वाढत्या वयासोबत वाढू शकतो 'या' आजारांचा धोका...

वाढत्या वयासोबत वाढू शकतो 'या' आजारांचा धोका...

वार्धक्यात शरीर दमलेलं असतं आणि अशा काळात प्रतिकार शक्तीसुद्धा कमकुवत होऊन जाते. त्यामुळेच म्हातारपणात अनेक आजार डोकं वर काढतात.

  • Share this:

मुंबई, 28 जून : बदलत्या जीवनशैलीनुसार आणि धकाधकीच्या जीवनात प्रत्येकजण तणावात वावरत असतो. कामाला प्राधान्य देत स्वतःकडेही दुर्लक्ष करत आरोग्याची काळजीही व्यवस्थीत घेतली जात नाही. याशिवाय वाढत्या वयासोबत शरीर कमकुवत होऊ लागते. पर्यायाने वयोमानानुसार होणाऱ्या आजारांशी लढण्यास शरीर साथ देत नाही. वार्धक्यात शरीर दमलेलं असतं आणि अशा काळात प्रतिकार शक्तीसुद्धा कमकुवत होऊन जाते. म्हातारपणात अनेक आजार डोकं वर काढतात. साहजिकच या समस्यांमुळे दुखणं आणि त्रास रोजचं होऊन जातं. त्यामुळे या काळात वृद्धांची जास्त काळजी घेणं आवश्यक आहे. वाढत्या वयासोबत कोणते आजार होण्याची शक्यता असते हे याबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

निरोगी जगायचं आहे? 'या' 7 पदार्थांचा आहारात करा समावेश

उतार वयात हृदयविकार होण्याची शक्यता जास्त असते. बदलत्या जीवनशैलीसोबत आरोग्यातही अनेक बदल होतात. भारतीयांमध्ये हृदयविकाराचं प्रमाण जास्त आहे. असं असलं तरी अमेरिकेत हृदयविकाराच्या झटक्याने होणाऱ्या मृत्युचं प्रमाण जास्त आहे असं सेंटर्स ऑफ डिसिस कंट्रोल अँड प्रिवेंशनने म्हटलं. वयाच्या पन्नाशीपर्यंत हृदयाविकार होण्याचा धोका वाढतो. या आजारानंतर दुसरा गंभीर आजार असेल तर तो म्हणजे कर्करोग. या गंभीर आजाराने होणाऱ्या मृत्युचं प्रमाणही जास्त आहे. याशिवाय डोक्याशी संबंधीत आजार होण्याची लक्षणेही वार्धक्यात अधिक होतात. त्यामुळे कोणत्याही प्रकारची लक्षणे आढळल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने लगेच उपचार घ्यावेत. वृद्धांची अधिक काळजी घ्यावी.

हृदयविकारांपासून दूर राहण्यासाठी 'या' 7 पदार्थांचा आहारात समावेश कराच

VIDEO: लोकसभेत अमित शहांनी केलं काश्मीरच्या निवडणुकांवर भाष्य

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 28, 2019 07:05 PM IST

ताज्या बातम्या