Home /News /lifestyle /

तुमची संडासला बसण्याची पद्धत कदाचित चुकीची असू शकते; या घातक आजारांचा वाढतो धोका

तुमची संडासला बसण्याची पद्धत कदाचित चुकीची असू शकते; या घातक आजारांचा वाढतो धोका

शौचालय वापरण्याच्या पद्धतीशी रोगांचा काही संबंध आहे का? किंवा शौचालयात जाण्याची चुकीची पद्धतही असते का, असे प्रश्नही आपल्याला पडू शकतात. त्यामुळं इथं हे जाणून घेणं आवश्यक आहे...

    नवी दिल्ली, 20 जानेवारी : जर एखाद्याला विचारलं की शौचालयाचा योग्य वापर कसा करायचा, हे तुम्हाला माहीत आहे का? किंवा जर तुम्हाला असं सांगितलं की तुम्हाला असा आजार आहे, जो तुम्ही शौचालयाचा योग्य प्रकारे वापर करत नसल्यामुळं झाला आहे. तुम्हाला शौचालय वापरण्याची योग्य पद्धत माहीत नाही आणि तुम्ही ती शिकली पाहिजे, असं आपल्याला कोणी सांगितलं तर? वरील प्रश्न ऐकल्यानंतर एक तर आपण आश्चर्यचकित होऊ, नाही तर प्रश्न विचारणाऱ्याला मूर्ख समजू. शौचालय वापरण्याच्या पद्धतीशी रोगांचा काही संबंध आहे का? किंवा शौचालयात जाण्याची चुकीची पद्धतही असते का, असे प्रश्नही आपल्याला पडू शकतात. त्यामुळं इथं हे जाणून घेणं आवश्यक आहे की, जर तुम्ही शौचालय योग्य प्रकारे वापरत (The right way to sit on the toilet) नसाल, तर तुम्ही आजारांना आमंत्रण देत आहात आणि हे आजार सौम्य नसून भयंकर आणि वेदनादायक आहेत. एसएम योगा रिसर्च इन्स्टिट्यूट अँड नॅचरोपॅथी हॉस्पिटल इंडियाचे सचिव आणि शांती मार्ग दि योगाश्रम अमेरिकाचे संस्थापक आणि सीईओ योगगुरू डॉ. बालमुकुंद शास्त्री म्हणतात की, लोकांची आजची जीवनशैली अनेक आजारांना आमंत्रण देत आहे. परंतु त्याहूनही अधिक आजार लोक दररोज ज्या दिनचर्येचं पालन करतात, त्यामुळं होत आहेत. चुकीच्या पद्धतींमुळं शरीरातील नित्यनियमांची कामं ठप्प होतात. शौचालय वापरणं हे त्यापैकी एक आहे. भारताबद्दल बोलायचं झाले तर इथं दोन प्रकारची शौचालयं वापरली जातात. एक म्हणजे भारतीय किंवा स्क्वॅटिंग टॉयलेट आणि दुसरं वेस्टर्न म्हणजे इंग्लिश कमोड टॉयलेट (Commode Toilet), पण दोन्हीही शौचालयांचा वापर नीट न केल्यामुळं बहुतांश लोकांना पोटात बद्धकोष्ठतेची समस्या निर्माण झाली आहे. आज प्रत्येक दुसऱ्या किंवा तिसऱ्या व्यक्तीला बद्धकोष्ठता किंवा पोट व्यवस्थित साफ न होण्याची समस्या भेडसावत आहे. डॉ. बालमुकुंद म्हणतात की, शौचासाठी दोन पायांवर बसण्याची पद्धत हीच योग्य पद्धत आहे. ही भारतात आधीपासूनच वापरली जात आहे. असं केल्यानं आपल्या शरीरातील डोक्यापासून ते पायापर्यंतच्या नसा उघडतात आणि पोटावरही योग्य दाब पडतो. त्यामुळं शौच प्रक्रियेला गती मिळते. यासोबतच आतडं आणि पाठीचा कणा त्यांच्या योग्य स्थितीत येतो. विष्ठेचं उत्सर्जन चांगल्या प्रकारे होतं आणि जास्त जोर लावण्याची गरज पडत नाही. मात्र,या शौचालयाचा वापर करतानाही लोक अनेक चुका करतात. जर आपण वेस्टर्न टॉयलेट किंवा कमोडबद्दल विचार केला तर ही शौचालयं वापरणाऱ्यांना बद्धकोष्ठतेची समस्या भारतीय शौचालयं वापरणाऱ्यांपेक्षा जास्त आहे. कमोडवर बसल्यानं पाठीचा कणा व आतडं योग्य स्थितीत राहत नाहीत. पोटावर योग्य तो दाब पडत नाही. त्यामुळं कमोडचा वापर करताना मलोत्सर्जनासाठी जास्त जोर द्यावा लागतो आणि बद्धकोष्ठतेसह पोटाचे अनेक आजार उद्भवतात. पोटात बद्धकोष्ठता झाल्यामुळं कोणते रोग होऊ शकतात? डॉक्टर बालमुकुंद शास्त्री सांगतात की, पोटात बद्धकोष्ठतेची समस्या शौचाला