मुंबई, 12 जून : दोन जेवणांच्यामध्ये भूक लागणं ही अगदी स्वाभाविक बाब आहे. यामुळे स्नॅक्सचं खाण्याला जास्त प्राधान्य दिलं जातं. पण खरंच भूक लागली आहे म्हणून, की केवळ चविष्ट पदार्थ आहे म्हणून तुमची स्नॅक्स खाण्याची इच्छा होते? खरंच भूक लागली आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर हे आरोग्यदायी पदार्थ तुम्ही सेवन करायला हवेत.
ज्वारीच्या भाकरीचे आहारातील महत्त्व; जाणून घ्या फायदे
1 - उकडलेल्या अंडी थोडे काळे चणे, मिरची आणि मीठ घालून तुम्ही खाऊ शकता. यामुळे प्रथिनांचा पुरवठा होतो. जो तुमच्या शरीरात उर्जेचं काम करतो.
2 - उन्हाळ्यात दह्यासारखं उत्तम दुसरं काही असूच शकत नाही. दह्याच्या सेवनाने कॅल्शियमबरोबरच इतर पौष्टिक घटकांचाही शरीराला पुरवठा होतो. यामुळे तुम्ही परत ताजे तवाने होता.
3 - सफरचंद हे एक असं फळ आहे जे तुम्ही कुठेही बसून खाऊ शकता. दररोज एक सफरचंद जर तुम्ही खाल्लं तर डॉक्टरकडे जाण्याची गरज पडत नाही. सफरचंदामुळे अवेळी लागणारी भूक शमते.
उन्हाळ्यात सगळ्यात गुणकारी ठरणारा 'हा' पदार्थ पोटाच्या समस्याही करतो दूर
4 - सुकामेवा हा आरोग्यदायी स्नॅक्सचा एक चांगला पर्याय आहे. यात बदाम, मनुके, काजू, अक्रोड या गोष्टी तुम्ही सेवन करू शकता. यामुळे शरीरात उर्जा वाढते आणि पचनशक्तीही वाढते. सुकामेवा खाल्ल्याने पोट भरल्यासारखं वाटंत त्यामुळे उगाच काही खाण्याचं तुम्ही टाळता.
5 - बटाट्यामुळे लठ्ठपणा वाढतो. पण उकडलेला बटाटा लठ्ठपणाची समस्टा दूर करतो. उकडलेल्या बटाट्यांत थोडीशी काळी मिरीपूड आणि थोडं लिंबू पिळून खावं. लिंबाचा रस टाकल्याने बटाटा पचण्याचा क्षमात वेगाने होतं. आणि सतत लागणाऱ्या भुकेवर नियंत्रण मिळवता येतं.