मुंबई, 01 जून : पोटावरील चरबी घालवायची असेल तर आपल्याला जिममध्ये जावे लागेल आणि त्याच वेळी हेल्दी डाएट प्लॅन फॉलो करावा लागेल. व्यायाम आणि आहार हे दोन महत्त्वाचे टप्पे आहेत जे आपल्याला आदर्श वजन साध्य करण्यात मदत करतील. वजन कमी करण्यासाठी आपल्या आहाराकडे अधिक लक्ष देणे, ही देखील काळाची गरज आहे. तुम्ही हेल्दी फूड खात असलात तरी याचा अर्थ असा नाही की, तुम्ही ते जास्त प्रमाणात खाऊ शकता. त्यामुळे गुणवत्तेसोबतच खाद्यपदार्थाच्या प्रमाणाकडेही तितकेच लक्ष दिले पाहिजे. आता तुम्हाला असे वाटत असेल की, आम्ही तुम्हाला कमी उष्मांक किंवा कमी आहार घेण्याचा सल्ला देणार आहोत, तर तसे नाही. आम्ही तुम्हाला फक्त बाउल मेथड (Bowl Method) पद्धतीबद्दल थोडी माहिती देऊ इच्छितो. कारण त्याचा अनेकांना खूप उपयोग होईल.
आपल्या आवडत्या पदार्थांचा आस्वाद घेत असूनही वजन कमी करण्यासाठी बाउल मेथड (Bowl Method) पद्धत ही एक प्रभावी पद्धत आहे. तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल की, ही बाउल मेथड म्हणजे काय?
बाउल पद्धतीमध्ये प्रामुख्याने आपल्या अन्नाचे प्रमाण मोजण्यासाठी आणि जास्त खाण्यापासून रोखण्यासाठी एक लहान वाडगा निवडणे आवश्यक आहे. तुमच्या चवीष्ट खाण्याशी तडजोड न करता वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी याचा फायदा होतो.
बाउल पद्धत कशी पाळायची?
- दररोज आपल्या जेवणासाठी 3 लहान वाट्या घ्या
- प्रत्येक वाटी तुमच्या आवडत्या पदार्थांनी भरा.
हे वाचा - विवाहित पुरुषांनी यासाठी मनुके खायला हवेत; आरोग्याला असा होतो फायदा
- अतिरिक्त काहीही खाऊ नका
- दुसऱ्यांदा घ्यायचं नाही
- तुम्ही तुमच्या जेवणासाठी वाडग्यात घेतलेलंच अन्न खा, इतर कोणत्याही वस्तूंचा जेवणात समावेश करू नका
- जर तुमच्या अन्नामध्ये कॅलरीजचे प्रमाण खूप जास्त असेल तर फक्त 2 लहान वाट्या घ्या.
- नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणासाठी ही वाटी पद्धत वापरा
हे वाचा - Type 2 Diabetes असेल तर या 4 प्रकारची हिरवी पानं चावून खा; दिसेल चांगला परिणाम
जास्त खाण्यावर नियंत्रण ठेवण्याचा दुसरा मार्ग म्हणजे भूक लागलेली असताना जेवण खाण्यास सुरुवात करण्यापूर्वी एक ग्लास पाणी पिणे. हे तुम्हाला हायड्रेटेड ठेवेल आणि भूक आणि लालसा कमी करेल आणि तुमच्या कमी खाल्लं जाण्यास मदत करेल. लोक अन्न हळूहळू चघळण्याची शिफारस करतात, कारण यामुळे अन्न पचण्यास सोपे जाते आणि एकूण अन्न सेवन कमी करण्यास देखील मदत होते.
(सूचना: येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Health Tips, Weight, Weight loss tips