stretch marks ची समस्या यामुळे होईल दूर

stretch marks ची समस्या यामुळे होईल दूर

महागड्या क्रीम वापरण्याऐवजी आहारात घ्या 'या' गोष्टी

  • Share this:

मुंबई, 13 जून : स्ट्रेच मार्क्सपासून सुटका मिळविण्यासाठी अनेक महिला महागड्या क्रीम वापरण्यापासून ते घरगुती उपायांपर्यंत सगळ्याच गोष्टी करून बघतात. पण त्यांचा हवा तसा फायदा होतोच असं नाही. आज आम्ही तुम्हाला व्हिटॅमिन्सचा वापर करून स्ट्रेच मार्क्स कशापद्धतीने दूर केले जाऊ शकतात हे सांगणार आहोत.

Vitamin 'A' - अनेक पालेभाज्यांमध्ये व्हिटॅमिन 'ए' आढळतं. गाजर, फिश, बेल आणि एप्रीकॉटमध्ये सुद्धा हे व्हिटॅमिन भरपूर प्रमाणात असतं. त्वचेवरील स्ट्रेच मार्क्स घालविण्यासाठी या गोष्टींचं सेवन करावं.

पचनक्रिया बिघडू नेये म्हणून अशी घ्या काळजी; उपयुक्त आहेत 'या' 7 टिप्स

Vitamin 'C' - लिंबू, आवळा, संत्रं, द्राक्ष यामध्ये व्हिटॅमिन 'सी' भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे नवीन त्वचा तयार करण्यासाठी आणि स्ट्रेच मार्क्सपासून सुटका मिळवण्यासाठी या गोष्टी भरपूर प्रमाणात खाव्या.

Vitamin 'E' - उत्तम आणि आरोग्यदायी त्वचेसाठी व्हिटॅमिन 'ई' उपयुक्त ठरतं. त्वचेचा तजेला वाढतो म्हणून या व्हिटॅमिनमुळे ब्युटी व्हिटॅमिन असं देखील म्हटलं जातं. डॅमेज झालेली स्किन रिपेयर करण्यासाठी आणि स्ट्रेच मार्क्स घालविण्यासाठी हे व्हिटॅमिसुद्धा उपयुक्त आहे. यासाठी आहारात बदाम, पालक, मोहरीच्या बिया खाव्या.

चिरतरुण दिसण्यासाठी मुलींनी घ्यावी 'ही' काळजी; जाणून घ्या 6 सोप्या टिप्स

Vitamin 'K' - कोबी, पातीचा कांदा यामध्ये व्हिटॅमिन 'के' भरपूर प्रमाणात असतं. स्ट्रेच मार्क्सच प्रमाणेच डार्क सर्कल्स दूर करण्यासाठीसुद्धा व्हिटॅमिन के गुणकारी आहे.

First published: June 13, 2019, 9:47 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading