मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Memory Power : स्मरणशक्ती तल्लख बनवण्यासाठी या गोष्टी आहेत फायदेशीर, आहारात करा समावेश

Memory Power : स्मरणशक्ती तल्लख बनवण्यासाठी या गोष्टी आहेत फायदेशीर, आहारात करा समावेश

बदलत्या जीवनशैलीमुळे आजकाल बहुतांश लोकांना स्मरणशक्ती कमी होण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. प्रौढांमध्ये स्मरणशक्ती कमी होण्याची अनेक कारणे असली, तरी पोषक तत्त्वे योग्य प्रमाणात मिळत नसतील तर स्मरणशक्ती कमी होण्याची शक्यता अनेक पटींनी (How to increase memory power naturally) वाढू शकते.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर : काही लोकांना विस्मृती किंवा स्मरणशक्ती कमी असण्याची मोठी समस्या असते. त्यांना बहुतेक गोष्टी आठवत नाहीत. मात्र, शारीरिक समस्या किंवा विकार नसल्यास आणि योग्य पोषक तत्वे मिळत असल्यास स्मरणशक्तीचा त्रास व्हायला नको असतो. पण बदलत्या जीवनशैलीमुळे आजकाल बहुतांश लोकांना स्मरणशक्ती कमी होण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. प्रौढांमध्ये स्मरणशक्ती कमी होण्याची अनेक कारणे असली, तरी पोषक तत्त्वे योग्य प्रमाणात मिळत नसतील तर स्मरणशक्ती कमी होण्याची शक्यता अनेक पटींनी (How to increase memory power naturally) वाढू शकते.

WebMD वेबसाइटनुसार, काही औषधे, अल्कोहोल, तंबाखू, ड्रग्ज, धूम्रपान, झोप न लागणे, तणाव, नैराश्य, तीव्र डोकेदुखी, पक्षाघात इत्यादीमुळे स्मरणशक्ती कमी होऊ शकते. बाजारात मिळणाऱ्या अनेक सप्लिमेंट्स स्मरणशक्ती वाढवण्याचे दावे करतात, पण त्याची खात्री नसते, त्यामुळे स्मरणशक्ती वाढवण्यासाठी योग्य आहाराचा वापर करणे चांगले.

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आवश्यक पोषण

मॅग्नेशियम : मॅग्नेशियममुळे झोपेची गुणवत्ता सुधारते, त्याची स्मृती साठवण्यास मदत होते. जर्नल ऑफ न्यूरॉनमधील अहवालात म्हटले आहे की मॅग्नेशियम दीर्घकालीन स्मरणशक्ती राखण्यास मदत करते. भाजलेले काजू आणि बदाम, पालक, शेंगदाणे, सोया मिल्क, एवोकॅडो इत्यादींमध्ये मॅग्नेशियम आढळते.

हे वाचा - अनोखं लग्न! 6 सख्खा बहिणींनी एकाच मंडपात घेतले सात फेरे; 3 गावातून आल्या वराती

झिंक : निरोगी मेंदूसाठी पुरेशा प्रमाणात झिंक आवश्यक आहे. झिंकचा मेंदूशी काही संबंध आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी अल्झायमर आणि पार्किन्सन्सचे आजार झिंकच्या कमतरतेमुळे होऊ शकतात, त्यामुळे संशोधक मेंदूसाठी झिंक आवश्यक मानतात. भोपळा, लॉबस्टर, शेंगा, हरभरा, सोयाबीन, मसूर इत्यादी झिंकचे चांगले स्रोत आहेत.

हे वाचा - कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे शेअर बाजारालाही धक्के; सेन्सेक्स, निफ्टीमध्ये मोठी घसरण

ओमेगा 3 फॅटी अॅसिडस् : ओमेगा-3 फॅटी अॅसिड स्मरणशक्ती वाढवण्यासाठी खूप फायदेशीर आहे. ओमेगा 3 फॅटी अ‌ॅसिड हृदय विकारांसाठी गुणकारी मानले जाते. अल्फा लिनोलेनिक अ‌ॅसिड हे ओमेगा-3 फॅटी अ‌ॅसिडमध्ये आढळते, जे कोलेस्टेरॉलची पातळी वाढू देत नाही. यामुळे हृदय निरोगी राहते. पण, काही संशोधनात हे सिद्ध झाले आहे की ओमेगा 3 फॅटी अॅसिड्स मेंदू निरोगी बनवण्यासाठीही खूप फायदेशीर असतात. ओमेगा-3 फॅटी अॅसिड मासे, ताग, अक्रोड, जवस, मोहरी, मेथी, खवा, पालक इत्यादींमध्ये आढळतात.

First published:

Tags: Health Tips, Mental health