नवी दिल्ली, 05 नोव्हेंबर : मिठाई आणि पारंपारिक पदार्थांमुळे दिवाळीचा सण अधिक रंगतदार आणि आनंददायी होतो. या गोष्टींशिवाय दिवाळीची कल्पनाच करता येत नाही. मात्र, हे पारंपारिक तळलेले पदार्थ आणि मिठाई खाल्ल्यानं आपल्या आरोग्यास त्रास होऊ शकतो. दिवाळी फराळातील पदार्थांमुळे आम्लपित्त (acidity), पोट फुगणे आणि बद्धकोष्ठता (constipation) यासारख्या समस्या अधिकच वाढू शकतात. तुम्हालाही सणासुदीच्या काळात असे काही त्रास होत असतील तर त्यावर पाच मार्गांनी मात करता येईल.
गुलकंद पाणी -
रात्री दिवाळी पार्टीनंतर तुम्ही सकाळी झोपेतून उठता तेव्हा तुम्हाला अॅसिडीटी, पोट फुगणे, बद्धकोष्ठता किंवा डोके जड होणे यांसारखी अस्वस्थता जाणवू शकते. अशा परिस्थितीत गुलकंद पाण्याने दिवसाची सुरुवात करणे चांगले. एक ग्लास पाण्यात एक चमचा गुलकंद मिसळा आणि नीट मिसळल्यानंतर प्या. त्यात असलेली गुलाबाची पाने नीट चावून खा. तुम्हाला काही वेळात आराम मिळेल.
सकाळची झोप -
डॉक्टरांचे म्हणणे आहे की, सकाळी नाश्त्यानंतर 15 ते 20 मिनिटांची छोटीशी झोपही तुम्हाला उत्तम विश्रांती देईल. सकाळी आतडे नीट साफ न झाल्यास आपली चिडचिड होते. ही युक्ती करून पाहिल्यास तुम्हाला मोठा फायदा होईल आणि दिवाळीतील पदार्थांमुळं निर्माण होणाऱ्या समस्याही दूर होतील.
दुपारच्या जेवणात केळी खा -
मुलांमध्ये बद्धकोष्ठतेच्या समस्येवर मात करण्यासाठी हा उपाय खूप उपयुक्त आहे. दिवाळीतील खाण्यामुळं तुम्हालाही बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर दुपारच्या जेवणात रोटी, भाजी, मसूर, भात यानंतर एक किंवा दोन केळी खावीत. बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी पोषणतज्ञ हे सर्वोत्तम सूत्र मानतात.
हे वाचा - Good News! आता केवळ लस नाही तर गोळ्या घेऊन बरा होणार COVID-19, या देशाने सर्वप्रथम दिली मान्यता
2 ते 5 मिनिटांचे सुप्तबद्ध कोणासन -
पोट फुगण्याची समस्या अनेकदा संध्याकाळी सुरू होते. जर तुम्हालाही असे वाटत असेल तर 2 ते 5 मिनिटे सुप्तबद्ध कोणासन खूप प्रभावी ठरू शकते. हे करण्यासाठी पाठीवर जमिनीवर झोपा आणि आपल्या पाठीसाठी एक गोल उशी ठेवा. यानंतर पाय गुडघ्यातून वाकवताना दोन्ही पंजे एकमेकांना चिकटवा आणि शक्यतो पसरवण्याचा प्रयत्न करा. पोट फुगण्याच्या समस्येपासून तुम्हाला लवकरच आराम मिळेल.
हे वाचा - Post Office ही खास स्कीम खरेदी करून साजरी करा दिवाळी! मिळेल High Return आणि दरमहा होईल कमाई
तुपासह तांदळाची पेज -
सणासुदीच्या काळात जास्त खाल्ले जाणार नाही याची विशेष काळजी घ्यावी. दिवाळीत जास्त साखरेचे अन्न खाल्ल्याने अनेक समस्या उद्भवू शकतात. जर तुम्हाला अशी कोणतीही समस्या भेडसावत असेल तर तांदळाची पेज तुपासोबत खाल्ल्याने आराम मिळतो. यासाठी भरपूर पाण्यात तांदूळ उकळवा म्हणजे ते सूपसारखे तयार होईल. यानंतर ते एका कपमध्ये काढून त्यात दोन चमचे तूप मिसळा. पोटाशी संबंधित समस्यांपासून तुम्हाला लवकरच आराम मिळेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Health Tips