मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /घरच्या घरी हिंगाचं पाणी बनवून करा वजन कमी, जाणून घ्या त्याचे फायदे आणि असं बनवा पाणी

घरच्या घरी हिंगाचं पाणी बनवून करा वजन कमी, जाणून घ्या त्याचे फायदे आणि असं बनवा पाणी

Weight loss Tips: एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की, वजन कमी करणं सोपं नसतं. जसं आज सुरूवात केली आणि उद्या वजन कमी झालं, असं होत नाही. यासाठी नियमितपणे 5-6 महिने कठोर मेहनत करण्याची गरज असते.

Weight loss Tips: एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की, वजन कमी करणं सोपं नसतं. जसं आज सुरूवात केली आणि उद्या वजन कमी झालं, असं होत नाही. यासाठी नियमितपणे 5-6 महिने कठोर मेहनत करण्याची गरज असते.

Weight loss Tips: एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की, वजन कमी करणं सोपं नसतं. जसं आज सुरूवात केली आणि उद्या वजन कमी झालं, असं होत नाही. यासाठी नियमितपणे 5-6 महिने कठोर मेहनत करण्याची गरज असते.

नवी दिल्ली, 28 फेब्रुवारी: वजन कमी करण्यासाठी (Weight loss) अनेक जण घरगुती उपचार, वेटलॉस डाएट (Weight loss diet), वर्कआउट करतात. काही जणांना याचा जास्त फायदा होत नाही. अशावेळी निराश होऊन ते सर्व उपाय करणं सोडून देतात. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की, वजन कमी करणं सोपं नसतं. जसं आज सुरूवात केली आणि उद्या वजन कमी झालं, असं होत नाही. यासाठी नियमितपणे 5-6 महिने कठोर मेहनत करण्याची गरज असते. जर तुम्हीही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर काही दिवसांसाठी हिंगाचं पाणी (Hing water for weight loss) पिऊन पाहा. हिंग (Asafoetida) हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं. हिंग हे पोटाच्या आरोग्यासाठीही चांगलं असतं. हिंग हे गॅस, सूज, पोटदुखी (Benefits of Hing) दूर करतं. यामध्ये असलेली काही तत्त्वं वजन कमी करण्यासही मदत करतात. चला जाणून घेऊया कशाप्रकारे हिंगाचं पाणी वजन कमी करण्यास मदत करतं आणि कसं तयार करायचं हे हेल्दी वेटलॉस ड्रिंक (Healthy drink for weight loss).

हिंगामध्ये असलेली पोषक तत्त्व

हिंगामध्ये अनेक प्रकारची पोषकतत्त्वं असतात, जी निरोगी शरीरासाठी खूप आवश्यक असतात. यामध्ये फायबर, कार्बोहायड्रेट, प्रोटिन, आयर्न, नियासीन, कॅल्शियम, कॅरोटिन, फॉस्फोरस, रायबोफ्लेव्हिन इत्यादी असतात. तसंच यामध्ये अँटिऑक्सिडंट, अँटिबॅक्टेरियल, अँटिबायोटिक, अँटिफंगल, अँटिडायबेटिक गुणही असतात.

हिंगाचं पाणी पिण्याचे फायदे

• हिंगाचं पाणी (Hing water) प्यायल्याने शरीराचं मेटॅबॉलिज्म बूस्ट होतं. ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. यामध्ये मेटॅबॉलिक अॅक्टिव्हिटीला बूस्ट करणारी तत्त्व असतात. हिंग कोमट पाण्यात घालून प्यायल्यास चयापचय प्रक्रियेत सुधारणा होते.

• वजन कमी करायचं असल्यास रोज एक ग्लास हिंगाचं पाणी प्या. एका अभ्यासानुसार, हिंगामध्ये वजन कमी करणारे घटक असतात, जे शरीरातील चरबीही कमी करतात.

• हिंगाचं सेवन मधुमेह असणाऱ्यांसाठीही चांगलं असतं. हिंग घातलेलं पाणी ब्लड शुगर कंट्रोलमध्ये ठेवतं. यामध्ये असलेलं हायपोग्लायसेमिक तत्त्व शुगर लेव्हल कमी करतं.

हिंगाचं पाणी तयार करण्याची पद्धत

एक ग्लास पाणी घ्या. त्यामध्ये चिमूटभर हिंग पावडर घालून चांगलं ढवळा. हे गॅसवर ठेवा आणि थोडसं गरम होऊ द्या. हे पाणी तुम्ही रिकाम्यापोटीही पिऊ शकता. याची चव वाढवण्यासाठी तुम्ही लिंबाचा रसही घालू शकता. तसंच गूळासोबत मध घालूनही हिंगाचं पाणी तयार करता येतं.

मग तुम्हीही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर हिंगाचं पाणी नक्की पिऊन पाहा आणि वजन कमी करा.

First published:

Tags: Health Tips, Weight loss