• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • Foods for winter: निरोगी राहण्यासाठी हिवाळ्यात या गोष्टींचा आहारात करा समावेश; रोगराई राहील दूर

Foods for winter: निरोगी राहण्यासाठी हिवाळ्यात या गोष्टींचा आहारात करा समावेश; रोगराई राहील दूर

हिवाळा आला की काही आजार झपाट्याने वाढू लागतात. जसे जुनाट संधिवात रोग. हिवाळा सुरू होताच सांधेदुखीचा वृद्धांना खूप त्रास होतो. याशिवाय हिवाळ्यात त्वचेशी संबंधित अनेक आजार (Winter Super food for body warm) वाढतात.

 • Share this:
  नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर : हिवाळ्यात आपले शरीर आतून उबदार ठेवण्यासाठी काही गोष्टींचा आहारात समावेश करणं गरजेचं आहे. रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहणे गरजेचे आहे. हिवाळा आला की काही आजार झपाट्याने वाढू लागतात. जसे जुनाट संधिवात रोग. हिवाळा सुरू होताच सांधेदुखीचा वृद्धांना खूप त्रास होतो. याशिवाय हिवाळ्यात त्वचेशी संबंधित अनेक आजार (Winter Superfood for body warm) वाढतात. HTK च्या बातमीनुसार, होलिस्टिक लाइफस्टाइल कोच ल्यूक कौटिन्हो यांनी सांगितले की, मजबूत रोगप्रतिकार शक्तीमुळे आपण हिवाळ्यात आजारी पडण्यापासून वाचवतो. त्याशिवाय त्वचा, केस आणि सांधे यांचे आरोग्य देखील चांगले राहते. हिवाळ्यात, सांधेदुखीचा लोकांना खूप त्रास होतो कारण तापमान कमी होते. त्याचप्रमाणे हिवाळ्यात त्वचा कोरडी होणे ही सामान्य बाब आहे. आवळा, तूप, बाजरी, खजूर, बदाम, मोहरी, हिरव्या भाज्या असे काही पदार्थ आहेत ज्यांच्या सेवनाने अशा समस्यांवर मात करता येते. चला तर मग जाणून घेऊया, असे कोणते पदार्थ आहेत, ज्यामुळे हिवाळ्यात आपले शरीर निरोगी राहते. हिवाळ्यात शरीराला उबदार ठेवणारे काही पदार्थ अक्रोड आणि बदाम अक्रोड आणि बदाम हे प्रत्येक ऋतूत आरोग्यासाठी उत्तम अन्न असले तरी हिवाळ्यात याचे अनेक फायदे आहेत. अक्रोडाची चव गरम असते. त्यामुळे हिवाळ्यात शरीर उबदार राहते. हिवाळ्यात मज्जासंस्था सक्रिय ठेवण्यासाठी अक्रोड खूप मदत करतात. त्यामुळे रक्ताभिसरण बरोबर राहते आणि खराब कोलेस्ट्रॉलही कमी होते. आवळा आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते. त्यामुळे हिवाळ्यात प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आवळा हे उत्तम औषध आहे. आवळ्यामुळं रोग प्रतिकारशक्ती वाढते आणि थंडीचा प्रभाव कमी राहतो. आवळा जाम, लोणचे, कँडी इत्यादी बनवून सेवन करता येते. गूळ प्रदूषणामुळे घशात अडकलेले धुळीचे कण बाहेर काढण्यासाठी गूळ खूप प्रभावी आहे. हिवाळ्यात गुळामुळे लगेच शरीराला उष्णता मिळते. गुळातील कार्बोहायड्रेट्सचे पचन लवकर होते, ज्यामुळे शरीराला त्वरित उष्णता मिळते आणि थंडीचा प्रभाव कमी होतो. हे वाचा - पतीच्या हत्येसाठी ऑनलाईन वेबसाईटवरुन बुक केला ‘किलर’; महिलेसोबत पुढे घडलं भलतंच तूप तुपातील चरबी शरीराच्या आत खूप लवकर विरघळते, ज्यामुळे शरीराला त्वरित उष्णता मिळते. तुपाचा मर्यादित प्रमाणात वापर केल्याने त्वचा कोरडी आणि फ्लेकी होत नाही. तूप रोटी, भात, खिचडी इत्यादीमध्ये मिसळून खाल्ले जाते. हे वाचा - महिन्याच्या किमान गुंतवणूकीत मिळतील तब्बल 35 लाख रुपये; जाणून घ्या Post Office ची नवी योजना रताळे रताळ्याला सुपरफूडचा दर्जा आहे. भारतात अनेक ठिकाणी थंडीचा प्रभाव कमी करण्यासाठी हिवाळ्यात रताळे खाल्ले जाते. यामध्ये व्हिटॅमिन ए, पोटॅशियम, फायबर आणि इतर पोषक घटक मोठ्या प्रमाणात आढळतात. खजूर आखाती देशात खजूर विशेषतः हिवाळ्यात खाल्ले जातात. खजूरमध्ये व्हिटॅमिन ए आणि बी मुबलक प्रमाणात आढळते. खजूरमध्ये फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फायबर देखील चांगले असते. हे सर्व पोषक घटक शरीराला आतून उबदार ठेवतात.
  Published by:News18 Desk
  First published: