मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /वजन कमी करण्याचा हा उपाय अनेकांना पटणार नाही; असं झोपून वजन कमी होऊ शकतं?

वजन कमी करण्याचा हा उपाय अनेकांना पटणार नाही; असं झोपून वजन कमी होऊ शकतं?

Lose Weight While Sleeping : आपण गाढ झोपतो तेव्हा या काळात श्वास, घाम आणि शरीरातील पाणी कमी होत राहिल्याने आपले वजन 83 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकते. प्रत्येक व्यक्तीच्या चयापचय दरावर देखील ते अवलंबून असते. जाणून घेऊया झोपून वजन कसं कमी करता येईल.

Lose Weight While Sleeping : आपण गाढ झोपतो तेव्हा या काळात श्वास, घाम आणि शरीरातील पाणी कमी होत राहिल्याने आपले वजन 83 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकते. प्रत्येक व्यक्तीच्या चयापचय दरावर देखील ते अवलंबून असते. जाणून घेऊया झोपून वजन कसं कमी करता येईल.

Lose Weight While Sleeping : आपण गाढ झोपतो तेव्हा या काळात श्वास, घाम आणि शरीरातील पाणी कमी होत राहिल्याने आपले वजन 83 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकते. प्रत्येक व्यक्तीच्या चयापचय दरावर देखील ते अवलंबून असते. जाणून घेऊया झोपून वजन कसं कमी करता येईल.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 02 जून : वजन वाढण्याची समस्या सध्या प्रत्येक घरात पाहायला मिळत आहे. घरातील बहुतेक सदस्य वाढत्या वजनामुळे त्रस्त असतात आणि वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असतात. घाम न गाळता वजन कमी करणे आणि आहार सांभाळणे हे अवघड काम आहे, हे आपणा सर्वांना माहीत आहे. वजन कमी करण्यासाठी काही लोक जिममध्ये तासनतास घाम गाळतात आणि कठोर दिनचर्या पाळतात. पण, हे सगळं करणं प्रत्येकाला जमत (Lose Weight While Sleeping) नाही.

कठोर परिश्रम न करता आणि वर्कआउटसाठी वेळ न काढता वजन कमी करू शकता. होय, अनेकांना हे वाचून आश्चर्य वाटेल, मात्र मेडिकल न्यूज टुडेने दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा आपण गाढ झोपतो तेव्हा या काळात श्वास, घाम आणि शरीरातील पाणी कमी होत राहिल्याने आपले वजन 83 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकते. प्रत्येक व्यक्तीच्या चयापचय दरावर देखील ते अवलंबून असते. जाणून घेऊया झोपून वजन कसं कमी करता येईल.

झोपताना असे वजन कमी करा -

रूटीन फॉलो करा-

आपण दररोज एका ठराविक वेळी झोपायला गेलात तर शरीराला एका विशिष्ट वेळी झोपण्याची सवय लागेल. दिवसभर कामांनी थकल्यानंतर रात्री कोणालाही लगेच झोप येते आणि 7 ते 8 तासांची ही गाढ झोप वजन कमी करण्यासाठी खूप उपयुक्त ठरते.

गाढ झोपेसाठी -

खोलीत प्रकाश असेल तर तुम्हाला चांगली झोप लागणार नाही. वजन कमी करायचे असेल तर रात्री दिवे बंद करू न झोपा. अंथरुण आरामदायी असावे आणि स्वच्छ चादरी घेऊन झोपा. या बेसिक गोष्टी फॉलो केल्याने गाढ झोप लागेल आणि तुमचे वजनही कमी होईल.

जेवल्यानंतर काही तासांनी झोपा -

जेवल्यानंतर लगेच झोपायला गेलात तर त्याचा आपल्या पचनशक्तीवर परिणाम होऊ शकतो. यामुळे आपली चयापचय क्रिया नीट होत नाही. झोपण्यापूर्वी कॅफिनयुक्त पदार्थांचे सेवन टाळा. नेहमी झोपण्याच्या 2 ते 3 तास आधी अन्न खावे.

हे वाचा -  आवळ्याचा रिकाम्या पोटी करा असा उपयोग; वजनात लगेच दिसेल फरक

ब्लँकेटशिवाय झोपा -

जेव्हा आपण थंड तापमानात झोपतो तेव्हा चयापचय क्रिया वाढते आणि विश्रांती घेत असताना जास्त कॅलरी बर्न होतात. एका संशोधनानुसार, रात्रीच्या वेळी थंडीमुळे गुड ब्राउन फॅटचे प्रमाण वाढते, ज्यामुळे शरीराला अतिरिक्त रक्तातील साखरेपासून मुक्ती मिळते आणि अधिक कॅलरीज बर्न होतात.

हे वाचा - मंकीपॉक्समध्ये शारीरिक संबंधांवरही बंधन; प्रसार रोखण्यासाठी इतके दिवस दूर राहा

दिवसभर सक्रिय राहा -

आराम हराम आहे, असे म्हटले जाते, कारण दिवसभर सक्रिय राहिलेला कोणताही व्यक्ती रात्रीपर्यंत थकून जातो आणि पडल्याबरोबर लगेच झोप लागते. दिवसभर अ‌ॅक्टीव राहून आपण रात्रभर शांत झोपू शकता. रात्री 8 तासांची चांगली झोप घेतली तर आपले वजन अधिक चांगल्या पद्धतीने कमी होईल. त्यामुळे दिवसभर अंगमेहनतीच्या कामांमध्ये अ‌ॅक्टिव राहा.

(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Health, Health Tips, Weight loss tips