थंडीच्या दिवसात पपई खाणं शरीराला घातक, अनेक आजारांना निमंत्रण!

थंडीच्या दिवसात पपई खाणं शरीराला घातक, अनेक आजारांना निमंत्रण!

पपई कफ आणि वात प्रकृतीसाठी चांगली आहे. पपईमध्ये व्हिटॅमिन ए आणि सी तसंच फायबरचे प्रमाण अधिक असतं.

  • Share this:

मुंबई, 09 नोव्हेंबर: पपई हे असं फळ आहे जे आपल्याला वर्षभर उपलब्ध होतं. पपईमध्ये व्हिटॅमीन सी आणि ए असल्यामुळे त्यातून ऊर्जा आणि ताकद मिळते. थकवा दूर करणं आणि शरीरातील हार्मोन्स संतुलित करण्याचं काम करत असतं. अनेक आजारांवरील उपाय म्हणून पपई खाण्याचा सल्ला दिला जातो. मात्र पपईचा गुणधर्म हा मुळात उष्ण आहे. त्यामुळे पपई खाणं हे जितकं फायद्याचं आहे तेवढेच ते खाताना काही गोष्टी लक्षात घेतल्या नाहीत तर त्याचे तोटेही आपल्याला होतात. त्वचा, आतड्यांचे विकार इथपासून ते रक्ताभिसरण आणि पेशींपर्यंत सर्वांसाठी पपई जरी लाभदायक असली तरीही पपई अति खाण्याचे किंवा चुकीच्या वेळी खाल्ल्यानं त्याचे तोटे होतात.

हिवाळ्यात सर्दी झाली असेल तर पपई खाऊ नये

तुमची पचनक्रीया या दिवसांमध्ये थोडी नाजूक झालेले असते त्यामुळे यावेळी पपई खाल्ली तर पचनसंस्थेवर त्यांचा परिणाम होण्याची चिन्हं असतात. पपई पचायला जड असल्यानं अपचनाचा त्रास होऊ शकतो. पित्ताचा त्रास असणाऱ्यांनी पपई खाणं टाळावं. त्यामुळे करपट ढेकर येणं, अपचन, जुलाब किंवा उलट्या होण्याचा धोका असतो.  काहीवेळा थंडीत पपई खाल्ल्यानं पोटदुखीचा त्रासही उद्भवण्याची शक्यता असते.

वाचा-मुळा खाण्याचे 5 फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

मासिक पाळीदरम्यान पपईचं सेवन करणं टाळा

पपईचा गुणधर्म उष्ण असतो. अति पपई खाल्ल्यामुळे शरीरातील उष्णता वाढते. पपईमध्ये लॅटेक्सचे प्रमाण जास्त असते, जे गर्भाशयामध्ये संकुचन निर्माण करू शकते. नियमित पपईच्या सेवनामुळे इस्ट्रोजनचं प्रमाण वाढतं जे मासिक पाळीसाठी किंवा मासिक पाळीत समस्या निर्माण करू शकतं. त्यामुळे पपईचं अतिसेवन करणं वेळीच थांबवणं आवश्यक आहे. यासोबतच  गरोदरावस्थेमध्ये स्त्रियांनी पपई खाणे टाळावे. नुकत्याच झालेल्या एका संशोधनानुसार पपई उष्ण असल्याने गरोदर स्त्रियांना त्याचा फार त्रास होतो.

श्वसनाचे विकार असणाऱ्यांनी पपई खाऊ नये.

रक्तदाबाची समस्या असणार्‍यांमध्ये पपईचं अतिसेवन धोकादायक ठरू शकते. रक्तदाबाची औषध घेताना पपईचे सेवन करणं आरोग्याला धोकादायक आहे. यामुळे त्यांचे नुकसान होऊ शकते. श्वसनाचे विकार असलेल्यांनी पपई खाऊ नये त्यामुळे श्वसनाचे विकार होऊ शकतात. अस्थमा, दमा सारख्या आजारांना तुम्ही निमंत्रण देत आहात.

वाचा-केस काळे करण्यासाठी तुम्हा वापरताय हेअर डाय? होऊ शकतो 'हा' गंभीर आजार

हृदयाचे विकार आणि डायबेटीस असणाऱ्यांनी खाऊ नये पपई

एका अभ्यासातून पुढे आलेल्या माहितीनुसार, व्हिटॅमिन सीचे शरीरातील प्रमाण वाढल्यास किडनी स्टोन बळावण्याची शक्यतादेखील वाढते.  त्यासोबतच डायबेटीसच्या गोळ्यांसोबत पपईचं सेवन केलं अथवा पपई खाल्ल्यानंतर गोळ्या घेतल्यास त्याचा तब्येतीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. हृदयासंबंधीत आजार असणाऱ्यांनी पपईचं सेवन डॉक्टरांच्या सल्ल्यानं करावं.

पपईमुळे होऊ शकतो त्वचा विकार

पपईचे सेवन केल्यानं त्वचा पिवळी पडत असल्यास आणि प्रामुख्याने तुमच्या हातावरील त्वचा पिवळी पडत असल्यास कॅरोटेनेमिया हा त्वचारोग बळावल्याची शक्यता असते. यामुळे डोळे, तलवे, हाताचा रंग पिवळा पडू शकतो. अशावेळी तातडीनं डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

वाचा-गर्भातच मुलांना मिळणार संस्कार! विद्यापीठानं सुरू केला 'गर्भसंस्कार' कोर्स

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 9, 2019 08:34 AM IST

ताज्या बातम्या