मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /हिवाळ्यात Blood pressure वाढतो? अशा वेळी रक्तदाब कसा ठेवाल नियंत्रणात

हिवाळ्यात Blood pressure वाढतो? अशा वेळी रक्तदाब कसा ठेवाल नियंत्रणात

रक्तदाब : 
हृदयाशी संबंधित आजार होऊ नयेत, यासाठी व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स महत्त्वाची भूमिका बजावतात. अननसाच्या रसात हे दोन्ही घटक भरपूर असतात, त्यामुळे उन्हाळ्यात रोज दुपारी एक ग्लास अननसाचा रस प्यावा.

रक्तदाब : हृदयाशी संबंधित आजार होऊ नयेत, यासाठी व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स महत्त्वाची भूमिका बजावतात. अननसाच्या रसात हे दोन्ही घटक भरपूर असतात, त्यामुळे उन्हाळ्यात रोज दुपारी एक ग्लास अननसाचा रस प्यावा.

एक एक्सरसाईझ तुम्हाला रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करू शकते.

    मुंबई, 28 ऑक्टोबर : पूर्वी उच्च रक्तदाब (High Blood Pressure) हा फक्त वृद्धांना होणारा आजार समजला जायचा; मात्र गेल्या काही वर्षांत हानिकारक जीवनशैलीमुळे तरुणांनाही उच्च रक्तदाबाचा विकार होऊ लागला आहे. उच्च रक्तदाब (How to control High Blood Pressure)  व्यक्तीस हळूहळू मृत्यूच्या दारात घेऊन जातो. म्हणूनच या विकाराला सायलेंट किलर असं म्हटलं जातं. त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात ठेवणं गरजेचं आहे. हिवाळ्यात रक्तदाब कमी-जास्त होत राहतो. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार व्यायामाचा अंतर्भाव केल्यास आणि जीवनशैलीत (Lifestyle) थोडाफार बदल केल्यास रक्तदाब नियंत्रित ठेवता येतो. 'झी न्यूज हिंदी'ने याबद्दलची माहिती प्रसिद्ध केली आहे.

    उच्च रक्तदाब म्हणजे माणसाच्या शरीरातल्या नॉर्मल रक्तदाबापेक्षा जास्त रक्तदाब होय. अनेकदा उच्च रक्तदाबाच्या रुग्णांमध्ये त्याची लक्षणं दिसत नाहीत. त्यामुळे वेळेवर उपचार न केल्याने हृदयविकार होऊ शकतो. जीवनपद्धती, राहणीमान, खाणं-पिणं आदींच्या वाईट सवयी, मद्यपान, लठ्ठपणा आणि ताणतणाव ही उच्च रक्तदाबाची कारणं आहेत. त्यामुळे आपला रक्तदाब नियमितपणे तपासणं आणि तो नियंत्रित राहील याची काळजी घेणं गरजेचं आहे.

    हे वाचा - वजन नियंत्रणात ठेवायचं आहे ना? मग नाष्ट्यात कधीही या गोष्टी खाऊ नका

    रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी दैनंदिन आहारात आल्याचा (Ginger) वापर करणं उपयुक्त ठरतं. आल्यामध्ये अनेक पोषक घटक असतात. त्यामुळे रक्ताभिसरण सुधारतं आणि स्नायूंना आराम मिळतो. रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

    मिठाशिवाय जेवण पूर्ण होत नाही. तो जेवणाचा अविभाज्य घटक आहे; मात्र ते प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात खाल्लं गेलं, तर शरीरासाठी त्रासदायक असतं. हिवाळ्यात उच्च रक्तदाबाचा त्रास होत असेल, तर आहारातलं मिठाचं प्रमाण कमी करणं आवश्यक आहे. यामुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. जेवणात मिठाचं प्रमाण वाढलं तर रक्तदाब वाढण्यासह आणखीही काही त्रास होऊ शकतात.

    जंक फूड आणि तेलकट अन्न खाणं टाळणं केव्हाही चांगलं. तसंच धूम्रपान आणि मद्यपान करणंही शरीरासाठी हानिकारक आहे. या वाईट सवयींमुळे रक्तदाब वाढतो. आरामदायी जीवनशैली आणि लठ्ठपणा यांमुळेही उच्च रक्तदाबाचा धोका वाढतो. त्यामुळे शारीरिक हालचाल वाढली तर आपला रक्तदाब नियंत्रणात यायला मदत होते. जीवनशैली निरोगी असेल, तर उच्च रक्तदाबाचा धोका कमी होतो. त्यामुळे दररोज व्यायाम करावा किंवा दररोज 30 मिनिटं चालावं. रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी दिवसभर शारीरिक हालचाली सुरू ठेवणं आवश्यक आहे.

    हे वाचा - मुलांच्या श्वासाला दुर्गंधी येतेय? वाचा, तज्ज्ञांनी सांगितलेली कारणं आणि उपाय

    वाढलेलं वजन अनेक रोगांना निमंत्रण देतं. लठ्ठपणामुळे (Fat) अनेक आजार होतात. वजन जास्त वाढलं, तर उच्च रक्तदाबाचा धोकाही वाढतो. त्यामुळे रक्तदाब आणि कोलेस्टेरॉलची पातळी नॉर्मल राखण्यासाठी वजन नियंत्रणात ठेवणं आवश्यक आहे.

    तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, isometric handgrip strengtheners ने रक्तदाब कमी करण्यास मदत होते. याद्वारे आठ आठवड्यांत रक्तदाब 8 ते 10 mmHg कमी होऊ शकतो; पण डॉक्टरांच्या सल्ल्यानेच आपल्या दैनंदिन जीवनात याचा समावेश करावा. शरीर निरोगी ठेवण्यासाठी सर्व गोष्टींकडे व्यवस्थितपणे लक्ष द्यावं. असं केल्यास दीर्घायुषी होण्यास नक्की मदत होऊ शकेल.

    (सूचना - या लेखात दिलेली माहिती सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत याची पुष्टी करत नाही. त्यामुळे अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा)

    First published:

    Tags: Health, Health Tips, Lifestyle