बसण्याची योग्य पद्धत नसल्यामुळे सर्वाधिक असते. नेहमी भारतीय शौचालय वापरणारे जेव्हा कमोड वापरतात तेव्हा त्यांचं पोट साफ होत नसल्याचं अनेकदा दिसून आलंय. शौचक्रिया साफ होण्यासाठी जास्त जोर लावल्यामुळं वेदना, शौचामध्ये रक्त येणं, गुदद्वाराजवळ सूज येणं आदी समस्या या प्रक्रियेत सुरू होतात. सलग अनेक दिवस बद्धकोष्ठता राहिल्यामुळं, मूळव्याध, गुदद्वारासंबंधीचे विकार, गुदद्वाराला चिरा पडणं, गुदद्वाराचा कर्करोग, प्रोक्टायटिस या समस्या लोकांमध्ये फार लवकर उद्भवतात. पोटात घाण साचल्यामुळं, पचनशक्ती कमी राहिल्यानं व्रण, जीवनशैलीमुळं होणारे विकार जसं की मधुमेह आदी, पोटात अनेक रोगांचे, वाईट बॅक्टेरिया वाढू शकतात. विशेष म्हणजे पोटात सतत बद्धकोष्ठतेमुळं उच्च रक्तदाबाची समस्या देखील होऊ शकते. हे वाचा - टाइप-1 आणि टाइप-2 मधुमेहामध्ये काय आहे फरक? या चुकांमुळे शरीरात घुसतो..परत माघारी फिरत नाही शौचालयात घालवला जाणारा वेळ टॉयलेटमध्ये कमोड सुरू झाल्यापासून लोकांचा टॉयलेटमध्ये घालवण्याचा वेळ वाढला असल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे. यादरम्यान लोक टॉयलेटमध्ये मोबाईल फोन किंवा वर्तमानपत्र घेऊन जातात. त्यामुळं ते तिथे अर्धा तास किंवा त्याहून अधिक वेळ बसतात. खरं तर किमान 1 मिनिट ते जास्तीत जास्त 15 मिनिटं इतकाच वेळ शौचालयात घालवणं योग्य आहे. यापेक्षा कमी आणि जास्त वेळ घालवणं हानिकारक आहे. शौचालयात जास्त वेळ घालवल्यास तेथील जीवाणू शरीरात प्रवेश करतात. भारतीय आणि पाश्चात्य शौचालयात बसण्याची ही आहे योग्य पद्धत कमोडमध्ये बसण्याची पद्धत डॉ. बालमुकुंद सांगतात की, जेव्हाही आपण पाश्चात्य शौचालय म्हणजेच कमोड वापरतो, तेव्हा पायाखाली छोटं स्टूल ठेवणं हाच योग्य मार्ग आहे. हे स्टूल इतकं उंच असावं की, त्यावर पाय ठेवून तुम्ही आरामात कमोडवर बसू शकाल आणि तुमच्या गुडघ्यापासून घोट्यापर्यंतचा पाय जमिनीवर सरळ येण्याऐवजी थोडासा तिरका राहील. असं केल्यावर हातांची कोपरं गुडघ्यावर ठेवा आणि तळहातांची पाठ हनुवटीवर ठेवा. यामुळं पोट तर साफ होईलच; शिवाय, पोटात बद्धकोष्ठतेचा त्रासही होणार नाही. हे वाचा - हाडांच्या मजबुतीसाठी फक्त कॅल्शियमच हवं हा गैरसमज; या गोष्टींचीही असते आवश्यकता पूर्वी भारतीय शैलीच्या शौचालयामध्ये बसताना हनुवटीच्या खाली हात ठेवला जायचा. असं होण्याचं कारण म्हणजे मानवी शरीरात 72 हजार नाड्या आहेत, त्यापैकी काहींचे दाब बिंदू (accupressure points) हनुवटीमध्ये आहेत. तेव्हा हातानं हनुवटीवर दाब दिल्यास या नाड्या सक्रिय होतात आणि मल उत्सर्जन अधिक चांगल्या पद्धतीनं व सहज होतं. भारतीय टॉयलेटमध्ये बसण्याची पद्धत - भारतीय शौचालयाबद्दल बोलायचं तर यामध्ये लोक पायांवर बसतात, हे खरं आहे. परंतु, या काळात लोक हातांची अधिक हालचाल करतात. तर इथेही दोन्ही कोपर गुडघ्यांवर ठेवावेत आणि हात हनुवटीच्या खाली ठेवावेत, जेणेकरून तेथील बिंदू दाबले जाऊन मलविसर्जनाला गती मिळेल. मात्र, या शौचालयामध्ये बराच वेळ बसल्यानं लोकांच्या घोट्यावर जास्त भार टाकतात, त्यामुळं अनेक समस्या निर्माण होतात. असं होऊ नये,यासाठी व्यक्तीनं दोन्ही बोटांवर आणि टाचांवर शरीराचं वजन समान ठेवावं. यासोबतच पोट साफ न झाल्यास लोक या शौचालयामध्ये जोर लावू लागतात, यामुळं आजार होऊ शकतात.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health, Health Tips

    पुढील बातम्या