कॉफीच्या अतिसेवनामुळे वाढतो 'या' रोगाचा धोका; रिसर्चमध्ये आलं समोर

कॉफीच्या अतिसेवनामुळे वाढतो 'या' रोगाचा धोका; रिसर्चमध्ये आलं समोर

डोकेदुखी, नैराश्य या समस्या दूर करण्यासाठी कॉफी पिणं योग्य असलं तरी कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा शरीरासाठी हानिकारक ठरतो.

  • Share this:

नवी दिल्ली, 24 मे : डोकेदुखी, नैराश्य या समस्या दूर करण्यासाठी कॉफी पिणं योग्य असलं तरी कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा शरीरासाठी हानिकारक ठरतो. नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चमध्ये जर तुम्ही दिवसभरात 6 कपांपेक्षा जास्त कॉफी घेत असाल तर ह्रदयविकाराचा धोका हा 22 टक्क्यांपेक्षा जास्त वाढतो. अमेरिकेतील जर्नल ऑफ क्लिनिकल न्युट्रिशनमध्ये यासंदर्भातलं संशोधन प्रकाशित झालं आहे.

तुमच्या मुलांना फिट ठेवायचं असेल, तर त्यांना शाळेत 'असं' पाठवा

ह्रदयाशी संबंधित आजार हे लोकांच्या मृत्यूचं मुख्य कारण ठरत आहेत. मात्र, हे आजार रोखले जाऊ शकतात असं, जागतिक आरोग्य संघटना (वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन) ने म्हटलं आहे. एकट्या ऑस्ट्रेलियामध्ये प्रत्येक सहावी व्यक्ती ह्रदयरोगाने प्रभावित आहे. फार जास्त कॉफीचं सेवन आणि ह्रदयरोग यांचा संबंध काय आहे हे या रिसर्चच्या माध्यमातून संशोधकांनी समजून घेण्याचा प्रयत्न केला. कॉफिच्या जास्त सेवनामुळे उच्च रक्तदाबाचा धोका आणि ह्रदयासंबंधीच्या आजारांचा धोका वाढतो असा धक्कादायक निष्कर्ष या रिसर्चमध्ये संशोधकांनी काढला आहे.

डोक्यावरचं टेंशन तुम्हाला दूर करायचं असेल तर 'या' 5 गोष्टी कराच

उत्तेजक पेय म्हणून जगभरात कॉफीचं सेवन केलं जातं. कॉफी प्यायल्याने झोप उडते, फ्रेश वाटतं, एनर्जी लेव्हल वाढते आणि अकाग्रताही वाढते. पण दिवसभरात जर तुम्ही 6 कपांपेक्षा जास्त कॉफी सेवन करत असाल तर कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टिमवर नकारात्मक प्रभाव पडतो असा निश्कर्ष संशोधकांनी या रिसर्चमध्ये काढला आहे.

First published: May 24, 2019, 10:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading