची योग्य वेळ कोणती आहे ?

- हॅलोडॉक्समध्ये प्रसिद्ध झालेल्या एका बातमीनुसार, तुम्ही नेहमी सकाळच्यावेळी सफरचंद खावे. सफरचंदात आहारातील फायबर असते आणि त्यात पेक्टिन नावाचे घटक असते. अनेक लोकांना झोप किंवा तणाव इत्यादींशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे सकाळी सफरचंद खाणे ही चांगली सवय आहे.

उन्हाळ्यात दातांच्या चांगल्या आरोग्यासाठी या 5 गोष्टी आहेत महत्त्वाच्या

- सकाळी सफरचंद खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते आणि आतड्याची हालचाल योग्य प्रकारे होण्यास मदत होते. बद्धकोष्ठतेसारख्या (Apple Is Good For Digestion) समस्यांपासूनही सुटका मिळू शकते.

- कोलनमध्ये आढळणारे बॅक्टेरिया नष्ट करण्यासाठी पेक्टिन उपयुक्त आहे. हे निरोगी पचनसंस्थेला मदत करते. पेक्टिन विषारी पदार्थांपासून मुक्त होण्यास मदत करते आणि सकाळी लवकर संपूर्ण शरीर डिटॉक्सिफाय करते.

तरुण वयातील हा त्रास उतारवयात अनेक अडचणी आणू शकतो; आत्तापासूनच घ्या काळजी

सफरचंद खाण्याची योग्य पद्धत

सफरचंद सोलून खाऊ नये. सकाळी शक्य असल्यास ते न कापता खा आणि नैसर्गिक स्वरूपात म्हणजेच सालीसकट खावे. सफरचंदाच्या सालीमध्येच पेक्टिन आढळते आणि त्याची साल काढून टाकल्यास (Eat Apple With Skin) त्याचा पूर्ण फायदा होत नाही. तसेच सफरचंद संध्याकाळी (Don't Eat Apple At Night) किंवा झोपतानाही खाऊ नये. असे केल्याने पचनात फायदा होत नाही आणि काही तोटेही होतात.

First published:

Tags: Apple, Health Tips, Lifestyle, Superfood