मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /वजन कमी करण्यासाठी एकदा पांढऱ्या भोपळ्याचा ज्युस ट्राय करा; दिसेल चांगला परिणाम

वजन कमी करण्यासाठी एकदा पांढऱ्या भोपळ्याचा ज्युस ट्राय करा; दिसेल चांगला परिणाम

White pumpkin juice Benefits for weight loss: पांढऱ्या भोपळ्याचा रस प्यायल्याने वजन कमी होण्यास कशी मदत होते, हा रस पिण्याचे आरोग्यावर काय फायदे होतात, याविषयी जाणून घेऊया.

White pumpkin juice Benefits for weight loss: पांढऱ्या भोपळ्याचा रस प्यायल्याने वजन कमी होण्यास कशी मदत होते, हा रस पिण्याचे आरोग्यावर काय फायदे होतात, याविषयी जाणून घेऊया.

White pumpkin juice Benefits for weight loss: पांढऱ्या भोपळ्याचा रस प्यायल्याने वजन कमी होण्यास कशी मदत होते, हा रस पिण्याचे आरोग्यावर काय फायदे होतात, याविषयी जाणून घेऊया.

मुंबई, 20 मार्च : आजकाल वाढलेलं वजन कमी करणं हे मोठं आव्हानात्मक काम बनलं आहे. कित्येकजण वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे ज्यूस (Weight loss juice) पितात. काहींना लगेच परिणाम मिळतो तर काहींचे वजन काही केल्या कमी होत नाही. अनेक प्रयत्न करूनही वजन कमी होत नसेल तर पांढऱ्या भोपळ्याचा रस (White pumpkin juice) पिऊ शकता. त्यात आहारातील फायबर, विविध प्रकारचे पोषक घटक असतात, जे चयापचय वाढवून वजन वेगाने कमी करण्यास मदत करतात. यासोबतच त्याचे आरोग्यालाही अनेक फायदे आहेत. पांढऱ्या भोपळ्याचा रस प्यायल्याने वजन कमी होण्यास कशी मदत होते, हा रस पिण्याचे आरोग्यावर काय फायदे (pumpkin juice for weight loss) होतात, याविषयी जाणून घेऊया.

पांढऱ्या भोपळ्याच्या रसातील पोषक घटक

या रसामध्ये पोटॅशियम, कॅल्शियम सारखी अनेक प्रकारची खनिजे आणि जीवनसत्त्वे ए, सी, ई सारखी जीवनसत्त्वे असतात. याव्यतिरिक्त त्यामध्ये अँटीऑक्सिडंट्समध्ये देखील भरपूर (White pumpkin juice Benefits for weight loss) असतात.

वजन कमी करण्यासाठी

स्टाइलक्रेसमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका रिपोर्टनुसार, जर तुम्ही काही गोष्टी मिक्स करून रोज सकाळी पांढऱ्या भोपळ्याच्या रसाचे सेवन केले तर वजन कमी होऊ शकते. पांढऱ्या भोपळ्यात वेलची घालून रस तयार करू शकता. यामुळे वजन जलद कमी करण्यास मदत होते. यासाठी भोपळा सोलून त्याचे लहान तुकडे करा. हे तुकडे मिक्सरमध्ये थोडे पाणी, 1 चमचा लिंबाचा रस, काळी मिरी पावडर, मीठ घालून मिक्स करा. आता ते एका ग्लासमध्ये गाळून घ्या. दोन छोट्या वेलचीची पावडर करून रसात मिसळा. गोडपणासाठी आपण मध देखील घालू शकता. हा रस काही दिवस सकाळी प्या.

पांढऱ्या भोपळ्याचा रस पिण्याचे फायदे

ज्यांची त्वचा तेलकट आणि कोरडी आहे त्यांनी पांढऱ्या भोपळ्याचा रस प्यावा. त्यात अँटी-एक्ने, अँटी-एजिंग गुणधर्म देखील आहेत.

हे वाचा - उन्हाळ्याच्या दिवसात रोज यावेळी खा फक्त 1 संत्री; मिळतील आश्चर्यकारक फायदे

हा रस नैसर्गिक एक्सफोलिएटर म्हणून काम करतो. त्वचेच्या खालच्या थरावरील जुन्या पेशी काढून नवीन पेशी निर्माण होण्यास मदत होते.

ज्यांचे केस जास्त कोरडे, निर्जीव आहेत त्यांनीही हा रस प्यावा.

इन्फेक्शन, आजारांपासून लांबच राहायचे असेल तर पांढऱ्या भोपळ्याचा रस प्या. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.

विशेषत: पुरुषांनी भोपळा, भोपळ्याचे दाणे, पांढर्‍या भोपळ्याचा रस प्यावा. भोपळ्यात कॅरोटीनोइड्स आणि झिंक असते, ज्यामुळे प्रोस्टेट कर्करोग, प्रोस्टेट वाढण्याचा धोका कमी होतो.

हे वाचा - या फळं-भाज्यांच्या बिया कधीही फेकू नयेत; गंभीर आजारांवर आहेत गुणकारी

यामध्ये असलेले व्हिटॅमिन ए डोळ्यांच्या समस्यांपासून बचाव करते. पेप्टिक अल्सर, पाचन समस्यांवर उपचार करते, तसेच गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्ट निरोगी ठेवते.

(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Weight, Weight loss