अंजिरात असतात भरपूर पोषणमूल्यं; 'हे' आहेत फायदे

इतर फळापेक्षा जास्त प्रमाणात तंतुमय पदार्थ असल्यामुळे अंजीर आरोग्यासाठी लाभदायक ठरतं

News18 Lokmat | Updated On: Jun 10, 2019 11:39 AM IST

अंजिरात असतात भरपूर पोषणमूल्यं; 'हे' आहेत फायदे

मुंबई, 8 मे : अंजिराच्या झाडाला लागणाऱ्या फुलोऱ्याचं रूपांतर फळात होतं. आधी हिरव्या आणि नंतर तपकिरी रंगात बदलणारं हे फळ म्हणजेच अंजीर. भारतात मुख्यत्वे महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये अंजिराचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. मऊ आणि राखाडी रंगाच्या फांद्या असलेल्या अंजिराच्या झाडाची पाने मात्र कंगोऱ्या कंगोऱ्याची असतात. पिकल्यानंतर गळून पडलेली अंजिरे वाळवून ती बराच काळ टिकवून ठेवता येतात. खायला मधुर आणि रुचकर असलेल्या या फळात भरपूर प्रमाणात पोषक तत्व असतात.

अजिरात कॅल्शियम, फॉ़स्फरस, पोटॅशियम, बीटा कॅरोटीन, अ आणि क जीवनसत्व भरपूर प्रमाणात असतं. इतर फळापेक्षा जास्त प्रमाणात तंतुमय पदार्थ असल्यामुळे अंजीर आरोग्यासाठी लाभदायक ठरतं.

आरोग्य उत्तम ठेवायचं असेल तर लक्षात ठेवा 'या' 6 गोष्टी

इराण, अफगाणिस्तान, ग्रीसमधूनसुद्धा वाळवलेले अंजीर भारतात आयात केले जातात. भारतातसुद्धा अजीर वाळवले जातात. पोर्तुगाल, इटली, ग्रीस, अफगाणिस्तान, इराण, टर्की हे अंजिराचं उत्पादन घेणारे प्रमुख देश आहेत. अंजिराचे चार प्रकार आहेत. पहिला प्रकार हा युरोपमधील सामान्य प्रकार, दुसरा स्पर्ना, तिसरा प्रकार हा रानटी आणि सान पेद्रो या चौथ्या प्रकाराच्या अंजिराची लावगड ही कॅलिफोर्नियात केली जाते. याला वर्षातून दोनदा बहर येतो.

असे आहेत अंजीर खाण्याचे फायदे…

Loading...

1 - रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी अंजिराचं नियमित सेवन करायला हवं. यातील पोटॅशियममुळे रक्तदाबाची समस्या कमी होते. उच्च रक्तदाबासाठी अंजीर हे अत्यंत गुणकारी मानलं जातं. यातल्या सोडियममुळे वाढलेला रक्तदाब कमी करण्यासाठी मदत होते. ह्रदयाला होणारा रक्तपुरठा सुरळीत ठेवण्यासाठी अंजीर लाभदायक आहे.

2 - हृदयविकार आणि हृदयासंबंधी समस्यांना वाढवणारे हानिकारक घटक अंजिराच्या सेवनामुळे शरीराबाहेर टाकले जातात. वाळलेले अंजीर रक्तदाब नियंत्रित करून हृदयाला नियनित रक्तपुरवठा करण्यासाठी मदत करतं. अजिराच्या सेवनामुळे हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या नलीकांमधील अडथळे दूर होतात.

3 - अंजीरातील तंतुमय पदार्थ पाचनक्रीयेसाठी उत्तम असतात. यामुळे पित्ताची समस्या दूर होते. त्यामुळे अंजीर हे फळ आपल्या आहारात असायला हवं.

तुम्ही भेसळयुक्त दूध तर पीत नाही ना? अशी करा घरबसल्या तपासणी

4 - अंजिरात भरपूर प्रमाणत कॅल्शियम असल्यामुळे हाडं मजबूत ठेवण्यासाठी अंजीर उत्तम आहे. शरीरातली खनिजांची मात्रा जर कमी झाली असेल तर दररोज अंजिराचं सेवन फायदेशीर ठरतं.

5 - भारतातील अंजीर हे फळ दुधासोबत सेवन करण्याची पद्धत आहे. अंजिरात झिंक, म्याग्नीज, म्याग्नेशियाम आणि लोहाचं प्रमाण असल्यामुळे प्रजनन तंत्रासाठी अंजीर उपयोगी ठरतात.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: health
First Published: Jun 8, 2019 02:37 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...