मुंबई, 21 सप्टेंबर : आपल्या देशात तांदूळ जास्त तयार होतो. चपातीपेक्षा लोक भात खाणं जास्त पसंत करतात. पोषणाच्या दृष्टीनंही गहू आणि तांदळाची तुलना होते. अनेकांना वाटतं भात खाल्ल्यानं वजन वाढतं. पोट सुटतं. पण नुकत्याच झालेल्या संशोधनात हे सिद्ध झालंय की भात खाल्ल्यानं वजन कमी होतं.
जपानमध्ये आहारावरच्या एका संशोधनातून हे समोर आलं की आहारात खूप भात खाल्ला तर जाडेपणा कमी होतो. वाढत नाही. हे संशोधन 136 देशांमधल्या लोकांवर केलंय. त्यात रोज लोक किती भात खातात, कुठल्या स्वरूपात खातात, हे तपासलं गेलं.
दर महिन्याला 50 हजार रुपये कमवण्याची संधी, 'हा' व्यवसाय सुरू करायला सरकारची मदत
या संशोधनात समावेश असलेल्या व्यक्तींच्या Body mass index (BMI) वर लक्ष ठेवलं गेलं. संशोधनाचे प्रमुख प्रोफेसर चोमोको यांनी सांगितलं की, ज्या देशाचा मुख्य आहार भात होता तिथल्या लोकांमध्ये जाडेपणा फारसा आढळला नाही.
55 रुपये जमा केलेत तर मिळेल दर महिन्याला 3 हजार रुपये पेन्शन, असं करा रजिस्ट्रेशन
पाश्चिमात्य देशांचा विचार केला तर तिथले लोक भात कमी खातात. पण तिथे बरेच जण जाडे आढळले. प्रोफेसर चोमोको म्हणाले, भातात पोषण मूल्य जास्त असतात. त्यांची शरीराला गरज असते.
भातामुळे काही फायदेही आहेत. तुम्हाला डायरिया झाला असेल तर पांढरा भात खाणं खूप प्रभावी आहे. पांढऱ्या भातामुळे उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो. भातानं मेटॅबोलिझम चांगलं राहतं. त्यानं शरीराला उर्जा मिळते. भातात फायबरचे गुण असतात ज्यामुळे पोटोतील गॅसचे प्रमाण कमी होते.
घर खरेदी करणाऱ्यांना मोठा दिलासा, मोदी सरकारचा नवा प्लॅन
जर तुमच्या पोटात अल्सरची समस्या असेल तर शिळा भात उपयुक्त ठरतो. त्यासाठी आठवड्यातून तीन वेळा शिळा भात खाणे गरजेचे आहे. यामुळे लवकर आराम मिळतो.
VIDEO: वांद्रे स्थानकात राडा, टीसीकडून प्रवाशाला शिवीगाळ आणि मारहाण