मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Iron for Health: आपल्या शरीराला दररोज किती लोह आवश्यक असतं, योग्य प्रमाण जाणून घ्या

Iron for Health: आपल्या शरीराला दररोज किती लोह आवश्यक असतं, योग्य प्रमाण जाणून घ्या

How much iron do you need? आपल्याला दररोज किती लोहाची गरज असते, हे त्या व्यक्तीचं वय, लिंग आणि एकूण आरोग्यावर अवलंबून असते. नवजात बालकांना प्रौढांपेक्षा जास्त लोह आवश्यक असतं. 4 ते 8 वर्षं वयोगटातील मुलांना दररोज 4 ते 8 मिलीग्राम लोह आवश्यक असतं.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 09 डिसेंबर : वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार, प्रजननक्षम वयोगटातील जगातील एक तृतीयांश महिला अशक्तपणा किंवा रक्ताच्या कमतरतेनं ग्रस्त आहेत. आकडेवारीनुसार, 40 टक्के गर्भवती महिला अशक्त आहेत. दुसरीकडे 5 वर्षांखालील 40 टक्के मुलंदेखील अशक्तपणानं ग्रस्त आहेत. अशक्तपणा म्हणजे रक्तातील (Blood) लोहाची कमतरता. जगभरात लाखो लोक या समस्येनं त्रस्त आहेत. गंमत अशी आहे की, बहुतेक लोकांना आपल्याला अ‍ॅनिमिया (Anemia) आहे, याची जाणीवही (How much iron do you need?) नसते.

जेव्हा रक्तात लोहाची कमतरता असते, तेव्हा त्याला अॅनिमिया म्हणतात. त्यामुळं लाल रक्तपेशींमध्ये (RBC) हिमोग्लोबिनची (Hemoglobin) कमतरता असते. हिमोग्लोबिनमुळं ऑक्सिजन शरीराच्या प्रत्येक अवयवापर्यंत पोहोचतो. अशक्तपणामुळं शरीरात इतर अनेक गोष्टींची कमतरता निर्माण होऊ लागते. यामुळं शरीर कमकुवत होऊ लागतं आणि पीडित व्यक्ती कोणत्याही प्रकारच्या संसर्गाला सहज बळी पडते. पण तुम्हाला माहित आहे का की, आपल्याला रोज किती लोहाची गरज असते? लोक या विषयाकडे लक्ष देत नाहीत. जर आपल्याला योग्य प्रमाणात माहिती मिळाली तर आपण आपल्या शरीरातील लोहाची कमतरता पूर्ण करण्यासाठी सहजपणे उपाय शकतो. चला तर मग, जाणून घेऊया आपल्याला दररोज किती लोहाची गरज आहे.

अॅनिमियाची लक्षणे

थकवा आणि अशक्तपणा

त्वचेचा रंग फिकट आणि निस्तेज होणं

श्वासोच्छवासाची समस्या

डोकेदुखी

हृदयाचे ठोके जलद गतीनं पडणं

छातीत दुखणं

हात आणि पाय थंड पडणं

नखांच्या रंगामध्ये बदल होणं (फिकट आणि निस्तेज)

केस गळणं

तोंड येणं

चिकणमाती, बर्फ इ. खाण्याची इच्छा होणं

घसा खवखवणं आणि जीभ सुजणे

अंथरुणावर पाय हलवण्याची इच्छा होणं

हे वाचा - Radhe Developers शेअरमुळे गुंंतवणूकदार मालामाल! सहा महिन्यात स्टॉकमध्ये 3150 टक्क्यांची वाढ

दररोज किती लोह आवश्यक आहे

इंडियन एक्स्प्रेसच्या बातमीनुसार, आपल्याला दररोज किती लोहाची गरज असते, हे त्या व्यक्तीचं वय, लिंग आणि एकूण आरोग्यावर अवलंबून असते. नवजात बालकांना प्रौढांपेक्षा जास्त लोह आवश्यक असतं. 4 ते 8 वर्षं वयोगटातील मुलांना दररोज 4 ते 8 मिलीग्राम लोह आवश्यक असतं. तर, 9 ते 13 वर्षे वयोगटातील मुलांना दररोज 8 मिलीग्राम लोह आवश्यक असते. प्रौढांमध्ये, स्त्रियांना पुरुषांपेक्षा दुप्पट जास्त लोह आवश्यक असतं. कारण, महिलांना दर महिन्याला मासिक स्राव जातो. 19 ते 50 वयोगटातील महिलांना दररोज 19 मिलीग्राम लोहाची आवश्यकता असते. तर, त्याच वयोगटातील पुरुषांना दररोज केवळ 8 मिलीग्राम लोह आवश्यक असतं. याशिवाय, गर्भवती महिलांना दररोज 27 मिलीग्राम लोहाची आवश्यकता असते.

हे वाचा - मित्रांनी लग्नात दिलं भलंमोठं गिफ्ट, सत्य समजल्यावर उडाले हास्याचे कारंजे; पाहा VIDEO

लोह वाढवण्याचे मार्ग

लोहयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करून शरीरातील लोहाची कमतरता भरून काढता येते. लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी मांस, मासे, चिकन इत्यादी मांसाहारांचा आहारात समावेश करावा. शाकाहारी लोकांनाही लोहाची कमतरता अनेक पदार्थांनी भरून काढता येते. चणे, मसूर, बीन्स, पालक, मटार, कोबी, मोड आलेली कडधान्यं, तृणधान्यं इत्यादींमध्ये लोह मुबलक प्रमाणात आढळतं.

First published:

Tags: Health, Health Tips