मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Coronavirus and Lungs: फुफ्फुसाच्या आजारांमध्ये का घातक बनतो कोरोना विषाणू; संशोधनातून आली ही बाब समोर

Coronavirus and Lungs: फुफ्फुसाच्या आजारांमध्ये का घातक बनतो कोरोना विषाणू; संशोधनातून आली ही बाब समोर

क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (सीओपीडी) असलेल्या लोकांमध्ये कोविडचा संसर्ग सामान्य लोकांपेक्षा अधिक गंभीर का आहे. यामुळे फुफ्फुसाचा आजार असलेल्या लोकांना गंभीर अवस्थेपासून वाचवण्यासाठी नवीन उपचारही सापडण्याची शक्यता आहे.

क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (सीओपीडी) असलेल्या लोकांमध्ये कोविडचा संसर्ग सामान्य लोकांपेक्षा अधिक गंभीर का आहे. यामुळे फुफ्फुसाचा आजार असलेल्या लोकांना गंभीर अवस्थेपासून वाचवण्यासाठी नवीन उपचारही सापडण्याची शक्यता आहे.

क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (सीओपीडी) असलेल्या लोकांमध्ये कोविडचा संसर्ग सामान्य लोकांपेक्षा अधिक गंभीर का आहे. यामुळे फुफ्फुसाचा आजार असलेल्या लोकांना गंभीर अवस्थेपासून वाचवण्यासाठी नवीन उपचारही सापडण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली, 22 मे : फुफ्फुसाचे आजार असलेल्या रुग्णांना गंभीर कोरोना संसर्ग होण्याची शक्यता असते, परंतु संशोधकांना आता आढळून आले आहे की, क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (सीओपीडी) असलेल्या लोकांमध्ये कोविडचा संसर्ग सामान्य लोकांपेक्षा अधिक गंभीर का आहे. यामुळे फुफ्फुसाचा आजार असलेल्या लोकांना गंभीर अवस्थेपासून वाचवण्यासाठी नवीन उपचारही सापडण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियाच्या सेंटेनरी इन्स्टिट्यूट आणि युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी सिडनीच्या संशोधकांना त्यांच्या अभ्यासात असे आढळून आले की, एसओपीडीच्या स्थितीत, वायुनलिका (windpipe) ब्लॉक होते, ज्यामुळे श्वास घेणं कठीण होतं. जगभरात सुमारे 40 कोटी लोक या आजाराने ग्रस्त (Coronavirus and Lungs Problem) आहेत.

या अभ्यासाचे निष्कर्ष अमेरिकन जर्नल ऑफ रेस्पिरेटरी अँड क्रिटिकल केअर मेडिसिनमध्ये (American Journal of Respiratory and Critical Care Medicine) प्रकाशित झाले आहेत. अभ्यासासाठी, संशोधकांनी COPD रुग्ण आणि निरोगी लोकांच्या विंडपाइप्समधून पेशी काढून टाकल्या आणि त्यांना SARS-CoV-2 (कोरोनाचे कारण) ने संक्रमित केले. त्यावेळी आढळले की, COPD असलेल्या लोकांच्या विंडपाइप पेशींमध्ये निरोगी पेशींपेक्षा संसर्ग होण्याची शक्यता 24 पट जास्त असते.

तज्ज्ञ काय म्हणतात -

अभ्यासाचे मुख्य लेखक आणि सेंटेनरी यूटीएस सेंटर फॉर इन्फ्लॅमेशनचे संशोधक मॅट जोहानसेन यांनी सांगितले की, संक्रमित पेशीच्या आरएनए अनुक्रमाद्वारे त्याची अनुवांशिक माहिती गोळा केली गेली. सात दिवसांनंतर, असे आढळून आले की SARS-CoV-2 संसर्गाचा व्हायरल लोड सीओपीडी असलेल्या रुग्णांच्या पेशींमध्ये निरोगी व्यक्तींकडून घेतलेल्या पेशींपेक्षा 24 पट जास्त आहे.

हे वाचा - Summer Health: उन्हाळ्यात डिहायड्रेशनचे कारण ठरतात या 5 गोष्टी; आजपासूनच खाताना काळजी घ्या

ते पुढे म्हणाले, “सीओपीडी हा एक इंफ्लेमेटरी आजार आहे, ज्यामध्ये निरोगी लोकांच्या तुलनेत रुग्णांना बेसलाइनवर सूज वाढू शकते. त्यामुळे SARS-CoV-2 मध्ये उच्च दाहकता वाढवण्याची शक्यता जास्त आहे, ज्यामुळे रुग्णावर परिणाम आणखी वाईट होतात.”

हे वाचा -  Cardamom Benefits: वेलची खाण्याचे इतके फायदे अनेकांना माहीतच नाहीत; अनेक समस्यांवर आहे प्रभावी

अभ्यासात काय झाले -

संशोधन टीमला अभ्यासादरम्यान असेही आढळून आले की, ट्रान्समेम्ब्रेन प्रोटीज सेरीन 2 (TMPRSS2) आणि कॅथेप्सिन बी (CTSB) चे स्तर सीओपीडी असलेल्या संक्रमित पेशींमध्ये वाढले आहेत. SARS-CoV-2 (SARS CoV 2) होस्ट सेलमध्ये प्रवेश करण्यासाठी या दोन्ही एन्झाईमचा वापर करते. कारण COPD रुग्णांमध्ये या दोन एन्झाईम्सची पातळी वाढलेली असते, COPD असलेल्या लोकांमध्ये संसर्ग होण्यास निरोगी माणसांपेक्षा परिस्थिती अधिक अनुकूल असते.

First published:

Tags: Corona