• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • Foods for Zinc : या 5 गोष्टींच्या मदतीनं भरून काढा शरीरातील झिंकची कमतरता

Foods for Zinc : या 5 गोष्टींच्या मदतीनं भरून काढा शरीरातील झिंकची कमतरता

निरोगी पुरुषानं आहारात दररोज 11 मिलीग्राम झिंकचे सेवन केलं पाहिजे. तर, महिलांनी दररोज 8 मिलीग्राम झिंकचं सेवन केलं पाहिजे. तथापि, जेव्हा एखादी स्त्री गरोदर असते किंवा स्तनपान करते तेव्हा तिला दररोज 12 मिलीग्राम (Best foods for high zinc) झिंकची आवश्यकता असते.

 • Share this:
  नवी दिल्ली,18 नोव्हेंबर : निरोगी जीवनासाठी झिंक हे अत्यंत महत्त्वाचं खनिज आहे. शरीरातील 300 पेक्षा जास्त एन्झाईम्सच्या कार्यासाठी झिंक आवश्यक आहे. झिंक रोगप्रतिकारक शक्ती (immune system) मजबूत राखतं आणि शरीरातील ऊतींना दुरुस्त करण्याचं काम करतं. विशेष म्हणजे झिंक शरीरात साठवता येत नाही. त्यामुळं ज्या दिवशी तुम्ही झिंकयुक्त पदार्थ खाता, त्याच दिवशी शरीरात झिंक तयार होतं. शरीरात झिंकची रोज गरज असल्यानं झिंकची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात दररोज झिंकयुक्त पदार्थ घेणं आवश्यक आहे. झिंकच्या कमतरतेमुळं शरीरात अनेक समस्या निर्माण होतात, ज्यामुळं आरोग्याला हानी पोहोचते. अहवालानुसार, निरोगी पुरुषानं आहारात दररोज 11 मिलीग्राम झिंकचे सेवन केलं पाहिजे. तर, महिलांनी दररोज 8 मिलीग्राम झिंकचं सेवन केलं पाहिजे. तथापि, जेव्हा एखादी स्त्री गरोदर असते किंवा स्तनपान करते तेव्हा तिला दररोज 12 मिलीग्राम (Best foods for high zinc) झिंकची आवश्यकता असते. झिंक कमतरतेची लक्षणे हेल्थलाइनच्या बातमीनुसार, शरीरात झिंकची कमतरता असल्यास वजन कमी होऊ लागते, त्यामुळे अशक्तपणा जाणवतो. झिंकच्या कमतरतेमुळे भूक मंदावते. त्याचा मानसिक आरोग्यावरही वाईट परिणाम होतो. याशिवाय झिंकच्या कमतरतेमुळं केस गळायला लागतात आणि जखमही लवकर बरी होत नाही. झिंकसाठी हे पदार्थ खा मांस : झिंकची कमतरता पूर्ण करण्यासाठी मांस हा एक उत्कृष्ट स्त्रोत आहे. 100 ग्रॅम मांसामध्ये 4.8 मिलीग्राम झिंक आढळतं. शंभर ग्रॅम मांस 176 कॅलरी ऊर्जा प्रदान करते. याशिवाय इतर अनेक प्रकारची जीवनसत्त्वंही मांसातून मिळतात. शेंगांच्या भाज्या: भारतात प्रत्येकाला मांसाहार आवडत नाही. परंतु, असं अनेक शाकाहारी पदार्थ आहेत ज्यातून झिंकची कमतरता सहजतेनं भरून काढता येते. यापैकी एक म्हणजे वेगवेगळ्या शेंगांची भाजी. जसे चणे, मसूर, तूर, सोयाबीन इ. या सर्वांमध्ये झिंक मुबलक प्रमाणात आढळतं. हे वाचा - Mental health: डिप्रेशनमध्ये जाण्याची ही असतात लक्षणं; त्यातून बाहेर काढण्यासाठी मित्र, नातेवाईकांना अशी करा मदत बिया : भोपळा, भोपळा, तीळ यांसारख्या बियांमध्येही झिंक मुबलक प्रमाणात आढळतं. याशिवाय, या बियांमध्ये भरपूर फायबर असतं. यासाठी या पदार्थांचे रोज सेवन करावं. शेंगदाणे: शेंगदाण्यामध्ये लोह, पोटॅशियम, फॉलिक अॅसिड, व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम आदींसह झिंकदेखील असतं. हे वाचा - या चुकांमुळं हिवाळ्यात वाढतो Heart Attack चा धोका, या गोष्टी टाळणंच ठरेल फायदेशीर अंडी: अंडी हा प्रथिनयुक्त आहार आहे, हे आपणा सर्वांना माहीतच आहे. पण त्यात झिंकदेखील पुरेशा प्रमाणात असतं. अंड्यातील पिवळ बलकामध्ये झिंक, कॅल्शियम, लोह, व्हिटॅमिन बी12, थायामिन, व्हिटॅमिन बी6, फोलेट आणि फॉस्फरस सारखे घटक आढळतात, जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
  Published by:News18 Desk
  First published: